Chaitanya Dasnur

Abstract Others

0  

Chaitanya Dasnur

Abstract Others

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

1 min
1.6K


पाउसात भिजुनि आज 
मला पाऊस व्हावेसे वाटतेय
असशील जिथे कुठे तू
तिथे कोसळावे वाटतेय..

स्पर्शावे तुला मी
हजारो थेम्बरूपी हातांनी
हर्षावे मीही मग
तुझ्या चिंब केश लतांनी
नखशिखान्त तुला आज कवेत घ्यावेसे वाटतेय,
पाउसात भिजुनि आज 
मला पाऊस व्हावेसे वाटतेय...

अंगणातल्या तुझ्या गुलाबासही 
आहे आस माझी
हर पाकळी जपुन आहे 
मीही पास त्याची
चिंब देह परि आग का उरी
ही लागतेय??
पाउसात भिजुनि आज 
मला पाऊस व्हावेसे वाटतेय...

बहाण्याने काहीतरी 
भिज पाऊसात कधीतरी
तुझ्या देहावरुनी पाणी
निथळु दे सभोवरी
त्या निथळत्या पाण्यात मला
हरवून जावेसे वाटतेय
म्हणून मला आज 
पाऊस व्हावेसे वाटतेय
असशील जिथे कुठे तू
तिथे कोसळावे वाटतेय...

चैतन्य


Rate this content
Log in