पासवर्ड
पासवर्ड


- पासवर्ड -
धापा टाकत तिच्यावरुन तिच्या बाजुला पहुडल्यावर कसबस सावरत त्याने खिडकीवर ठेवलेली सिगारेट पेटवली, आणि एक झुरका घेऊन तिच्या तोंडावर धुर फेकत तिला कपडे घाल म्हणुन डोळ्यांनेच खुणावलं. छातीशी चादर दाबत भिंतीला पाठ टेकवत अंतर्वस्त्र घालताना तिने पुन्हा विचारलच त्याला,
" शोना, माझ्यावर पण लिही की कधीतरी, काहीतरी "
तिच्याकडे न पाहताच मान हलवत तो हुंकारला,
" हम्म ".....
काहीशी वैतागाने, लाडिकपणे ती बोलली
" नुसत हम्म नाही. दरवेळीचच आहे तुझ हे. सिग्नलवरील भिकारी, पेठेतली वैश्या, दुसऱ्यांचे ब्रेकअप, पाऊस, दुष्काळ यावर बरं तुला काहीकाही सुचतं!! तेही एकदा बघितल्यावरच!! आणि आजवर माझ्यासाठी एक शब्दही नाही??"
तो -.चल आवर लवकर, दोन तासांपुरतीच घेतलीये रुम.
चेक आऊट कराव लागेल.
ती - नाही, तु सांग आधी कधी ते??
तो - ह्या वेळी नक्कीच.. आय प्रॉमिस.
ती - ओके. आय होप यु विल...
निघतानाच एक चुंबन घेतल्यानंतर
ती - लव्ह यु जान..
तो - हम्म.. लव्ह यु टु.
दोन वर्ष झाले असतील त्यांना एकत्र राहुन. आतापर्यंत एकमेकांच्या इतिहासापासुन शरीराच्या भुगोलापर्यंत सार काही ठाऊक झालेल. त्याच्या लेखणीच्या प्रेमात ती आधी पडलेली मग त्याच्या. तो कदाचित तिच्यापेक्षा तिच्या शरीराच्या प्रेमात असलेला.. कदाचित फक्त.. फिक्स नाही.
तिची चटक लागल्यासारखा त्याचा तिच्याशी असणारा संबंध. हप्त्यातुन किमान एकदा होणारा सेक्स. कॉलवर फारस बोलणं नाही होत आता पहिल्यासारख मात्र ते दोघ आजही सोबत आहेत.
तिच्यावर त्याने एखादी कविता अथवा कहाणी लिहावी अशी तिची खुप जुनी इच्छा. वारंवार तिने बोलुन दाखवलेली. पण आजपावत ती अपुर्णच राहीलेली.
दारुच्या नशेत बापाच्या लफड्यापासुन आपल्या हरामखोरीच्या किश्श्यापर्यंत मोकळा होणारा तो तिला मात्र नेहमीच हातच्याला राखत आलेला.
एक सिगारेटदेखील कधीच एकटा न ओढणारा तो तिला मात्र कधी आणि कुठे भेटायचा हे कोणालाच समजत नसायच.
त्याला येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा चेहरा, फिगर पाहुन अक्सेप्टल्या जायच्या, त्यांच्याशी सेक्सचैट करुनही त्यांपैकी एकीलाही कधीच प्रत्यक्षात तो भेटायचा नाही.
मात्र तिच्यावर जिवापाड प्रेम असेल अस कधी जाणवायचही नाही त्याच्या एकंदरित वागण्यावरुन.
ना रोज चैटींग ना कॉल, ना तो समाधानी ना तो त्रुप्त.
तिला धरुनही न ठेवता तिला सोडलही नव्हत त्याने. तिच्याविना त्याच फार काही अडेल अशीही शक्यता नव्हती.
तिलाही ह्या दोन वर्षांत अनेकांचे प्रपोजल्स आलेले पण त्याची सवय झालेल तिच मन आणि तन दुसऱ्याचा विचारही तिला करु देत नसे. त्याच्या कविता तिला समजण्यापेक्षा तिला त्या आवडायच्या. त्याच्यामुळे त्याच लिखाण आवडायच कि त्याच्या लिखाणामुळे तो? हेही एक कोडच होतं.
तिच्यावर, तिच्याबद्दल कधीच व्यक्त न होणारा तो चार भिंतीत मात्र तिच्यावर आपलं सार प्रेम उधळायचा. तिच्या सर्वांगावरुन हातं नाचवत तिला ओठांनी ओलचिंब करायचा. जणु आपल्या रोमारोमात तिला पुरेपुर साठवुन घ्यायचा पुन्हा पुढली भेट होईपर्यंत.
असेच दिवसामागुन दिवस सरत होते ते दोघही एकमेकांना पुरत होते. मधल्या काळात अनेक गोष्टी घडत होत्या.
या दरम्यान तिच शिक्षण पुर्ण झाल होत आणि घरी दिलेल्या शब्दाखातर तिला परत जाव लागणार होतं. जणु शिक्षणाचा शिक्का घेऊन लग्नाच्या मार्केट मध्ये उतरण्यास ती तयार झाली होती. कॉन्वोकेशनला तिचे घरचे येऊन, कौतुकसोहळा पाहुन तिला परत आपल्यासमवेत घेऊन निघणार होते.
एक प्रेम, एक प्र्याक्टिकल प्रेम संपणार होतं. "जाण्याअगोदर किमान आठवडाभर एक पुर्वकल्पना दे" असा त्याचा शब्द होता तसा तिने तो दिलाही होता.
कॉन्वोकेशन उद्याचे होते.
आज कॉल करत तिने विचारले,
"डार्लिंग, आज आखरी मुलाकात करनी हे तुमसे "
तो - हम्म..
ती - त्याच लॉजला ??
तो - ना.. केंटीनला ये.. मीही आलोच..
ती ओके म्हणताना फारच चक्रावली.
कारण आज ते खुप दिवसानंतर कदाचित वर्षानंतर त्या केंटिनमधे भेटणार होते.
तिने गिफ्ट केलेला शर्ट घालुनच तो तिथे पोहोचला.
नविन वाटावा असा तो शर्ट बघुन तिने विचारलं
" ड्रायक्लिन केलास ?"
तो- ना.. आजच घातला.. पहिल्यांदाच...
ती - ( हसत ) मला खरच तुला समजुन नाही घेता आलेल आजवर. नक्की कसा आहेस तु. माझ काय स्थान होतं तुझ्या आयुष्यात ? खरच काहीतरी होत का ? तुझ्या मनापर्यंत पोहोचुन तुझ्या लिखाणाचा भाग नाही होऊ शकली मी आजवर, लव्ह यु तरी मनापासुन बोलायचास कारे ??
तो - आजवर आपल्यात काही लपुन आहे ?
ती - (हसत) नो वे..
तो - आहेत बऱ्याच गोष्टी..
ती - उम्म.. आय डोंट थिंक सो..
तो - जिथुन आपण भेटलो त्या तुझ्या आयडीचा पासवर्ड तरी मला कुठे माहितीये .. ना तुला माझा ठाऊकै..
ती - ( जोरात हसत ) येस्स.. बट पासवर्ड इज व्हेरी पर्सनल थिंग यार. ती कोण कशाला शेयर करेल??
तो - एग्जाक्ट्लि.. पासवर्ड इज व्हेरी पर्सनल थिंग..
आणि यु वेयर माय पासवर्ड... यु आर माय पासवर्ड..
( तु माझा पासवर्ड होतीस. तु माझा पासवर्ड आहेस )
आणि पासवर्ड हा सर्वांपासुन लपवुन ठेवावासा वाटतो. त्या बद्दल ना कोणाला सांगाव वाटत ना त्याच्याबद्दल लिहावस वाटत.. तो फक्त आपला आणि आपलाच असतो..
बाय द वे..
( खिशातला मोबाईल तिच्यापुढे धरत ) हे माझ आयडी.
हे केलं लॉगआउट,
वेट पुन्हा लॉग इन करतो,
ILU टाईप केल्यावर तिच्याकडे मोबाईल देत
" टाक आता तुझ नाव...
ती त्याच्याकडे बघते.. पुन्हा स्क्रिनवर बघत
त्या तीन लेटर्सपुढे आपल नाव टाईप करते *****
आणि त्याचा आयडी लॉग इन होतो....
तो - डियर... यु विल बी माय पासवर्ड...