STORYMIRROR

Prashant Kadam

Abstract Classics Fantasy

4  

Prashant Kadam

Abstract Classics Fantasy

पाठलाग संपन्नतेचा !!

पाठलाग संपन्नतेचा !!

4 mins
399

लघुकथा - 


पाठलाग संपन्नतेचा !! 


आनंद सामान्य शेतकरी कुटुंबातील हुषार मुलगा, दहावीत शिकत असलेला आनंद वडिलांना  शेतात मदत करीत असे. त्याच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित होणार असल्याचे त्याने वाचले आणि त्यात सहभाग घेण्याची त्याला तीव्र इच्छा झाली. मात्र, प्रयोगासाठी लागणारी साधनसामग्री आणायला त्याच्याकडे पैसे नसल्याने ते कुठून आणायचे ही चिंता त्याला वाटू लागली. 

आनंद घरी चिंताग्रस्त अवस्थेत पोहोचला. त्याची अवस्था पाहून आईने त्याच्या चिंतेचे कारण विचारले. आनंदने काहीही न लपवता  सगळे सांगितले व लागणारी साधनसामग्री कशी मिळवायची याची चिंता व्यक्त केली. आईने त्याला धीर दिला आणि शेतावर डबा द्यायला जाशील तेंव्हा बाबांशी बोलायला सांगितले. आनंदने बाबांशी बोलून आपली अडचण सांगितली. बाबानी त्याला धीर देवून बाजुच्या गावात जावयास सांगितले. 

जाताना वाटेवर आनंदला एक जुने पडके घर दिसले. त्याला आठवले की, त्याचे बाबा त्याला तिथे घेऊन गेले होते. तिथे राहणारे बाबांचे मित्र तंत्रज्ञ म्हणून मुबईत काम करीत होते. आनंदने त्यांना भेटून मदत घेण्याचे ठरवले. तिथे गेल्यावर त्याला काका भेटले नाहीत, परंतू आजीने त्यांला नवीन घराचा पत्ता दिला जिथे घराचे काम चालू होते तेथे काका कामासाठी तात्पुरते रहावयास गेले होते. जातांना आजीने काकांसाठी ते विसरलेली ओषधे व बॅटरी आनंदच्या सोबत दिली. 

आनंद चालत मधेच धावत पळत दिलेला पत्ता शोधत होता. घामाघूम होवून तो एकटाच जंगलचा रस्ता पार करत घाबरा गुबरा होत कसा बसा काकांच्या घरी पोहोचला.  आपली ओळख सांगत त्याने आपली  कल्पना काकांना सांगितली. काकांना त्याची कल्पना खूप आवडली आणि त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात काका आनंदच्या घरी आले सोबत त्यांनी अनेक साधनसामग्री आणली. 

आनंदने व काकांनी जुन्या सायकलला डिझेल इंजिन लावून एक छोटे ट्रॅक्टर तयार केले. यामुळे शेतीची पेरणी, लावणी, खुरपणी ईत्यादी सर्व कामे सहज कमी खर्चात होऊ शकत होती. या यंत्राची ट्रायल बाबांच्या शेतात घेतली गेली आणि ती यशस्वी ठरली. 

अर्थातच विज्ञान प्रदर्शनात आनंदला पहिले पारितोषिक मिळाले. त्याच्या यंत्राचे पेटंटही मिळाले त्याच्या पुढील व्यवसायाचा मार्ग मोकळा झाला.  अनेक शेतकऱ्यांसाठी त्याने सोपा मार्ग उपलब्ध करून दिला. आनंदच्या कर्तबगारीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक झाले.  

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
ए-२-१०/५०३, स्वजन , 
गोकूळधाम, जनरल वैद्य मार्ग,
गोरेगांव , पूर्व,
मुंबई - ४०००६३.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract