पाकीट
पाकीट
आयुष्य सरळमार्गी नसते...आयुष्यात अनेक घटना घडतात...काही सुखद, काही दुःखद, काही अपेक्षित तर काही अनपेक्षित... पण काही वेळा अशी घटना घडून जाते की आपल्यासाठी गूढ बनून राहते...एक कोड बनून राहते....एक न सुटणार कोड...आपण विचार करतच राहतो पण त्याचे उत्तर काही आपल्याला सापडत नाही...
अशीच एक घटना घडली माझ्यासोबत...मी अक्षय..घटना आहे नोव्हेंबर 2019 ची...माझे लग्न ठरले होते...लग्नाला 15 दिवस उरले होते...आणि मी मालाडला माझ्या art director ना लग्नपत्रिका द्यायला चाललो होतो...त्यांना पत्रिका देऊन मी मालाड रेल्वे स्टेशनवर आलो..थोड्या वेळाने ट्रेन आली...दुपारची वेळ असूनही ट्रेनला प्रचंड गर्दी होती.. पुढच्या स्टेशनला गोरेगावला ट्रेन थांबली...मंजिरी म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला "मी निघालोय ", हे सांगण्यासाठी बॅग मधून मोबाईल काढला..तेव्हा लक्षात आले की माझ्या बॅगची चैन उघडी आहे..मी पटकन आत हात घालून बघितलं तर माझं पाकीट गायब होत..तेव्हा लगेच ट्रेन मधून उतरलो आणि कदाचित दुसऱ्या कप्प्यात पाकीट ठेवले असे वाटून सगळी बॅग पुन्हा पुन्हा तपासली... पाकीट कुठेच सापडले नाही...रेल्वे पोलिसांकडे तक्रार करायला गेलो. त्यांना पाकिटात काय काय होत ते सगळं सांगितलं...त्यांनी माझी तक्रार नोंदवून घेतली..
गोरेगाववरून निघाल्यावर मंजिरीला कॉल करून माझ्या एका बँकचे card block करायला सांगितलं आणि मी दुसऱ्या बँकचे card block करायला request टाकली..गाडीत बसल्यावर मी बहिणीला आणि आईला घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं.. घरी आल्यावर मी tension मध्ये होतो..
दोन दिवसांनी माझ्या पप्पांच्या मामाच्या मुलीचा, स्वातीताईचा मला कॉल आला..तिने मला विचारले की तुझं आधार कार्ड वगैरे काही हरवलं आहे का..मी म्हणालो की फक्त आधार
कार्डच नाही तर सगळे documents ज्या पाकिटात होत ते पाकीटच मारलं. पण तुला कस कळलं..तेव्हा ती म्हणाली एका व्यक्तीने तिला call केला आणि त्याला तुझे documents सापडले आहेत, असे ती व्यक्ती म्हणाली..
मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं त्या व्यक्तीला स्वातीताईचा नंबर कुठून मिळाला असेल..कारण तिचा नंबर असलेला कोणताही कागद किंवा कार्ड माझ्या पाकिटात नव्हतं..मी ही शंका ताईला बोलून दाखवली..तेव्हा ताई म्हणाली, आधी ते documents घेऊन ये मग आपण बोलू..मी तुला त्याचा नंबर देते..
मी त्या व्यक्तीला कॉल केला..त्या व्यक्तीने मला बांद्रा लिंक रोड वरील एका चर्चजवळ भेटायला बोलावले.. मी आणि मंजिरी तेथे जायला निघालो. माझी बाईक घेतली..निघताना त्या व्यक्तीसाठी काही snacks घेतले..गाडी चालवताना पण हाच विचार चालू होता की त्या व्यक्तीला स्वाती ताईचा नंबर कसा मिळाला आणि ती माझी नातेवाईक आहे हे त्या व्यक्तीला कस कळलं असेल..
आम्ही त्या व्यक्तीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याला call केला..थोड्याच वेळात एक 40-45 वयाची ख्रिश्चन व्यक्ती आली...त्या व्यक्तीकडून सर्व documents घेतले..पाकिटाबद्दल विचारले असता ती व्यक्ती म्हणाली, त्यांना ते पाकीट band stand ला सापडले..कोणीतरी पाकीटतील documents काढून फेकलेले अश्या स्थितीत त्यांना ते पाकीट सापडले..स्वातीताईचा नंबर कसा मिळाला, यावर ती व्यक्ती म्हणाली, google वरून मिळाला..एवढंच बोलून ती व्यक्ती जायला निघाली..मी आणलेले snacks त्यांना दिले आणि आम्ही निघालो..
या घटनेनंतर मी पाकीट वापरणे बंद केले ते आजतागायत..त्या व्यक्तीला स्वातीताईचा नंबर कसा मिळाला आणि त्याद्वारे त्यांना कस कळलं की मी तिचा नातेवाईक आहे, हे आजपर्यंत रहस्य आहे..