Manda Khandare

Tragedy Inspirational

3  

Manda Khandare

Tragedy Inspirational

न्याय अन्याय - भाग 2

न्याय अन्याय - भाग 2

4 mins
243


शामलीला आज पळायला जागाच मिळेना. भीती ने तीचे पाय कापायला लागले होते. ती त्यांच्या समोर गया वया करु लागली, "


शामली:-मला जाऊ द्या पुन्हा वाट्याला नाही जायची मी, माफ़ करा मला. जाऊ द्या "


पण आज ते सारे काही ठरवुनच आले होते. बकरीचे पिल्लू लांडग्यांच्या तावडीत सापडावे तशी अवस्था शामलीची झाली होती. आणि ती त्यांच्या सामूहीक अत्याचाराला बळी पडली...... तिच्या त्या असहाय्यतेच्या आरोळ्यांनी सर्व जंगल हादरुन गेले.पण तीच्या मदतीला त्या वेळी कुणीही आले नाही....... तिला तिथेच त्याच अवस्थेत सोडून ते पळून गेले.

      

सायंकाळ होत आली होती. तिची जनावरे परतीच्या मार्गाने लागली होती. वाटेत शामली त्यांना अशी निपचित अवस्थेत पडलेली दिसली. ते सारे तिच्या अवती भोवती जमा होऊन हंबरत होती, तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती, जिभेने तिच्या तोंडाला चाटत ओले करत तिला शुद्धी वर आणण्याचे जणू शर्थीने प्रयत्न करत होती. इथे मनुष्य पशु झाले होते आणि पशुंमधे माणुसकी आली होती. तिला शुद्ध येताच ती त्यांच्या आधाराने उठली. नेहमी परतीच्या वेळी ती आणि सुरेखा मागे असायच्या,पण आज तिला आधार देत त्यांनी शामली ला पुढे पुढे अक्षरशः ढकलत आणले होते. 


       वैद्य काकांचे घर हे वेशीजवळ होते.काही अंतरा नंतर गाव सुरू होते होते. ते बाहेर तिचीच वाट बघत होते.गुरांच्या टापांचा आणि हंबरण्याचा त्यांना आवाज आता तसे ते कुंपणाच्या जवळ गेले. आज का कुणास ठाऊक त्यांना जरा बेचैन वाटत होते. त्यांनी आत्तापर्यंत सुमीला, त्यांच्या बायकोला किती तरी वेळा विचारून झाले होते की, शामली अजून कशी नाही आली म्हणून. काही तरी अघटीत होण्याची शंका त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. म्हणून ते असे अंगणात येरझाऱ्या घालत होते......... त्यांनी कुंपणाच्या जवळ जाऊन बघितले आणि सुमीला जोराने घाबरात हाक मारली... 


वैद्य काका:-सुमी लवकर ये बाहेर, पोरी ला बघ काय झाले ते..... 


सुमीने येऊन बघितले......तिच्या पायाखालची जमीनच सरकली घाबरतच तिने जाऊन शामलीला कवटाळून घरात नेले....... काका मात्र तिथेच डोक्याला हात लाऊन बसले.काय झाले असेल याचा अंदाज दोघांना ही आलाच होता. 

      थोड्या वेळाने सुमी बाहेर आली, काकांना म्हणाली, 


सुमी:-तुम्ही दादांकडे जा आणि त्यांना सांगा की, आज शामली आमच्याकडेच राहणार आहे, तिच्या सुमी काकूची तब्येत थोडी खराब आहे म्हणाव, आणि बाकी काही सांगू नका. जा लवकर. एवढे बोलुन ती भरकन आत निघून गेली. शामली शुन्यात नजर लाऊन बसली होती. सुमीला ही कळत नव्हते काय बोलावे, कसे बोलावे. तिला या विचार चक्रातुन बाहेर काढणे फार गरजेचे होते. काकु ने स्वत:ला सावरत शामली जवळ जाऊन तिच्या पाठी वरून हात फ़िरवला.सुमी काकु शामली वर फार माया करायची.तिचा खूप जीव होता शामलीवर. सुमीला मुल- बाळ नव्हते ती शामलीलाच आपली मुलगी मानायची. लहानपणापासूनच शामली,सुमी आणि वैद्य काकांकडे राहायची. तिच्या वेणी फणी पासुन सारेच सुमी फार हौसेने करायची. त्या दोघांना कधी वाटलेच नाही की आपल्याला मुल नाही म्हणून....त्यामुळे हा धक्का पचवणे जसे शामलीला कठीण होते तसेच सुमीला ही कठीण होते.पण या साऱ्यांतुन शामली ला बाहेर काढणे गरजेचे होते. ती शामली जवळ जाऊन बसली .....जसा शामलीला पाठीवर मायेचा स्पर्श जाणवला, तशी शामली,तिला बिलगुन रडायला लागली. 


शामली:-काकु मी त्यांच्या वाट्याला ही नाही गेली. तरी त्यांनी माझ्यासोबत........असे का केले......... ती हमसुन हमसुन रडायला लागली. तिला शांत करत सुमी म्हणाली...... " 


सुमी;-शु ssssss शांत हो बेटा. रडू नकोस. जे झाले त्यात तुझी काहीही चुक नाही". तिच्या पाठीवरून हात फ़िरवत तिला शांत करत सुमी म्हणाली, 


सुमी:-हे बघ, जे झाले ते विसरून जायचे, याची वाच्यता कुठे ही करू नकोस, तुझ्या आई, बाबांना सुद्धा काही सांगु नकोस, म्हणजे......आत्ताच काही सांगु नकोस ..... बाबा आजारी आहेत त्यांना हा धक्का सहन नाही होणार, हे तुला ही माहित आहे ना बेटा?आपण सांगू त्यांना...... पण नंतर, आत्ताच नाही.

 शामली आश्चर्याने सुमीकडे बघत होती. तिला काही कळत नव्हते सुमी काकु असे का म्हणते आहे?.... सुमीने तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फ़िरवला तिचे केस नीट करत तिला समजावले,


सुमी:-शामली बाळा, हे गाव आहे, ह्या घटनेबद्दल कुण्या एकाला जरी माहिती झाले , तर ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरायला वेळ लागणार नाही. लोकांच्या जळजळीत नजरेतील हजारो प्रश्न तुला जगू नाही देतील. ते तुलाच दोषी ठरवतील.तू त्यांच्यासाठी अाज पर्यंत काय काय केलेस हे ते साफ विसरतील. त्यांच्या नजरा तुझ्या घरच्यांना ही सुखाने जगु देणार नाहीत. रोजच नवनविन प्रश्न घेऊन ते उभे राहतील तुझ्या दारात...... नाही शामली बेटा असे होता कामा नये.


सुमी काकूच्या मनातील भीतीचे सावट शब्दांनी व्यक्त करत होते. पुढे काय काय होऊ शकते याचा पाढ़ाच सुमी ने वाचून दाखवला होता. शामली मात्र चेहऱ्यावर हजारो प्रश्न घेऊन सुमी ला नुसते बघतच होती. सुमी पुढे म्हणाली, 


सुमी:-हे बघ, या... या.... म्हणजे हे जे काही झाले त्याचा परिणाम तू तुझ्या मनावर होऊ द्यायचा नाही, आणि तुझ्या शरीरावर याचा परिणाम होणार नाही याची काळजी मी घेते.तू आता काहीही विचार करू नको. तू शांत हो, विसर सारे.


      शामली ला कळत नव्हते सुमी काकु असे का बोलते आहे. झालेला प्रकार इतका भयंकर आहे तरी ही काकु मला कसे शांत व्हायला सांगते आहे. 

ती काही बोलणार तेवढ्या काकु ने तिच्या तोंडावर हात ठेवत म्हंटले, 


सुमी :-काही बोलु नकोस, तू आराम कर मी खायला घेऊन येते आणि काहीही विचार करू नकोस . 


काकु निघुन गेली, शामलीला कळेना, ही तिच काकु आहे ना, जिने लहानपणापासुन अन्याया विरुद्ध लढायला शिकविले. 'अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो' हा 

लहानपणापासून पाठ गिरविणारी काकू आज असे का बोलली,तीचे मन सुन्न झाले. तिला त्या घटने बद्दल आठवण झाली आणि तिने आपले दोन्ही कान आपल्या हातांनी बंद केले....आणि डोळे घट्ट मिटुन घेतले. ते विचारांचे वादळ पुन्हा तिला त्याच भयंकर यातनांमधून घेऊन जाऊ लागले. नाही..... नाही.... तिच्या तोंडुन नकळत शब्द बाहेर पडले, सुमी हातात ताट आणि पाण्याचा ग्लास घेऊन आली. शामलीला असे घाबरलेल्या अवस्थेत बघून ती पटकन तिच्या जवळ गेली. शामलीला जवळ घेत तिला शांत केले. शामली रडत होती, तिने सुमीला प्रश्न केला......... 


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy