नशा
नशा
हा नशा तरुणाईवर, वरचढ होतो आहे. सांभाळावे स्वता:ला युवा पीढ़ीने अन्यथा हां नशा तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. तूमच्या सोबत घरच्या लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो आहे. लक्षात असू द्या. एका व्यक्तिमागे चार व्यक्तिचे जीवन धोक्यात असते. का करता हा नशा ?नशा केल्याने काय होते ?नशा केल्याने काय कुणाचेही दुख कमी झाले आहे ?आपल्या कुटुंबाचा विचार करावा. त्यांच्यावर देखिल तुमच्या नशेचा प्रभाव होत असतो. नशा ही जीवनासाठी अत्यंत हानिकारक असते. आपणआपल्याच हाताने आपलेच नुकसान करून घेत असतोय.
परंतु त्यांना कोण व किती सांगणार. योग्य काय आणि अयोग्य काय याची थोडीही जाणीव या नशेड़ी लोकाना नसते. जिंदगीला आपणचनष्ट करायचे व आपल्या कुटुंबालाही उध्वस्त करायचे. हिच खासियत आहे आजच्या मस्तवाल नशेडी युवकांची.आजची तरुणपिढी तर खुपच पुढे गेलेली आहे. ड्रग, खर्रा, धुम्रपान, तंबाखू अनेक नशेचे पदार्थ घेताना दिसतात. या समाजात मोठ्या प्रमाणात हा न्यूनगंड दिसून येतो. ती त्यांच्या मनाची कमजोरी नशेने दूर करण्याचा असफल प्रयत्न करताना दिसतात आहे."या नशेनी कुणाचे दुख कमी झालेले दिसत नाही, उलट माझ्या मते त्यांची दुखे दुप्पट वाढलेली असतात. मग का करतात ही लोके नशा ?
"एक नशा केलेला व्यक्ति दूसऱ्या एका नशा केलेल्या व्यक्तिला म्हणतो,अरे दारु नाही प्यायची ही नशा खूप खराब असते, दुसरा व्यक्ती म्हणतो, हो का खर आहे तुझे
म्हणने, तू पण नाही प्यायची ,आताची एक एक घूट चल पिवून घेवू."असल्या व्यक्तीना कितीही सांगितले तरी तो ऐकत नाही .वांरवार एकच गोष्ट रिपीट करतात.तेंव्हा त्यांच्यावर कोणताच इलाज चालत नसतो.
आमच्या शेजारी एक प्रतिष्ठित कुटुंब राहत होते. त्यांना चार मुले व दोन मुली होती.त्यांची सर्व मुले पद्धतशीर निघाली,पण एक लहान मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. पति पत्नी दोन मुले संसार होता.पन नशेत असता पत्नीला व मुलांना मारहाण करायचा.अश्लीश शिवीगाळ ही करायचा हे नित्याचेच झाले होते.त्यात कामावरपन जायचा नाही.मोठी मुलगी बिमार झाली.व मरन पावली.तेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून अापल्या मुलांना घेवून माहेरी निघूण गेली, तरीपन त्याने नशा सोडला नाही.
त्
यास व्यसनमुक्ती केंद्रात टाकले.तिथून आल्या नंतर आठ दहा दिवस न पिता चांगला रहायचा.पुन्हा नशा करून तोड़फोड़ करायचा.त्याचे जीवन नरकापेक्षा भयंकर झाले.त्यास कित्येक बीमाऱ्या लागल्या होत्या.तोंडातुन रक्त पडत होते.अंगा पायावर सुजन आली होती.श्वास भरून यायचा त्याच्याने चालने, बोलनेही व्हायचे नाही. तो पुरता कर्जबाजारी झाला होता. कधी कधी नदीवर सड़केवर पडून रहायचा. लोकांशी भांडने करायचा.घरची लोके त्याला उचलून आणायची.परंतु कुठपर्यंत त्याच्यावर घरची लोके दयामाया करणार होती,त्यांना आपल्या मुलामुळे गावात जगने कठिन झाले होते.त्यांना चेहरा दाखवायची लाज वाटत होती. त्याच्या रोजच्या भांडनानी आणि बेइज्जतीने कुटुंबाने रहाते गांव सोडले.
आता त्याला पाहुन ऐकुन काहीतरी शिकवन घेतली पाहिजे "अगला गिरा पिछला होशियार" पन अस होताना दिसत नाही.आजची युवापीढ़ी काही विचार करतील का? अरे नशा केल्याने दुख कमी होत नाही.उलट ते खूब वाढतय.आम्ही आमच्या संस्थेद्वारे खुप दारूबंदी, व्यसनमुक्तीचे शिबीरे घेवून प्रचार प्रसार केला,शिबीरे सार्थक केली,शपथेवर कित्येकांचा नशा सोडविला. पन हे व्यसन वावटळासारख जगभर पसरलेले आहे.एका दोघांच्या केल्याने नाही होणार,यात प्रत्येक व्यक्तिचा हाथ असायला पाहिजे.पन "ज्याच जळे त्यालाच कळे"म्हणुन पाहिजे तितका प्रसार होत नाही.आम्ही पथनाट्य, करूनही प्रचार-प्रसार केलेला होता.भरपुर लोकांनी त्यात नशा सोडला.पन काही कारणास्तव ते कार्य पूर्ण होवू शकले नाही.या नशेला जर पुर्ण बंद करायचे असेल तर,आधी दारुभट्टी किंवा दारूची दुकानें बंद झाली पाहिजे.नशा ड्रग बाहेरदेशातून,आयात निर्यात पुर्णपणे बंद झाला पाहिजे।तो शासना कडूनच बंद झाला पाहिजे.
तरच हे विष समाजात पसरणार नाही.व नशेच्या आहारी जाणार नाही.आपल्या भारतात गरीबी वाढत आहे.त्याचे कारणे नशा आहे.अाणि आत्महत्याचेही प्रमाण वाढले आहे,त्यासाठी नशा,दारू हीच जवाबदार आहे.आधी दारूबंदी व्हायलाच पाहिजे.
माझी आजच्या तरूनांना एकच गोष्ट सांगायची आहे
"आजची तरुणाई तुम्हाला उद्या
घडवायचा आहे रे देश,परीवार
कश्याला पाळता हे जहरी व्यसन
करतोय घात हा नशा तुमचा संसार"।।
"विळखा मादक विषाक्त पदार्थाचा
होतसे उत्पादन तरुणाईला मारण्या
नसातून वाहतोय हा ड्रगचा नशा
कसा तडफडतो हा जीवन जगण्या"।।