Priyanka Kumawat

Tragedy

4.0  

Priyanka Kumawat

Tragedy

नकोशी सांजवेळ

नकोशी सांजवेळ

4 mins
293


राधा सांजवेळी चहा पीत बसली होती. कधी काळी तिला ही सांजवेळ हवी हवीशी वाटे. तिला दिवसातला हीच एक वेळ होती जी खूप आवडे. पण आता सगळे बदललेले. ही सांजवेळ आता तिला नकोशी असे. रोज ची सांजवेळ घेऊन यायची काही कटू आठवणी. तिला नको असले तरी तो प्रसंग तिच्या डोळयासमोर तसाच उभा राही आणि नकळत ती भूतकाळात जाई.


राधिका आणि राज त्यांचे कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षापासूनचे प्रेम. तो लाडाने तिला राधा म्हणे दोघांच्या सवयी, आवडी निवडी एकदम सारख्या. जसे दोघे एकमेकांसाठीच बनलेले. कॉलेज संपले, दोघांना वेगवेगळ्या कंपनीत जॉब लागला. पण ते दोघे न चुकता भेटत असे. दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली. घरच्यांना मनवणे, समजावणे, रडगाणे सगळे झाले. घरच्यांकडून पण बंदी, समजावणे, मारझोड सगळे झाले. पण दोघांनी ठरवलेले काहीही झाले तरी एकमेकांना सोडायचे नाही. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केले तेव्हापासून घरचेपण दुरावले. सुखदुःखाला एकमेकांच्या सोबतीशिवाय दुसरे कोणीही नव्हते.


राजा-राणीचा संसार होता पण तिथे चुकलेले समजावून सांगायला कोणीच नाही. त्यांना ते दोघे सोबत आहे याचा आनंद तर होता पण सोबत घरचे नसल्याचे दुःखपण. ते दोघे ही उणीव एकमेकांच्या प्रेमानेच भरून काढण्याचा प्रयत्न करे. दोघांनाही सांजवेळ खूप आवडे. ऑफिसमधून वेळेवर निघून दोघे ६ वाजता चहा सोबतच घेत. चहा घेता घेता त्यांचे फेवरेट गाणे "जब कोई बात बिगड़ जाये" ते ऐकायचे. काहीही झाले तरी दोघेही वेळ कधी चुकवत नसत. बाकी सगळे खूप उत्तम होते. दोघांना पण कामामध्ये चांगले प्रमोशन मिळत होते. येत्या बुधवारी त्यांच्या लग्नाला २ वर्षे होणार होती. राधाने त्याला छान सरप्राईज दयायचे ठरवले.


ती प्रेग्नेंट होती. तिने ठरवले की त्याच दिवशी राजला सांगू. संध्याकाळी ऑफिसवरून येऊन छान घर सजवून त्याच्या आवडीचे जेवण बनवायचा बेत तिने आखला. बुधवारी तिने त्याच्या समोर ऑफिसला जायचे नाटक केले पण तो निघाल्यावर ती संध्याकाळच्या तयारीला लागली. हॉल तिने डेकोरेट केला. केक बनवला, मग दुपारी जेवण करून संध्याकाळचा स्वयंपाक बनवून ठेवला. ३ वाजून गेले तशी छान तयार झाली कारण तिला माहीत होते की तो लवकर घरी येईल. इकडे राजने पण लवकर घरी जाऊन तिला सरप्राईज द्यायचे ठरवले. तो ३ वाजताच निघाला. त्याने आधी अंगठी घेतली. जी तो तिला देणार होता.


घरी जाऊन काय काय करायचे हा विचार मनात येऊन हसतहसत आपल्याच धुंदीत तो गाडी चालवत होता. अंगठी बघून तो विचार करत होता की ती खूप खुश होईल. एक मुलगी फोनवर बोलत रस्ता ओलांडत होती. तिच लक्ष याच्या येणाऱ्या गाडीकडे नव्हते. राजच लक्षपण अंगठीकडे होते. इतक्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले पण तिथपर्यंत तो तिच्यापर्यंत पोहचलेला. त्याने मागचा पुढचा विचार न करता गाडी उजवीकडे वळवली आणि समोर येणाऱ्या मालट्रकवर त्याची गाडी धडकली. धडक इतकी जोरात होती की राज जागीच गेला. बघणाऱ्यांची गर्दी जमली पण जवळ कोणी जात नव्हते.


त्याच्या ऑफिसमधला समीर गर्दी बघून पुढे आला आणि राजला बघून हादरला. त्याने घाईने त्याला गाडीत घालून हॉस्पिटलला गेला पण डॉक्टरांनी त्याला डेड आहे सांगितले. काय करावे त्याला सुचत नव्हते. त्याने ऑफिसमधल्या राजच्या मित्राला फोन करून बोलावले. त्याला राजचे घर माहीत होते. ते राजची बॉडी घेऊन निघाले. इकडे राधा छान तयार होऊन बसली. ५.४५ झाले अजून कसा हा आला नाही, आला की त्याला ओरडतेच आज अजून लवकर यायचे महणून. स्वतः शीच ती बोलत होती. चहा तयार ठेवू महणून तिने चहा करायला घेतला. तिला अॅम्बुलन्स चा आवाज आला. ती विचार करू लागली की काय झाले असेल? कोणाकडे आलीय? बाहेर जाऊन बघू का? पण ती म्हणाली की आजचा छान दिवस मला असे काही पाहायचे नाही.


चहा ठेवला आणि हॉलमध्ये आली. इतक्यात बेल वाजली. ती खूप खूश झाली. तिने त्यांचे फेवरेट "जब कोई बात बिगड़ जाये" गाणे लागले. आरश्यात एकदा स्वतःला बघून दरवाजा उघडला आणि उघडल्या उघडल्या जोरात सरप्राईज म्हणाली. पण समोर राजच्या मित्राला बघून चाचरली. म्हणाली की मला वाटले राज आहे. त्या मित्राने तिला हाताला धरून आत घेऊन आला. ती विचार करू लागली की हा माझा हात का धरतोय. ती बोलणार तितक्यात राजची डेड बॉडी आत आणली गेली. ती झाकली असल्याने ती त्या मित्राला विचारू लागली की कोण आहे हे, इथे का आणलेय? राज कुठेय? हॉलला सजवलेले पाहून आणि तिच्याकडे पाहून त्याला कळतच नव्हते की काय बोलू. ती आ वासून त्याच्याकडे पाहू लागली.


तो म्हणाला की आपला राज गेला. ती शॉक झाली म्हणाली की काय बोलतोयस काही पण? त्याने बॉडीवरचा कपडा काढला. समोर राजला पाहून तिला धक्का बसला. ती जोराने ओरडली.... अगदी आजसुद्धा...


तितक्यात डॉक्टर धावत आले. सगळे तिला धरू लागले. पण ती जिवाच्या आकांताने ओरडत होती. त्यांनी तिला झोपेचे इंजेक्शन दिले. तिला झोपवून डॉक्टर दुसऱ्या पेशंटकडे गेले. आजूबाजूचे पेशंट ओरडू लागले, कोणी खी खी हसू लागले. बाकी स्टाफ त्यांना शांत करू लागला. ६ वर्षे झालेले राजला जाऊन पण आजही ६ वाजता ते आठवून ती ओरडायची.

त्यानंतर ती वेडसर झाली. वेड्यांच्या दवाखान्यात भरती होती पण डॉक्टरांना तिचा इलाज अजून सापडला नव्हता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy