Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

veena joshi

Tragedy

5.0  

veena joshi

Tragedy

नको रे पावसा

नको रे पावसा

3 mins
1.3K


आज नीरजा जरा ऑफिसमधून लवकरच आली होती. आजीने दिलेला चहा आस्वाद घेत घेत ती पीत होती. इतक्यात तिचे अंग थरथरायला लागले. नजर अगदी भयभीत झाली कारण पाऊस जोरात सुरु झाला होता. ती घाबरतच आत येऊन तिने अंथरुणावर अंग झोकून दिले. तिला बघताच नेहमीप्रमाणे आजी-आजोबा घाबरले.


आजीला कल्पना आलीच होती. पावसाळा आला की नीरजाला नेहमी असेच व्हायचे. सुरुवातीला आजीला वाटे हिला हवामान सहन होत नसेल पण कारण मात्र वेगळेच निघाले. नीरजा आपली पूर्ण कहाणी सांगूनच ती आजी-आजोबांकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला आली होती पण आजी-आजोबांना काहीच प्रॉब्लेम नसल्यामुळे गेली 10 वर्षे ती तिथे राहात होती. 


एका सुखवस्तू गावाकडील कुटुंबात नीरजाचा जन्म झाला. पाच काकांचे कुटुंब, सगळे बहीण-भाऊ, नोकर-चाकर एकत्र राहत लहानपणापासूनच नीरजाला पावसाचे फार आकर्षण होते. सगळे भावंड मस्त पावसात भिजायचे व नंतर अंगणातल्या विहिरीवर आंघोळ करून आत यायचे. मग मस्त नास्ता भजी नि धम्माल. काही दिवसांत नोकरीनिमित्त नीरजाचे कुटुंब शहरात आले. शाळा सुरु झाली. इथेपण नीरजा मस्त रमली. मित्र-मैत्रिणी बोलक़्या स्वभावामुळे खूप खूप जमली.


पाहता पाहता दिवस जात होते. कॉलेजचे मित्र-मैत्रिणी सगळे मिळून कॅॅम्प-सहल-हिल स्टेशन हे सगळे चालू होते. आई-वडिलांचा धाक तर होताच पण पूर्ण विश्वासपण होता नीरजावर म्हणून ती हे सर्व करू शकत होती आणि तेही पावसाळ्यात!


आज कॉलेजचा कॅम्प होता. पावसाळ्यातील वृक्षारोपण एक वेगळयाच पद्धतीने करण्याचे ठरले होते. 4 ते 5 कॉलेजची ठराविक मुले-मुली त्यात इनव्हॉल होती. ठिकाण होते फार्महाउस. नेहमीप्रमाणे बाबाची ना नव्हती. ठरल्याप्रमाणे सगळे एकत्र जमले. एक मुलगा नि एक मुलगी दोघा-दोघांनी एक झाड़ लावायचे होते. त्याप्रमाणे जोडया पाडण्यात आल्या होत्या.


नीरजाच्या पार्टनरचे नाव होते नीरज. सगळ्यांना आश्चर्य वाटले नीरजा नि नीरज किती सुंदर!! विशेष म्हणजे झाडे लावताना रिमझिम पाऊस पडत होता. झाडे लावता लावताच दोघे एकमेकांकडे आकृष्ट झाली. वय आणि सौंदर्य दोन्ही जबाबदार होते बहुदा!! आणि रिमझिम बरसणारा पाऊस सगळे वातावरण कसे अनुकूल...


यानंतर सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण झाल्या. जसे बाबाची भेट, दोन्हीकडून होकार इत्यादी... मग दोघांचे भटकणे हे सगळे इतक्या लवकर झाले की लगेच दिवाळीनंतर लग्नाचे निश्चित झाले. अजून पावसाळ... नीरजाचा आवडता ऋतु चालूच होता. चिंब पावसात भिजणे, पाणी उडवणे, नाचणे अगदी कसे लहान मुलासारखे...


तो दिवस रविवार होता. बाबांची संमती घेऊन पावसात भटकायला जायचे ठरले. खूप धोधो पाऊस बरसत होता. पण बाबांना नीरजाची आवड माहित असल्याकारणास्तव केवळ हळू जा, असेच बाबांच्या तोंडून निघाले होते. बस्स नीरजा आणि नीरज लॉंंग टूरवर निघाले. हल्केफुल्के वातावरण... सुमधूर संगीत... नीरजला वाटले आपण स्वर्गात आहोत की काय... रस्ता पण वळणाचा होता. अचानक गाडीचे ब्रेक... आई ग!!! टायर बसले होते.


नीरजला खाली उतरावं लागले आणि काय होतंय हे कळते तोच नीरज पाय घसरून खाईत पडला. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. नीरजा आरोळी ऐकून बेशुद्ध पडली. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती दवाखान्यातील बेडवर होती. तिला कळले सारे काही संपले होते.

  

कुणाचीच चूक नव्हती. हे सारे विधिलिखित... त्यामुळे पोलिस केस वगैरे झाली नाही. दुःख याचे की बॉडी मात्र सापडली नाही. कालांतराने सगळे मागे पडत गेले नीरजाला सगळयांनी समजावले पण तिने लग्न न करण्याचे ठरवले.


आणि म्हणूनच आज ती नोकरीनिमित्त पेईंग गेस्ट म्हणून आजी-आजोबांकडे होती. मात्र पावसाळा आला की तिला धड़की भरायची आणि ती नुसती धुमसतच राहायची. तिला काहीच सुचायचे नाही. म्हणतात ना काळ त्यावर औषध असते. पण इतकी वर्षे लोटली तरी नीरजाच्या बाबतीत तसे घडले नाही. असे हे किती दिवस चालणार, हे तिलाही माहित नव्हते...

कदाचित आयुष्याच्या अंतापर्यंत!   


Rate this content
Log in

More marathi story from veena joshi

Similar marathi story from Tragedy