नजर
नजर
डोईवर तळपणारे ऊन. अवघड वाट आणि पाण्यासाठी रोजचीच वणवण. डोईवर आणि कमरेवर पाण्याचा हंडा. घरी तान्हुल्याला एकटे ठेवून तिची रोजचीच पाण्यासाठी भटकंती. भरलेले हंडे आणतांना हिंदकळणाऱ्या पाण्याने ती भिजणारच.
पण वाटेवरच्या टपरीवर बसून तिला आशाळभूत नजरेने पाहणे आणि अचकट विचकट बोलणे ही आंबटशौकीनांची करमणूक आहे. कारण त्यांच्या नजरेला तिच्यातील आई कधी दिसलीच नाही.
