नियती प्रेमाची
नियती प्रेमाची
मंजिरी मँडम...
हाँ गोविंदा
तुम्हाला कुणीतरी भेटायला आलंय..
कोण आलंय
नाव नाही सांगितलं त्यांनी त्याचं
मग मला कसं कळेल कोण आलंय ते बाहेर?
अं हं...
काय झालं रे?
अहो मँडम मी त्यांना त्याचं नावच विचारलं होतं सर्वात आधी पण ते म्हणाले नाव सांगितलं तर मँडम भेटायला बोलवणार नाही...
बरं तु जा आणि त्यांना सांग नाव न सांगता ही भेटता येणार नाही..
आणि मी जरा महत्तवाचं काम करत आहे आता एक तास काही महत्तवाचं नसेल तर कोणाला आत पाठवु नको आणि ती जलशिवाराची फाईल प्लीज आणुन देना
हो मँडम लगेच आणतो..
गोविंदा निघुन गेल्यानंतर मी विचार करत होते नक्की कोण आलं असेल भेटायला
पण मग पुन्हा कामला लागले.
पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती माझ्यावर अर्थात मी जिल्हाधिकारी होते.
समाजासाठी स्वतःला झोकून दिले होते मी ,कामापलीकडे दुसरं काही कामच नव्हतं मला. एक विचार फक्त मनात येऊन गेला म्हणजे कोण आलं असेल बाहेर
त्याचं काही महत्तवाचं काम असेल तर...
कदाचित कोणाच्या भीतीमुळे तो नाव सांगत नसेल ..
अरे पण नाव सांगितल्यावर मी भेटणार नाही....
म्हणजे कोणीतरी ओळखीतला असावा पण मग कोण?
आत येऊ का मँडम?
गोविंदा, विचारतोस काय रे
सांगितलंय ना तुला न विचारता येऊन जायचं
तसं नाही हो मँडम तुम्ही महणालात ना महत्तवाचं काम करताय म्हणुन बाकी काय नाही.
ही तुमची फाईल
हो ठेवून दे
अजुन काही काम आहे का?
एक काम कर बाहेर जो माणुस आलाय ना त्याचा गुपचुप फोटो काढुन आणुन दाखव मला
बरं मँडम, मस्त आयडिया सुचली तुम्हाला...
असंच नाही ना अधिकारी झालात तुम्ही...
आलास का..
बघु फोटो...
मोठा निश्वास टाकत...
बरं जा मग तु आता...
काय झालं मँडम ओळखता का तुम्ही यांना
अहो,मँडम काय झालं का रडताय तुम्ही
सॉरी, माझं काही चुकलं असेल तर...
पाणी पिऊन..
गोविंदा,तुझं काय नाही चुकलंय
तू जा आता तुझी काम उरकुन घे.
ओके,मँडम...
माझ्या आयुष्याचा भूतकाळ आज पून्हा माझं आयुष्य उध्वस्त करायला बाहेर आला होता.
पण यावेळी ते त्याला शक्यच नव्हतं..
मँडम....
हाँ...
वर्माजी आईए ना..
सॉरी मँडम मैं बिना बताए ही आ गया वो काम ही कुछ ऐसा था
हा, कोई बात नहीं बताईए क्या काम था?
वो मेरी बिटीयाँ को भी आपके जैसे अफसर बनना है
उसने अभी बारहवीं की परिक्षा दी है।
अच्छा आप एक काम करीएगा उसे रविवार को घर लेके आना मैं बात कर लूंगी उससे....
ठीक है तो मैं चलता हूँ
जी.
तसं बघायला गेलं तर रविवारी नावाची सुट्टी असते.
घरून का होईना कामं करावीच लागतात.
मँडम...
हाँ, गोविंदा ऑफीस टाईम संपलंय
बरं मग काय करू मी?
मी जाऊ का मँडम घरी?
हो तू पण जा आणि त्या माणसाला ही घेऊन जा...
तुम्हाला कसं कळलं तो माणुस अजून ईथेच आहे म्हणुन?
गोविंदा अरे माणसं येतात की मला ओळखता...
बरं येतो मी..
तुम्ही पण लवकर आवरून घरी जा...
हो...
बाय...
घरी? घरं कसलं ते
कोणीच तर वाट पाहणारं नव्हतं
घरी जाऊन केलं ही काय असतं मी....
काम करता करता 11 वाजुन गेलं...
मी घरी जायला निघाले तोच सत्या माझ्यासमोर येऊन उभा राहीला...
हे बघ मंजिरी मी भुतकाळाविषयी काहीही बोलायला आलो नाहीए..
माझी मुलगी रेवा तीचा मोठा ऑपरेशन करायचा मला 10 लाख रूपये उधार म्हणुन दे
या शहरात एवढी मोठी रक्कम तूच मला देऊ शकते दुसरं कोणी नाही. गेल्या चार दिवसांपासुन पैश्यांसाठी फिरतोय मी...
प्लीज मंजिरी i need your help please...
अकाउंट नं सांग...
642*******
केलंय मनी ट्रान्सफर
काळजी करू नको सगळं ठिक होईल
मी येईल तिला भेटायला
कुठल्या हॉस्पिटलला आहे ती?
सिटी हॉस्पिटला आहे ती..
बरं तुझं नं दे मी येण्या आधी फोन करून येईल..
हो घे ना..
88********
Ok जा मग रेवाला तुझी गरज आहे.
हो, थँक यू सो मच मंजिरी
It's my pleasure...
सत्या...
माझा जिवलगा होता
त्याने सोनालीसाठी मला सोडुन दिलं होतं
धोखा दिला होता त्याने मला प्रेमात
सोनाली सोबत चार वर्षापूर्वी अगदी थाटामाटात लग्न केलं होतं त्याने,
सोनाली खुप पैसैवाली ना म्हणुन मला सोडुन त्याने तिच्याशी लग्न केले.
वक्त वक्त की बात हे बाबू...
ज्या पैश्यासाठी त्याने मला सोडलं तोच पैसा आज त्याला माझ्या जवळ घेऊन आला..
नियती बरोबर सर्वांचा हिशोब करते....
