नासा येवतीकर

Inspirational

2.1  

नासा येवतीकर

Inspirational

निसर्गरम्य व डिजिटल शाळा

निसर्गरम्य व डिजिटल शाळा

4 mins
1.2K


शिरपुर शाळेतील मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि एक मैडम आज सकाळी सकाळी गावात आले होते. तशी तर शाळा सकाळी नऊ वाजता भरते पण आज सर्व जण सकाळी का आले असतील म्हणून गोविंदराव म्हणाले, " रामराम गुरूजी, आज खुप लवकर आलात, काय काम काढले ? " यावर मुख्याध्यापक म्हणाले, " काही नाही हो, आपली शाळा निसर्गरम्य आणि डिजिटल करायची आहे. त्यासाठी गावातील लोकांची मदत घ्यावी म्हणून वर्गणी गोळा करण्यासाठी आलो आहोत." 

"बरे, बरे " असे म्हणत गोविंदराव हळूच बाजूला झाले. तेवढ्यात शाळा व्यस्थापन समितिचे अध्यक्ष आणि इतर मंडळी आले. मग सर्वानी मिळून गावात फेरफटका मारण्यासाठी निघाले. 

शिरपुर हे जेमतेम 100 घराचे आणि एक हजार लोकसंख्या असलेले गाव. दोन गावात मिळून असलेली गटग्रामपंचायत आणि दोन्ही गावात सरकारी शाळा अस्तित्वात होत्या. पण शिरपुरच्या शाळेत मुलांची संख्या बऱ्यापैकी असल्यामुळे शिक्षकांची संख्या चार होती. गावातील सर्व लोक खुप चांगल्या स्वभावाचे होते. कुणी ही शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांविषयी ब्र काढत नसत कारण शिक्षक मंडळी सुध्दा आपले काम अगदी नेटाने करीत होते. तालुक्यातील सर्व शाळा जवळपास डिजिटल झाले होते. काही शाळा शिल्लक होत्या त्यात शिरपुरची शाळा ही होती. सर्व अधिकारी मंडळी शाळा डिजिटल करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मागे हात धुवून लागले होते. त्यामुळे नाईलाजास्तव मुख्याध्यापकास शाळा डिजिटल करण्यासाठी गावात पाऊल ठेवावे लागले. सर्वप्रथम शाळेतील शिक्षक मंडळी आपल्या पगारीतून डिजिटल शाळेसाठी काही रक्कम दिले. पण डिजिटल आणि निसर्गरम्य शाळेसाठी जो खर्च येणार होता तो खुप होता त्यासाठी ही मदत खुपच कमी होती. शासनस्तरावरुन तर काहीच मिळत नव्हते. काहीही करा पण शाळा डिजिटल करा असा तगादा मात्र सतत लावले जात होते. ग्रामपंचायत कडून देखील काही निधि मिळणार होता पण कधी मिळणार हे नक्की नव्हते. 

सर्वप्रथम गावातील प्रसिध्द व्यक्ती म्हणून ज्यांची ख्याती होती अश्या नारायणरावाच्या घरी पोहोचले. डिजिटल शाळेविषयी संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सर्व बाबी नीट समजून घेऊन लगेच हजार रू. काढून दिले. वर्गणी गोळा करण्याची सुरुवात अगदी छान झाली होती. तेथून ही फौज श्यामरावाच्या घरी पोहोचली. शाळेच्या प्रगतीसाठी श्यामराव अनुकूल होते त्यामुळे त्यांनी क्षणाचा विचार न करता हजार रु. काढून दिले. सर्वाना आनंद वाटले. पाहता पाहता त्यादिवशी बरीच रक्कम गोळा झाली. सर्वजण शाळेत आली. शाळा कश्याप्रकारे सजवायची यावर सर्वांनी चर्चा केली. खरे सरांनी शाळेच्या आवारात विविध झाडे लावण्याची संकल्पना मांडली. सर्वांना त्यांचा मुद्दा पटला होता, अर्थातच झाडं आणण्याची जबाबदारी खरे सरांवर पडली. ती त्यांनी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी खरे सर जवळच्या नर्सरीमध्ये गेले आणि विविध प्रकारचे झाडं घेऊन शाळेत आले. शाळेच्या मैदानात अगोदरच खड्डे करण्यात आले होते. सर्वांनी मिळून वृक्षारोपण केले. आता त्या वृक्षांची काळजी घेणे आवश्यक होते म्हणून शाळेतील काही जबाबदार विद्यार्थ्यांना त्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली. विद्यार्थी देखील।खुशीने तयार झाली. सर्व मुलांना सूचना देण्यात आल्या की, सायंकाळी घरी जातांना आपल्या पाणी बॉटलमध्ये शिल्लक असलेलं पाणी कुठे ही न फेकता झाडाला टाकायचं. विद्यार्थी सूचनेचे पालन करीत होते. काही महिन्यात झाडांची चांगली वाढ होत असलेले दिसून आले. यादरम्यान गावातील काही मंडळींचे शाळेत येणे जाणे झाले. त्यांनी शाळेतील झाडे पाहून आनंद व्यक्त केला. गावातील शाळा कात टाकत आहे, हे लोकांना कळायला वेळ लागला नाही. काही जागरूक नागरिक आणि युवकांनी पुढे येऊन शाळा रंगरंगोटी करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी गाव सोडून गेलेल्या गावात ज्यांचा संपर्क आहे त्यांना एकत्र करून माझी विद्यार्थ्याचा मेळावा घेतला आणि बऱ्यापैकी मदत गोळा केली. काही दिवसांनी शाळेची रंगरंगोटीला सुरुवात झाली. पाहता पाहता शाळेचा रंगरूप बदलून गेले. झाडं चांगले मोठी झाली होती त्यामुळे निसर्गरम्य वातावरण दिसू लागले. दिवाळीच्या सुट्या लागल्या. या सुट्टीत शाळेची व झाडांची देखभाल करण्याचे काम विद्यार्थ्यांना देण्यात आले. ते काम त्यांनी चोखपणे पार पाडली. गावातल्या लोकांमध्ये आता शाळेविषयी खूप लळा निर्माण झाला. दिवाळीनंतर शाळेला सुरुवात झाली. अधिकारी वर्ग शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. फक्त एकच कमतरता जाणवत होती ती म्हणजे शाळा डिजिटल झाली नव्हती. ग्रामपंचायतीच्या राजकारणामुळे शाळेचा पैसा शाळेला मिळाला नव्हता. अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं असे मुख्याध्यापकांनी विनंती केली. त्यांची विनंती खरोखरच कामाला आली. काही दिवसांतच शाळेला ग्रामपंचायतीकडून होकार मिळाला. लगेच डिजिटल साहित्य खरेदी करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिनी अनेक मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शिरपूरच्या निसर्गरम्य, डिजिटल, आणि सुंदर शाळेची प्रसिद्धी तालुक्यात झाली. विद्यार्थी देखील खूप हुशार होते त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत देखील वाढ होऊ लागली. गावात येणारे नातेवाईक शाळेला पाहून गावकाऱ्यांची प्रशंसा करू लागले. झाडांची महती मुलांना कळाली त्यामुळे पुढच्या वर्षी प्रत्येक मुलांनी आपल्या घराच्या आजूबाजूला आणि शेतात झाडं लावली, ती जगवली. काही वर्षांपूर्वी ओसाड आणि वाळवंटासारखे दिसणारे शिरपूर झाडांनी बहरून आले होते. झाडांमुळे त्या गावाची शोभा देखील वाढली होती. शाळेला आणि गावाला काही दिवसांतच शासनाचा उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला. शाळेनेच आम्हाला हे वैभव प्राप्त करून दिलं असे सरपंचांनी आपल्या भाषणात बोलले त्यावेळी मुख्याध्यापकांची छाती गर्वाने फुलून गेली होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational