निर्माल्य
निर्माल्य
एक आजोबा अतिशय चांगल्या घरातील दिसत होते, पण गेले 4 महिने झाले मी त्यांना बस स्थानकावरच झोपलेलं पाहिलंय, सकाळ झाली की स्थानकावर येणाऱ्या लोकांकडून पैसे मागायचे, कोणी कोणी शिव्या द्यायचं त्या आजोबांना, पण सगळेच जण काय माणुसकीहीन नसतात ना, त्यामुळं काहीकाही जण कुठे पाच रुपये, कोणी एक रुपया असं त्यांच्या हातावर ठेवायचे... मी सुद्धा बरेच वेळा त्यांच्या हातावर रुपये ठेवले.. एकेदिवशी असं कळलं की ते आजोबा खूप चांगल्या घरातील आहेत, पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना हाकलून दिलंय, त्यांची सर्व हकीकत कळल्यावर माझ्या मनातच मी म्हणाले की, हल्ली, खरंच म्हातारं माणूस आणि निर्माल्याचं फुल यामध्ये शून्य फरक झालाय...
