Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

akshata kurde

Tragedy Others


2  

akshata kurde

Tragedy Others


निर्दयी..

निर्दयी..

2 mins 3.0K 2 mins 3.0K

बास करा आता.. अजून किती ती क्रूरता दाखवणार तुमच्यातली.. दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जाऊन इतकं घृणास्पद कृत्य करत आहात. हत्तीणीसोबत जे झाल इतकं भयंकर होतं की वाटलं कदाचित तिला झालेल्या यातनेने यावेळी तुमच्या मनाला पाझर फुटून आम्हाला सोडाल. पण तुम्ही पुन्हा तेच केलं.


कोणी मायेने हात जरी फिरवला तरी त्याला आम्ही आपलंसं करतो.. तुम्हाला काही मागत नाही.. बोलत नाही.. उलट जितकं आमच्याकडून तुम्हाला मिळत ते सतत तुम्ही घेत राहता.. मग गरज संपली की आम्हाला मारझोड करता.. खाऊ पिऊ देत नाही.. का आम्ही नाही थकत का..?


घातलं खाऊ मला त्याने आणि मीदेखील लगेच त्याच्या प्रेमाला भुलून दिलेलं खाल्लं. मला काय कळणार त्यात विस्फोटक आहेत की काय.. नुकताच इतका भयंकर प्रसंग होऊनदेखील मी मागचा पुढचा विचार न करता त्याने दिलेलं खाल्लं.. काही वेळाने फुटला तोंडात विस्फोटक माझ्याही.. चेहरा रक्तबंबाळ झाला.. खूप ञास होतोय.. पण सहन करतेय आतल्या बाळासाठी..


माझ्या डोळ्यांत आताही राग नसून फक्त माझ्या बाळाबद्दलची काळजी आहे.. जी सारखी सतावतेय मला.. ती सुद्धा आपल्या बाळासाठी तीन दिवस तशीच पाण्यात उभी राहून होती.. माझ्या पोटातल्या बाळासाठी मीसुद्धा हार नाही मानणार.. त्यासाठी त्रास सहन करतेय.. गेले कितीतरी तास माझे रक्तबंबाळ फाटलेले तोंड घेऊन आहे.. माझ्या मालकाने माझा व्हिडिओ काढून मला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे.. न्याय मिळेलही कदाचित.. पण पुन्हा या गोष्टी होणार नाहीत काय शाश्वती..


मागच्या महिन्यात एका निष्पाप निरागस अशा मांजरीच्या पिल्लाला पायाच्या टाचेने ठेचून ठेचून मारत होते.. ते इवलंसं जीव किती ओरडत होतं.. पण दया नाही आली त्यांना.. त्यांना उलट अशा कृत्याचा अभिमान वाटत असावा म्हणून त्याची ते शुटिंग काढत असावे.. काय झालं मग..? त्यानंतर अजून भयानक प्रकार घडला.. त्यानंतर आज पुन्हा माझ्या बाबतीत तेच.. मला माता म्हणता.. माझी पूजा करता.. लहापणापासून आईपेक्षा जास्त दूध गौमातेच पिता. मग अशी क्रूरता कशी काय करू शकता.. पण कदाचित निर्दयी असणाऱ्याला नसेल काही वाटतं.. मग ते बाप्पाच्या रूपातला मित्र असो किंवा आईसारखी तुम्हाला माया देणारी मी.. शब्द खरेतर संपले आहेत पण तरीही,


निर्दयी मानवा,

आनंददायी ठेवू नकोस तू आम्हा

किमान मोकळा श्वास घेऊ दे...

मुके असलो म्हणून काय झालं

आम्हाला काही क्षण तरी मनमुराद जगू दे..!


Rate this content
Log in

More marathi story from akshata kurde

Similar marathi story from Tragedy