STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Tragedy

3  

🤩ऋचा lyrics

Tragedy

नैवेद्यम् समर्पयामि!!!

नैवेद्यम् समर्पयामि!!!

1 min
300

दोन वेळेसच जाऊ द्या, एकावेळेसच खायला अन्न नाही मिळत भारतीला, नवरा गेल्यावर सासरच्यांनी हिला हाकलून दिल,आणि बिचारीला माहेर तर नव्हतंच, कशीबशी मंदिराच्या आवारात गाणी म्हणून त्यामध्ये मिळालेल्या पैशावर ती उपजीविका करत होती..आज बुधवार असल्याने विठ्ठलाचं छान अस भजन तिने गायला सुरवात केली मंदिरापाशी जाऊन... मंदिरापाशी जमलेल्या काही लोकांनी तिला कोणी एक कोणी आठ आणे दिले आणि तिने जवळच असलेल्या वडापाव च्या गाड्या वरून 1 वडापाव घेतला आणि त्यातील अर्धा वडापाव त्या विठुरायाला प्रसाद म्हणून ठेवला, बाजूलाच पुजार्यांनी पंचपक्वानं अर्पण केली होती, पुजाऱ्याने तिला तिचा वडापावचा तुकडा उचलायला सांगितलं,आणि तिला म्हणाले, परमेश्वराला नैवेद्य लागतो, हे असलं खाद्य नाही चालत..त्यावर ती स्मित हास्यात म्हणाली पुजारीजी, तो ईश्वर प्रेमाचा, भक्तीभावाचा भुकेला आहे,पुजाऱ्यांना त्यांची चूक उमगली. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, आणि तिचा नैवैद्यच सगळ्यांच्या अगोदर दाखवला आणि म्हणाले नैवेद्यम् समर्पयामि!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy