Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

नैवेद्य

नैवेद्य

1 min
233


ते जेमतेम नऊ दहा वर्षाचे पोर. रणरणत्या उन्हात जीवाच्या आकांताने पळत होते. फाटक्या सदऱ्याच्या ओच्यात काहीतरी गच्च धरलेले होते. "चोर चोर, पकडा पकडा" असे ओरडत काही सुसंस्कृत लोक त्याच्या मागे धावत होते.

     धावता धावता ते पोर धप्पकन खाली पडले. त्याच्या ओच्यातील केळीच्या पानात गुंडाळलेला नैवेद्य खाली सांडला. त्याची चूक एवढीच होती पोटासाठी मागून थकल्यावर भुकेने व्याकूळ होऊन देवासमोरचा मुंग्या लागलेला नैवेद्य त्याने उचलला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy