"नाव प्रकाशमान करायचेच"
"नाव प्रकाशमान करायचेच"


संध्या शाळेंची इतर काम संपवत होती, तितक्यात सुधा आपल्या पोरांना घेऊन माहिती-साठी रड़त आली. तिचे यजमान, ते टीजीटी-हिंदी होते, त्यांना आजारपणा मुळे एकाएकी देवाज्ञा झाल्याने त्यांच्या प्रोवीडेंट फण्डाचे रेकॉर्ड बघायचे होते, की त्यांनी नॉमीनी म्हणून कोणाचे नाव लिहिले होते. संध्याने रेकॉर्ड तपासून सांगितले, नॉमीनीमधे सुधाचे नाव नसून, आई-वडिलांचे नाव आहे.
संध्याला तिने सांगितले, सासरच्यांनी तिलाच कारणीभूत समजून माहेरी पाठवून दिले आणि ती नोकरीपण नाही करत, आता कसे होईल. "म्हणूनच आपण-म्हणतो न, वेळ कधीच सांगून येत नाही हो".
तिचे यजमानानवरचे विश्वास हरवले, मनी विचार-करत ...आई-वडिलांना म्हणायची "नावात काय ठेवलंय हो" पण नावाचेच महत्व समजून, मग तिने नोकरी करून त्यांचे नाव प्रकाशमान करायचेच ठरविले.