दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

नात्यातील स्पेस!!

नात्यातील स्पेस!!

3 mins
278


जानवी चे सासर,माहेर योगायोगाने एका शहरातच होते.सासु थोडी तापट म्हणून जान्हवीने एक वर्षातच दुसरं घर घेतलं.तिला एक मुलगा होता.नवऱ्याची नौकरी फिरस्तीची असल्याने आठवड्याचे तीन चार दिवस तो बाहेर असायचा.लहान मुलाला घेवुन एकटं राहण्यापेक्षा जान्हवी आपल्या माहेरी, आईकडेच जास्त दिवस रहायची.आई मुलगाही सांभाळून घ्यायची आणि जान्हवी ला कामातुन सुट्टी मिळुन आराम ही करायला मिळायचा. आईला थोडीफार काही मदत केली की, झाले बाकी तिला काही करण्याची गरजच नसायची.मस्त आरामात गरमागरम जेवण करायचे आणि झोपायचे या गोष्टींची तिला सवयच लागली होती.त्यामुळे तिच्या अंगात पुर्ण आळस भरला होता.

म्हणून तिचा नवरा कामावरून घरी येत असला तरी ती त्याला माहेरीच बोलावून घेत असे.मग जान्हवी ची आई तिथेच दोघांचा स्वयंपाक बनवत असे.आणि मुलगी,जावायाला इथेच जेवुन जा.म्हणुन सांगत असे.किंवा मग डबा बांधून देत असे.


काहीही सणवार असला तरी जान्हवी आणि तिच्या नवऱ्याला आईकडे जेवण असे.नाहीतर आई स्वयंपाक बनवुन,डबा तयार करून मुलाला द्यायला पाठवत असे. असेच हळूहळू पाच वर्षे निघून गेले.जान्हवीचा मुलगा चार वर्षांचा झाला.पण जान्हवी चे वागणे मात्र बदलले नाही. 


कायम माहेरीच आरामात पडलेली असते.असे बऱ्याच वेळा शेजारच्या बायका तिला हसण्यात बोलत असत

" जान्हवी ची काय मजा आहे बाई? रोजच्या कामांचा लोड नाही.आणि राशन, पैसा वाचतो तो वेगळाच फायदा आहे." असे सुद्धा काही फटकळ बायका

 तिला बोलुन टाकायच्या.पण जान्हवी त्यांच्याकडे लक्षच देत नव्हती.तिला वाटायचे आपल्या आईवडिलांचे आपल्या वर प्रेम आहे.त्यांना आपला काही त्रास नाही.मग दुसऱ्यांकडे आपण का लक्ष द्यायचे? 


काही दिवसांनी तिच्या भावाचे लग्न झाले.पण तरीही जान्हवी च्या वागण्यात कुठलाही बदल झाला नाही.ती नेहमी प्रमाणे रोजच आईच्या घरी जात असे.आणि आता तर तिला वाटायचे वहिनी आहेच काम करायला.आधी ती आईला थोडीफार मदत करत असे.पण आता तर तेही करत नाही.कारण काय तर तिच्या अंगातुन काम निघुन गेले होते.ती खुप आळशी झाली होती. वहिनी आहे काम करायला आणि आई तिला मदत करत असते.मग मी का काम करावे असा तिचा विचार होता.


घरात सुन आली.म्हणुन आता तरी जान्हवी ने सतत माहेरी न राहता आपल्या घरी जावे असे आईला वाटायचे.नणंदेची सर्वी कामं,नेहमीचा डबा करून नवीन वहिनीला कंटाळा यायचा.पण ती कधी बोलुन दाखवायची नाही.हे आईला समजत होते पण एकीकडे मुलगी तर दुसरीकडे सुन अशा पेचात आई अडकली होती.आईला वाटायचे की, जान्हवी ने स्वतः च समजून घेऊन तिच्या या सवयी सोडल्या पाहिजे.पण जान्हवी च्या हे गावीही नव्हते.

ती आपले आरामेआराम आयुष्य जगण्यात खुश होती.


 एका वर्षात भावाला मुलगा झाला.आणि आई वडिलांचे सर्व लक्ष आता सुन आणि नातु वरच केंद्रीत झाले.आता ते जान्हवी शी पहिले सारखे वागत नव्हते.आई तिला पहिल्यासारखे फोन करून आग्रहाने बोलवत नसे.ती आपली पहिले सारखी आली तरी कुणिही तिच्या कडे लवकर लक्ष देत नसे.

तिला पुर्वी सारखे हातात चहा, जेवण मिळत नसे.

ती जायला निघाली की, आई, वडील भाऊ कुणीही तिला थांबवत नसे.आता जान्हवी ला समजले की, माझा सर्व जण कंटाळा करायला लागले आहेत.आई सुद्धा आपली सुन आणि नातु कडेच जास्त लक्ष देते.माझ्या मुलालाही कुणी लवकर जवळ घेत नाही.


या गोष्टी जेव्हा तिने आपल्या नवऱ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.तर त्यानेही तिला तेच सांगितले. " चुकी तुझीच आहे.तु फक्त तुझ्या माहेरच्या सर्वांना गृहीत धरून वागत गेली.तुझा कामचुकार पणाही तुला आडवा आला.तुच सर्वांसमोर तुझी किंमत कमी करुन घेतली.अगं नवीन वहिनी आली.तेव्हाच तु तुझं माहेरी जाणं बंद करायला पाहिजे होतंस.आपल्या माणसांचे आपल्या वर प्रेम असले म्हणून इतका फायदा घ्यायचा नसतो.की, आपल्या लोकांना नात्याची घुसमट वाटायला लागेल.ते बोलुन दाखवत नाही.म्हणुन काय आपण त्यांना समजून घ्यायचे नाही.प्रत्येक नात्याला स्पेस हवी असते.त्यासाठी थोडं दुरही गेले पाहिजे"


नवऱ्याचे बोलणे जान्हवी ला पटले होते.आता तिने माहेरी जायचे बंद केले होते.कधीतरी चार सहा महिन्यांनी एकदाच जाते.तेही एक दोन तासांसाठी 

आई येत असते तिला भेटायला.आईला ही बरं वाटलं आता हे पाहून की, जान्हवी तिच्या घरी रमली आहे.

जान्हवी ला ही आता कळले होते की,रोजचे भेटणे म्हणजे काय प्रेम असु शकत नाही.मग ते आई मुलीचे नाते का असेना. थोडे दुर गेल्यावरच प्रेम आणि आपुलकी वाढत असते.आणि नात्यातील ओढ त्या नात्याचा गोडवा अजुन वाढवुन ते नातं घट्ट करत असते.आणि जान्हवी या गोष्टीचा अनुभव ही घेत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational