BHARATCHANDRA SHAH

Abstract

3  

BHARATCHANDRA SHAH

Abstract

*नाते जुळले.. तुटले..माझे नि त

*नाते जुळले.. तुटले..माझे नि त

5 mins
195


वाचक मित्रांनो

प्रेम आंधळे आहे.

हो...अगदी बरोबर आहे. सगळ्यांना माहीत च आहे. सांगायची आवश्यकता नाही.

पण त्याच बरोबर प्रेम जात पात बघत नाही,उच्च नीच बघत नाही,धर्म बघत नाही,देश विदेश बघत नाही,गरीब श्रीमंत बघत नाही,रंग बघत नाही (म्हणजे काळा अथवा काळी ,गोरा अथवा गोरी बघत नाही),लहान की मोठा बघत नाही, विवाहित की अविवाहित की विधुर की विधवा बघत नाही, नातं बघत नाही.आणि म्हणूनच प्रेम आंधळे आहे.

एकदा प्रेमाचे तार जुळले आणि त्यातून प्रेम प्रकट झाले म्हणजे खलास..झालं प्रेम.

प्रेम शब्द ऐकला,वाचला अथवा लिहिला म्हणजे प्रत्येकाच्या समोर अविवाहित मुलगा आणि अविवाहित मुलगी हे दोन पात्र डोळ्यांसमोर येतात.

ते जर नसले तर दोन पात्रांमधून एक विवाहित आणि एक अविवाहित , किंवा एक विधुर एक विवाहित किंवा अविवाहित अथवा विधवा असते किंवा दोघं पण विधुर आणि विधवा असू शकते.

या कथेत दोघं पात्रे विवाहित असून दोघांना एक एक संतान पण आहे आणि विशेष म्हणजे दोघांचे कायदेशीर चे पात्र हयात आहे आणि आनंदाने रहात आहे.

या कथेत कथेचा नायक स्वतःच्या च शब्दात त्याचे विवाहित महिलेशी असलेल्या प्रेम प्रकरण विषयी अनुभव सांगतोय.

सर्वांनी वांचा आणि तुमचा अभिप्राय कळवा. आपल्या मधून बरेच वाचक अनुभवी जिज्ञासू असतील त्यांचा अनुभवाने ते कथेत काय चूक आहे ते सांगतील आणि त्या चुका सहर्ष स्वीकारून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन.

*नाते जुळले.. तुटले..माझे नि तिचे*

*न कळत प्रेम झाले.मला अपेक्षा नव्हती की मनात तस काहीच नव्हत*

आज पासून जवळ जवळ दहा वर्षापूर्वी माझे लग्न अंजना नावाच्या मुलीशी झाले. लग्नात जास्त भपका नव्हता. फक्त नातेवाईकांना च निमंत्रण होते.

लग्नात बायकोच्या दूरच्या नात्यातली एक मुलगी शीतल पण आली होती. दिसायला सुंदर, जोरदार लटके फटके , बोलण्यात माधुर्य,चालण्यात नखरा,स्वभावात चंचलपणा कोणीही मुलगा तिच्यावर लट्टू होईल असे व्यक्तिमत्व. बायकोने एकदाच ओळख करून दिली. तिने मधुर हास्य केले. माझ्याशी हाथ मिळवला आणि शुभेच्छा दिल्या नंतर चालली गेली.

तब्बल पांच वर्षांनी पत्नीच्या एक जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात आली होती. मी पण आलोय असे तिला कळलं आणि धावतच मला भेटायला आली. तेच माधुर्य,तेच रंग रूप,तोच गुलाबी चेहरा सर्व काही तेच.एक इंच पण फरक नव्हता. ह्या वेळी तिने माझ्याशी जास्त वेळ घालवला. बोलण्या बोलण्या वरून विषय प्रेम,रोमान्स वर आला. तिच्या बोलण्यावरून एवढं समजल की तिला प्रेम,रोमान्स मध्ये जास्त रुची आहे. तिचा नवरा पक्का बिझनेस मन म्हणून तिला वेळ देत नसावा असे मला वाटल्या वाचून राहिले नाही. माझा अंदाज खराच ठरला.

ती पण माझ्या पत्नीच्या बरोबरीची होती. नात्याने दोघं दूरच्या बहिणी होत्या.पण मैत्रिणी पण होत्या. तीन वर्ष दोघं एकाच शाळेत आणि एकच वर्गात शिकत होते.

सामान्यतः पत्नीची लहान बहीण अथवा मैत्रीण पाहुण किंवा जिजा म्हणून संबोधतात पण ती मला डायरेक्ट माझ्या नावानेच संबोधन करायची. तिचा काय आशय होता ते मला समजले नव्हते.

ती माझ्या जवळ यायचा प्रयत्न करीत होती. कोण जाणे कोणास ठाऊक माझा मोबाईल नंबर कसा आणि कोठून मिळवला ते कळलं नाही .पण तिने मिळवून घेतला होता. आणि माझ्याशी रोज व्हॉट्स अप वर बोलणं करायची. सुरवातीला मजेच्या गोष्ठी केल्या.हळू हळू ती रोमान्स वर आली. रोज रोमँटिक बोलणं, फोटो, ईमोजी,व्हिडिओ पाठवायची. रोमँटिक शेर शायरी,गाणी पाठवायची.आणि शेवटी तिने हिम्मत करून प्रेमाचा इशारा पण दिला...

ती एका मुलीची आई पण होती आणि मी पण एका मुलीचा बाप होतो.

*मला माहित होते की आमचे प्रेम संबंध जास्त काळ टिकणार नाही तरी पण*...

मी पण तिच्या या वागण्यात ओघळून गेलो होतो. मला भविष्याची चिंता नव्हती. जे होणार ते बघितले जाईल या आशयाने मी तिच्याशी वागत होतो.

त्या क्षणी मी विसरलो होतो की या संबंधाचे भविष्यात काय पडघे पडतील.कितीदा तर तिने प्रत्यक्ष भेटायचा पण आग्रह केला परंतु जमत नव्हतं कारण ती दुसऱ्या शहरात रहात होती. ती एकटी येऊ शकत नव्हती.घरात पाबंदी लावलेली होती. तिच्या स्वातंत्र्य पणा वर लगाम लावली गेली होती.म्हणून ती मला एकटाच तिच्या शहरी बोलवत होती. आमचा हा सिलसिला वाढतच होत. आम्हा दोघांना एकमेका शिवाय चालत नव्हतं. एक दिवस पण तिचा मेसेज नाही आला किंवा मी नाही केला तर आम्ही दोघं कासावीस होऊन जायची. चित्र विचित्र विचार डोक्यात शिरायचे.

तिनं मला एकदा विचारले होते की तुमचे आवडते मराठी गाणं कोणते?

हाच प्रश्न मी तिला विचारला. तिने लगेच उत्तर दिले ते पण स्वतःच्या मधुर आवाजात गायिलेले जे गाणं मराठी कवियित्री वंदना विटणकर

यांनी लिहीलेले आणि जयवंत कुलकर्णींनी गायिलेले आहे ते गाणं.

" नाते जुळले मनाशी मनाचे

फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे

कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी

तुझ्या अंतरीची ही अबोली कहाणी

कसे फुल झाले दिवाण्या कळीचे

जुळे ही मिठी बावर्या लोचनांची

जशी भेट होते नदी सागराची

मनी नाचती हे रंग अमृताचे

उरे ध्यास भवती नुरे भान काही

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही

सखे रूप दिसले मला नंदनाचे

नाते जुळले मनाशी मनाचे.

आम्हा दोघांना असे वाटायचे की किती वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. जणूकाही जन्मो जन्मांतर चे आमचे संबंध.

आमच्या प्रेमाचे आम्हा दोघांशिवाय कोणीच साक्षी नव्हते. नकळत आम्ही दोघं एकमेकांकडे आकर्षित झालो.आमचे संबंध कशे आहेत ते आम्हा दोघांना च माहित होते. तसे पाहिले तर ती पण सुखी घरात नांदत होती.कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. मी पण त्यातला च होतो. पत्नी पण प्रेमाळ होती, जीवापाड प्रेम करणारी होती.मुलगी पण हुशार आणि तिच्या आई सारखी देखणी आणि स्वभावाची होती. तिचे पण असच होत.तरी पण आम्ही का एकमेकांकडे आकर्षित झालो ते अजून मला समजले नाही.

मला माहित होते की आमचे संबंध समाज,परिवार कुणीच स्वीकारणार नाही.पण हे ही खर की आमचे संबंध शुद्ध,निस्वार्थ होते.

२० वर्षापर्यंत आमचे हे प्रकरण चालू होतं. कुणाला च पत्ता लागू दिला नाही एवढी आम्ही खबरदारी ठेवली. स्वतःच्या संसाराला तडा पडणार नाही याची काळजी आम्ही ठेवली होती.

*आणि अचानक*.......*एके दिवशी फोन आला*....

तिचे मेसेज येणं कमी झाले. जी व्यक्ती दिवसातून ५० पेक्षाही जास्त मेसेज करायची ती व्यक्ती दिवसातून फक्त ५-१० मेसेज करायची.फोन वर गोष्टी करणे तिन जवळ जवळ बंद च केलं होत.मी समजलो नाही तिने अचानक असं का केलं असावं? तिच्या घरच्यांना माहित पडल असेल का ? अस मला वाटायला लागलं.

नंतर तर तिने बिलकुल च बंद केले.

काही दिवस नंतर मला माझ्या पत्नी मार्फत कळलं की तिच्या नवऱ्याने दुसऱ्या शहरात स्वतःचा स्वतंत्र धंदा चालू केलाय आणि त्या शहरात राहायला गेलेत.नंतर अजून काही दिवसांनी कळलं की

*ती दुसऱ्या कुणाच्या तरी लफड्यात आहे*???

एके दिवशी भल्या सकाळी माझा मोबाईल वाजला.सकाळी सकाळी कोण असणार? असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. डोळे चोळत मी मोबाईलचा स्क्रीन बघितला..बघून मी चाट पण पडलो आणि थोडा आनंदित पण झालो. फोन उचलण्यापूर्वी माझ्या मनात आले की ती कदाच पश्चाताप करत असेन..माझी आठवणी येत असेल,भेटायचं सांगणार, कदाच माझी माफी पण मागणार की इतके दिवस मेसेज केला नाही,फोन केला नाही

मी अधीरा होऊन फोन उचलला

"मी दुसऱ्या शहरात राहायला गेली.तिथं मला एक दिसायला ,स्वभावाने फार गोड,नम्र असा चांगला सोबती मिळाला आहे.खास तर पैश्याने तो फारच गर्भ श्रीमंत आहे."

एवढं बोलून तिन फोन कट केला. मी तर सूनमुन होऊन बसलो. झोपच उडाली माझी.वेड्या सारखा होऊन गेलो.

चोकवणारी माहिती....विश्वास बसत नव्हता. पण माझ्या जवळ काहीच इलाज नव्हता. अविवाहित असतो तर काही तरी करू शकलो असतो.

माझ्या जवळ फक्त तिच्या सोबतच्या गोड आठवणी उरल्या होत्या. मी सांभाळून ठेवलेले तिचे रोमँटिक मेसेज,फोटो,गाणी,शायरी बघून स्वतःचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत होतो.

रात्री झोपताना फक्त पापण्या बंद होतात पण डोळे उघडे आणि मन पण उघडे च असते तिच्या विचारात.मला तिच्या एका वाक्याने जोरदार झटका दिला ते वाक्य म्हणजे "तो पैश्याने गर्भ श्रीमंत आहे"

ती तर मला आठवत पण नसेल.पण जीवनाची हीच वास्तविकता होती की मी जीवापाड निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम केले होते.आणि आज पण मी तिच्यावर पहिल्या सारखे च जीवापाड प्रेम करतोय. कदाच ती मला भविष्यात भेटली तरी मी अजूनही तयार तसाच प्रेम करणार निष्पाप आणि निस्वार्थ सुडाची भावना न ठेवता. माझ्या तोंडून एक वाक्य निघाले..

"नाते तुटले तिचे नी माझे"...

******* समाप्त*****


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract