BHARATCHANDRA SHAH

Tragedy

3  

BHARATCHANDRA SHAH

Tragedy

वेळेची धार

वेळेची धार

8 mins
242


गेल्या पंधरा दिवसांपासून आदिकराव हॉस्पिटलच्या बिछण्यावर पडले होते. वयाच्या ८५ वर्षी त्यांना न्युमोनिया झाला होता. हॉस्पिटलच्या खाटेवर पडून पडून कंटाळले होते. रोज मुलाचं आणि सूनेच डोक खायचे.

" शालू ,जरा डॉक्टरांना विचार की केव्हा येथून सुटी होईल?'

"बाबा तुम्ही जपा थोड. होईल सुटी. डॉक्टर आले की मी विचारते त्यांना." सून बाई शालू ने उत्तर दिले.

सुनेच्या सांगण्यावरून आदिकराव गप्प पडून राहिले. कुशी बदलत राहिले. त्यांचा लहानपणीचा जिवलग मित्र शामराव पण गावी गेला होता. तो असता तर थोड बर वाटल असतं त्यांना.

छता कडे एकटक बघत बिछान्यावर पडून राहीले.चेहरा निस्तेज होता. काहीतरी आठवत असावे असे बघण्याराला वाटावे. डोळ्यांच्या पापण्या बंद केल्या. त्यांचा समोर त्यांचे जीवन दिसायला लागले.

आदिकराव मानेकर आणि शामराव चितळे लहानपणीचे जिवलग मित्र. एकाच शाळेत पहिल्या इयत्ते पासून मॅट्रिक पर्यंत बरोबर शिकले . वर्गात पण दोघं एकाच बाकावर बसायचे.

दोघं एकाच वर्षी मॅट्रिक पास झाले. त्यावेळी सरकारी नोकरी साठी जास्त खटपट करावी लागत नव्हती. आजच्या सारख्या राज्य स्तरावर परीक्षा होत नव्हत्या. स्थानिक पातळीवरच नोकरीची भरती व्हायची.

मॅट्रिक पास झाल्यावर नोकरी साठी थकून भागून सायकल वर फिर फिरले , भटकले पण थांग पत्ता लागत नव्हता. कॉलेजात जाण्याची इच्छा होती पण त्यांची वडीलांपुढे काही चालायचं नाही.

आदिकरावांची भरती पण अशीच झाली होती. आदिकरावांच्या वडिलांची पाणी पुरवठ्या खात्यात साहेबांशी ओळख होती.घरा सारखा संबंध होता. आदिकराव प्रथम वर्गाने मॅट्रिक पास झाले. साहेबांनी नोकरीसाठी बोलाविले. क्षणाचा ही विलंब न करता आदिकरावांच्या वडिलांनी संमती दिली. कनिष्ठ कारकुन पदी त्यांची नेमणूक झाली.

नोकरीचे दोन वर्ष झाली आणि त्यांच्यासाठी मुली बघण्याच चालू झाले. जवळच्या गावाची चिमणराव पाटेकर ह्यांची वरिष्ठ कन्या सुमन बरोबर आदिकरावांच लग्न लागले.लग्नाच्या गाठ बांधली गेली.

शामराव चितळे ह्यांची पण वीज पुरवठा खात्यात वायरमन म्हणून नोकरी लागली. सहा महिन्यांनी त्यांचे पण लग्न मोतीलाल पांढरे ह्यांची मुलगी पुष्पा बरोबर झाले.

शामराव चितळे ह्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होते . दोघांना चांगले शिकवले. मुलगा इंजिनियर झाला. बेंगलोर मध्ये एका कंपनीत उच्च हुद्यावर नोकरी करत होता. तगडा पगार आणि अन्य सवलती पण कंपनीने देऊ केल्या होत्या. त्याचे लग्न पण एका श्रीमंत बापाच्या मुलीशी झाले.

शामरावांची मुलगी मंदा च पण लग्न झाले. जावई मिलिंद बापाचा व्यवसायात होता. त्याने अजून स्वतःचा व्यवसाय चालू नव्हता केला.

शामराव चितळे ची सून शिल्पा भांडखोर निघाली होती. श्रीमंत बापाची मुलगी म्हणून रोब दाखवायची. मुलगा संदीप शांत समजू आणि आज्ञांकित होता. संदीप आणि शामराव समजावून समजावून थकले होते.शेवटी घटस्फोट घेण्याची वेळ आली.आदिकरावांना हे माहीत पडले. त्यांनी काही पण विचार न करता शिल्पाच्या आई बाबांना भेटले आणि सर्व हकीकत सांगितली. आदिकराव स्वभावाने थोडे संतापी होते आणि स्पष्टवक्ता होते पण त्यांचे हृदय कोमल होते. मनात कुटलेच पाप नाही की कावेदावे नाही,छळ नाही.

" गोविंदराव ,ऐका तुमच्या मुलीला घटस्फोट हवा असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. तिला समजावून समजावून थकलो आम्ही. रोजच्या भानगडी ,रोजची खटपट आहे तिची. आता आम्ही कंटाळलो बुवा . तिचे सासरेबुवा म्हणजे शामराव चितळे थोडे लाजरे स्वभावाचे आहेत. त्यांना हे सर्व आवडत नाही. त्यांना मुल बाळांची फिकर, समाजात नाव बदनाम होईल त्याची भीती म्हणून त्यांच्या जागी मी तुमच्याशी बोलणं करायला आलो आहे.तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा. नाही सांगू शकत असाल तर आजच वकील कडे जावून घटस्फोटाचे कागदे घेऊन येतो.

"आमचा मुलगा देखणा आहे, स्वभावाने शांत, आज्ञांकीत,समजू आहे. तगड्या पगाराची नोकरी आहे. एकुलता एक मुलगा आहे.स्वतःचा फ्लॅट आहे.गावात घर आणि थोडी शेती पण आहे. माझ्या मुलाला दुसरी मुलगी आरामात भेटेन . मुलींची लाईन लागेल दारी. तुम्ही समजता काय स्वतःला."

दरडावून आदिकरावांनी शिल्पाच्या वडिलांना सांगितले.

बस मग काय.. आदिकराव शामरावांचा मुलगा संदीपला घेऊन घरी आले.

पंधरा दिवसांनी शिल्पाचे वडील गोविंदराव अचानक आदिकरावांच्या घरी जाऊन पहोंचले. मुलीने केलेल्या गैरवर्तन बद्दल माफी मागितली.

" चुकल मुलीचं. जे झालं ते विसरा आणि माझ्या मुलीला सून म्हणून स्वीकारा. तुम्ही सांगाल तशी वागेल हो. तुमच्या पुढं हाथ जोडतो क्षमा मागतो मी" गळगळा होऊन गोविंदराव बोलले.

पस्तव्याचे चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

"दुसऱ्यांदा जर असे काही घडले तर तुम्ही मुलीला माझ्या घरी परत पाठवू शकता." गोविंदरावा चे डोळे अश्रूंनी भरलेले होते.

"ठीक आहे घेऊन या मुलीला इथ" आदिकराव म्हणाले.

त्या दिवसापासून आज पर्यंत शिल्पाची कुठलीच तक्रार नव्हती. जिवलगा मुळे च मुलाचं घरसंसार मोडकळीस येता वाचला. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक?..

आदिकराव शहरात कुटुंबासह भाड्याच्या घरात रहात होते. जवळजवळ ३५ वर्षे भाड्याच्या घरात राहीले. निवृत्त व्हायला ३ वर्षे बाकी होते तेव्हा स्वतःचा फ्लॅट विकत घेतला. त्यांना बँकेचं कर्ज घेऊन फ्लॅट विकत घेण्याचा अनेकांनी सल्ला दिला पण त्यांना कर्ज घेऊन फ्लॅट विकत घ्यायचं पसंद नव्हते. भविष्य निधीतून पैसे काढले आणि स्वतःची बचत खर्चून फ्लॅट घेतला होता.

भाड्याच्या घरात राहून केव्हा स्वतःचा फ्लॅट घेतला ते त्यांना कळलंच नाही. जीवनाच्या धावपळीत च ते इतके व्यस्त झाले होते. मुलाबाळांची त्यांना चिंता लागली होती. त्यासाठी पैसे कमवायचे हाच त्यांचा हेतू होता.

मुलगा विनय पण तगड्या पगाराची नोकरी करायचा . बापानं शिकवलं, लहानाचं मोठं केलं, खेळवल, खांद्यावर घेऊन जत्रेला घेऊन जायचे . बापाचं ऋण चुकवायच या हेतूने विनयने नवी कार विकत घेऊन आई बाबांच्या लग्नाच्या वाढ दिवशी त्यांना भेट दिली.

सायकल वर फिरणारे,नोकरीला जाणारे ,कधी कधी पायी चालत जाणारे आदिकराव केव्हा कार मध्ये बसून फिरायला लागले ते त्यांना या जीवनाच्या धावपळीत कळलंच नाही.

एकेकाळी आदिकराव त्यांच्या आई बाबांचे जबाबदार होते केव्हा स्वतःच्या मुलांची जबाबदारी येऊन पडली ते त्यांना या जीवनाच्या धावपळीत कळलंच नाही.

जेव्हा ते बाल्या आणि विद्यार्थी अवस्थेत होते तेव्हा बिन्धास्त झोपायचे. कुठलीच चिंता नव्हती. डोक्यावर आई बाबांचं छत्र होत. कसली काळजी नाही की विचारायचं नाही.

आणि आता जेव्हा स्वतःच्या मुलाबाळांची जबाबदारी डोक्यावर आली तेव्हा केव्हा त्यांची झोप उडाली ते कळलंच नाही.

लहानपणी आणि तरुणपणी त्यांचे काळे आणि घनदाट केसांचा त्यांना अभिमान होता. सिनेमाच्या हिरो सारखे त्यांची केसांची स्टाईल होती. जीवनाच्या धावपळीत काळेभोर केस केव्हा पांढरे झाले आणि झडायला लागले ते कळलंच नाही.

मुलंबाळांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मेहनत केली. सरकारी नोकरी असूनही एका व्यापाऱ्या कडे अर्धवेळ नोकरी करायचे.

" अहो,तुमची सरकारी नोकरी आहे,पगार पण चांगला आहे ,सवलती आहे मग उगाच कशाला दुसरी नोकरी करता? एकच तर मुलगा आणि मुलगी आहे. दोघं हुशार आहे.मुलगी दिसायला सुंदर आहे, सुशील आहे,घरकाम चांगल सांभाळणारी आहे ,ती पण चांगल्या मार्कांनी पास होते मग कशाला जिवाचं राण करता? जे आहे त्याच्यात संतुष्ट रहा. तुमच्या डोक्यावर कोणाचं देणं पण नाही मग का करता एवढी धावपळ?" श्रीमती आदिकराव समजावून सांगत होत्या.

" अग तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण मी काय विचारलं की जो पर्यंत हाथ पाय चालत आहे तो पर्यंत कमवून घ्यायचं मागच्या जीवनात काम लागतील. काही मोठं गडांतर आल तर? कुणाकडे हाथ पुढं करून पैसे मांगायच त्या पेक्षा आपले पैसे असले म्हणजे चिंता नाही" आदिकरावांनी उत्तर दिलं.

मुलंबाळांसाठी कमावत होते. कमावलेला पैसा आणि धन वाचविण्यात मुलबाळ केव्हा त्यांच्याशी दूर झालेत ते त्यांना जीवनाच्या धावपळीत कळलंच नाही.

आजतागायत आदिकराव इतके आजारी पडले नव्हते. थोड फार सर्दी खोकला वगैरे जे व्हायचे ते च त्या शिवाय इतके आजारी पडले नव्हते. जीवनात कधीच हॉस्पिटलच्या पायऱ्या चढले नव्हते आणि आज पंधरा दिवस झाले तरी पण हॉस्पिटलच्या बिछान्यावर पडून होते. ही गोष्ट त्यांच्या मनाला सुई सारखी टोचत होती म्हणून ते फार कंटाळले होते आणि अधून मधून मुलगा आणि सून शिल्पाच डोकं खायचे. आज परत त्यांनी शिल्पाला सांगीतलं की डॉक्टरांशी बोलणं कर आणि केव्हा इथून सुटी मिळणार ते विचार.

तेवढ्यात.......

आदिकरावांचे जिवलग मित्र शामराव चितळे अचानक आदिकरावांच्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडुन खोलीत शिरले. दरवाज्याचा आवाज येताच आदिकराव भाणात आले.त्यांची विचार शृंखला तुटली. भूतकाळातून वर्तमानात आले.

डोळे पाणावलेले होते. डोळे पुसत स्वतःला कसेबसे सावरत उठले आणि जिवलग मित्राला बघून रडायला लागले.जणू मित्राच्या रुपात साक्षात ईश्वरच त्यांना भेटायला आला असं त्यांना वाटतं होत.

शामरावांनी आल्या बरोबर सिंहा सारखी डरकाळी फोडली.

" आदी...खरी मित्रता निभावलीस र..तू..मला शेवटी पारका समजून घेतला. मी तुझा जीवापाडचा मित्र आणि अशीच मित्रता तू निभावली????

"आज पर्यंत तू मला एक पण गोष्ट माझ्या कडून लपविली नाही."

"आजपर्यंत मी तुझी समस्या ती माझी समस्या समजत होतो, तुझे प्रश्न ते माझे प्रश्न समजत होतो ,तुझी चिंता काळजी ती माझी चिंता काळजी समजत होतो,तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी समजत होतो.

मी थोडे दिवस बाहेर गावी काय गेलो आणि तू मला पारका समजून तू आजारी पडला,हॉस्पिटल मध्ये दाखल केलं, पंधरा दिवस झाले असून सुद्धा मला कळवल पण नाही."

"हीच तुझी मित्रता???? "

शामराव हॉस्पिटल मध्ये आल्या बरोबर जिवलग मित्र आदिकरावाचा उघाडा घेतला. आदिकरावांना पुढं बोलूच देत नव्हते. घोड्याला जसे चाबकाने फटके मारतात तसेच शामराव शाब्दिक चाबक्याचे फटके मारत होते.

"अरे शाम्या जरा शांत हो .मला तर बोलू दे..तूच बोलशील का?" आदिकराव विनवण्या करत हळू आवाजात बोलले. अशक्तपणा फारच असल्याकारणाने जोरात बोलू शकत नव्हते.

शामरावचा चेहरा लालबुंद झाला होता.कधी एवढं न रागवणारे शामराव आज एकदम रागात होते.त्यांना शांत करणे म्हणजे वाघाच्या तोंडात हाथ घालण्या सारखं होत.आदिकराव ते करायला पण तयार होते.

" अरे शाम्या, तुझा राग स्वाभाविक आहे.माझी चूक मी स्विकारतो.पण तुला न कळवण्याच कारण एवढच होत की किती वर्षांनी तू तुझ्या मुलाकडे दोन महिन्या साठी राहायला गेला होता.अजून पंधरा दिवस पण झाले नव्हते तुला जायला आणि मी आजारी पडलो.उगाच तुला चिंता काळजी नको म्हणून तुला कळवल नाही रे. मला माहित होत की तुला जर कळवल तर तू नक्कीच धावत आला असता. किती वर्षातून तू गेला होतास मुलाला आणि नातवंडांना भेटायला.

"अरे शाम्या, तुझ्या मुळेच माझ्या मुलीचा संसार वाचला.तू नसता तर माझी मुलगी आज तुला इकड दिसली असती र मित्रा.इतका माझ्यावर उकळू नकोरे बाबा.

"तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहेरी परत पाठवून दिलं होत. तुझी मुलगी समजून तू तिच्या सासऱ्यांशी लढला.जास्त हुंडा मागत होते म्हणून तिला माहेरी परत पाठवून दिले होते.. तू कशा धडा शिकवला तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला ते मला अजूनही आठवत आहे रे. मी तुझा खूप खूप आभार आहेस".

बोलता बोलता आदिकराव गहिवरून आले. डोळे ओले झाले.त्यांना श्वास घेण्यात अडचण होत आहे असे दिसत होते. बराच थकवा जाणवत होता. शरीर एकदम वाळले होते.जणू ज्वारीच्या सोट्या सारखे झाले होते त्यांचे शरीर. कसेबसे बोलत होते.

शामराव अजूनही रागाच्या भरात होते.त्यांचा राग शांत झाला नव्हता. त्यांचे लक्ष मित्र आदिकरावांकडे नव्हते.

" अहो काका, " आदिकरावांची सून शिल्पा नम्रतेने म्हणाली,

" काका , बाबांनी जे सांगितलं आणि जे विचारलं होत ते बरोबर च आहे. तुमची मित्रता ही अजोड आहे. अशी मित्रता आज कुठे बघायला मिळते? मित्र पण स्वार्थी निघालेत.मित्र मित्राच्या पाठीत चाकू घालतात. त्यांना बरबाद करून टाकतात. तुम्ही एक असे आहात. शंभरातून एक दोन च असे निघतात. कृपया तुमचा राग शांत करा. बाबांचं म्हणणं शांततेने ऐकून घ्या.मी तुमच्या साठी चहा आणि नाष्टा आणते.आणि हो..आज हॉस्पिटल मध्ये बाबांबरोबर झोपायची तुमची ड्युटी आहे हो..लक्षात ठेवा.आम्ही कुणीच झोपणार नाही.तुम्ही जाणो आणि तुमचे जीवापाड चे मित्र जाणो." हसत हसत आदिकरावांची सून शिल्पा चहा आणि नाष्टा आणायला निघून गेली.

" शाम्या खरंच रे..जीवनाच्या धावपळीत हॉस्पिटल मध्ये केव्हा दाखल झालो ते कळलंच नाही रे बाबा.." आदिकराव गंभीर तेने बोलत होते. आदिकराव रोज पेक्षा आज जास्त ज गंभीर दिसत होते.

" हम.".शामराव आता थंड पडले होते.

"आणि केव्हा हे जग सोडून जाणार ते पण नाही कळणार रे आदी.."

शामराव रडत रडत बोलले.

दोघं मित्र एकमेकांना आलिंगन देऊन खूप रडले.

अचानक आदिकरावांचा श्वास चढायला लागला. जोरजोराने श्वास घेत होते. श्वास घेण्यात काहीतरी अडथळा निर्माण झाला असावा असं वाटले .ताबडतोब डॉक्टरांना बोलाविण्यात आले. डॉक्टर धावत धावत आले.स्टेथोस्कोप कानात घातला आणि आदिकरावांचा रक्त दाब तपासू लागले. रक्त दाब खूपच कमी झाला होता. शरीरातून घाम निघत होता. शरीर थंड पडत चालले होते. डोळे पण वर चढवून दिले होते.पण त्यांनी जिवलग मित्र शामरावचा उजवा हाथ घट्ट पकडुन ठेवला होता. आणि काही क्षणात च देवाने शेवटी आदिकराव आणि शामराव ह्यांची अजोड जोडी तोडली. शामरावांच्या डोळ्यातून सतत अश्रू धारा वाहू लागल्या. दोघांचे प्रिय गाणं त्यांच्या तोंडातून निघाले.

"तूने ये क्या किया

बेवफा बन गया

वादा तोड़के

चल दिया तू इस तरह

राहों में तू मुझे

पीछे छोड़के

आगे तू निकल गया

साथी तू बदल गया

तोड़ी दोस्ती..

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे"....

आदिकरावांची पकड ढीली पडली. त्यांचा हाथ खाली पडला..

"आदी......आ....दी...." जोराने किंचाळत बेभान होऊन शामराव जमिनीवर जागीच पडले .

…समाप्त..


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy