मुलांना,आवडीचे क्षेत्र निवडु द
मुलांना,आवडीचे क्षेत्र निवडु द


" आई बघ ना , हा दादा, अजिबात अभ्यास करत नाही, सारखा पळत असतो खेळायला."
"तुला काय करायचं गं,तू बघ तुझं," एवढ बोलुन तुषारने शालिनीच्या पाठीत धपाटा मारला." आज मार मला दादा, उद्या कळेलच तुला निकाल आल्यावर." भाऊ बहिणीची भांडणे कायमच होतात, म्हणुन आई ही काही बोलली नाही. मुलांच्या भांडणांत कशाला पडायचं.
दुसऱ्या दिवशी, तुषार शाळेत गेला. मास्तरांनी निकालाचे पत्र हातात" पुन्हा नापास झाला ना," जा तुझ्या वडिलांना घेऊन ये".
ते ऐकताच तुषारचा चेहरा पडला. त्याचे रोजचे सवंगडी कुत्सित भावांने त्याच्याकडे पाहुन हसत होते.
इकडे तुषारच्या घरी, शेजार पाजारचे, मुलं पास झाल्याबद्दल पेढे घेऊन आले असता, आता त्याच्या आई वडिलांना उत्सुकता लागली. ते तुषारची वाट पाहु लागले.
पण तुषार घरी जेवायला ही आला नाही. दुपारी खुप उशीरा आला. येताच वडीलांनी विचारले"उशीर कां झाला तुषार"
तुषारने, मान खाली घालत आपले मार्कशीट दिले. त्यावरचा लाल शेरा पाहन, संतापाने त्यांच्या रागाचा पारा चढला.त्यां नी त्याला खुप झोडपला. तुषारची आईने मध्ये पडुन त्यांना थांबवले.
तुषारला खरे म्हणजे अभ्यासात रस नव्हता, बाँस्केटबाँल हा त्याचा आवडता खेळ होता, त्याचे धिप्पाड शरिर, देखणे रूप, अन त्याचा सफाईदार खेळ, पाहणाऱ्याला आकर्षुन टाकी.
तुषारच्या वडिलांना वाटायचे,आपल्या मुलाने, चांगला अभ्यास करावा, चांगल्या नंबरने पास होत, डाँक्टर, इंजिनीयर, किंवा सी.ए. तरी व्हावे.त्याला चांगली नोकरी, गलेलठ्ठ पगाराची मिळावी.
अन त्याचं भविष्य उजवल व्हावं, प्रत्येक आईबापाची , हीच इच्छा असते.
त्यामुळे त्याच्यावर सतत होणाऱ्या दबाबामुळे,त्याच्यात न्युनगंड निर्माण झाला.आपण काहीच करू शकत नाही,आपले जीवन व्यर्थ आहे,वगैरे वगैरे. त्याची इंग्रजी ,गणित भूगोल, इतिहास ह्या विषयांचा अभ्यास करतांना तारांबळ उडायची. शेवटी परिणाम नापास होण्यांत झाला.
तरूण वय मोठे वेडे असते, एके दिवशी असेच सारे झोपले असताना, त्याने रात्रीच्या वेळेस हाताची शिर कापली. अत्यंत रक्तस्रावामुळे, तो ग्लानी येऊन पडला.
रात्री त्याचे वडील,पाणी पिण्यासाठी उठले, तेव्हा जमीनीवरून वाहणाऱ्या रक्ताचे ओघळ पाहून, त्यांच्या जीवांचा थरकाप झाला." अग ये लवकर ये, बघ या तुषारने काय केले."
आवाजातील तीव्रता पाहुन आई व शालिनी धावतच आल्या. ते दृश्य पाहुन, तिने किंकाळीच फोडली. रात्रीच्या वेळेस ह्रदयद्रावक किंकाळी ऐकून, शेजारीपाजारी ही तेथे धावत आले.
मग ताबडतोब एकाने अँम्ब्युलन्स बोलावली. सोसायटीतले एक डाँक्टर ही बरोबर आले. जवळच्या
सरकारी रूग्णालयात त्याला भरती करण्यांंत आले, कारण आत्महत्येच्या केसमध्ये पोलीसांच्या तपासाची पीडा उगाच मागे नको म्हणून, कोणी ही खासगी डाँक्टर,अशी केस नाकारतात. ही वस्तुस्थिती आहे.
मग काय ताबडतोब त्याच्या हातावर सर्जरी करण्यात आली. सलाईन,औषधाचा मारा सुरू झाला. नातेवाईकांना बातमी कळताच ते ही धावत आले,पण ऐनवेळी,सोसायटीच्या लोकांनी जी मदत केली,त्यामुळेच तुषारचा जीवावरचा धोका टळला.
दुसऱ्या दिवशी , दहा वाजता तुषार शुध्दीवर आला.
एव्हाना, पोलीस काँन्स्टेबल ही तेथे जबाब घेण्यास तेथे आले.
तुषारने आपण अभ्यासांत मागे पडल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा कबुलीजबाब दिली.
तपासात आलेल्या अनुभवी पोलीस काँन्स्टेबलांनी आजवर अशा अनेक केसेस पाहिल्या होत्या. त्यांनी तुषारच्या पित्याला बाजुला घेऊन परिस्थितीचे गांभीर्य जाणून, लक्षात आणून दिले.अन मानसिक समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला.
तुषारच्या वागण्याने सारे कुटुंबीय हवालदिल झाले होते.
तुषार घरी आल्यानंतर, एके दिवशी त्याला एका मानसिक समोपदेशक डाँक्टरकडे,घेऊन गेले. डाँक्टरांनी तुषारला न्याहळले, अन हळुहळु त्याच्याशी, संवाद साधत,
हळुवारपणे विचारत कारण माहिती करून घेतले.,शाळेतल्या अभ्यासात तुषारला रस नसल्याचे,डाँक्टरांच्या लक्षात आले. त्यांना हे ही कळले की तुषार बास्केटबाँल सफाईदार खेळतो.
" तूला बाँस्केटबाँल खेळात करीअर करायची का? तुषार तर एका पायावर, तयार होता.
जवळच्या शहरातल्या एका बाँस्केटबाँल क्लबमध्ये, डाँक्टरांच्या ओळखीने तो जाऊ लागला.
आधीच त्याचा खेळ सफाईदार होता,क्लबमध्ये त्याच्यावर हिऱ्यासारखे
पैलु पाडले गेले. त्याच्या मनासारखे क्षेत्र त्याला मिळाले.आता त्याच्या नावाची चर्चा हौऊ लागली.राज्यपातळी पर्यंत त्याने प्राविण्य मिळवित मजल गाठली.
एके दिवशी त्याची नँशनल स्पोर्ट अकादमीने त निवड केली.
त्याच्या निवडीने पालक,सोसायटी,शाळा काँलेजातली सारेजण , त्याच्याकडे अभिमानाने पाहु लागली.
एके दिवशी त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीकडुन भरगच्च पगाराची नोकरी ही मिळाली.
अन साऱ्याच मध्यमवर्गीय पालकांना धडा मिळाला,मुलांवर सक्ती करू नका, त्यांच्या मनाप्रमाणे आवडीचे क्षेत्र त्याला निवडु द्या. बघा कसा त्यांच्या जीवनात कसा आनंद निर्माण होतो व ती जीवनात यशस्वी होतात.