Manisha Awekar

Tragedy

2  

Manisha Awekar

Tragedy

मुखवट्यांचं जग

मुखवट्यांचं जग

8 mins
949


   मीनलला कितीही लवकर उठवा!! कधीच उठायची नाही पहिल्या हाकेला आणि मग अर्धा/पाऊण तासात भरभर आवरुन नोकरीला जायची. "अगं इथे ठीक आहे !सासरी काय करणार तू?"असं आईने म्हटल्यावर आईच्या गळ्यात हात टाकून म्हणे"अगं आई आम्ही डबे आणू!!मला जपणारा,माझ्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार हवा आहे. उगीच मला कामवाली बाई बनवणारा नकोय" असे म्हटल्यावर दोघींच्या हसण्यात विषय विरुन जायचा .

   आजही आसेच झाले. ९ला निघायचे तर बाईसाहेब साडेआठ वाजता उठल्या . झटपट आवरुन रवाना!! पण चार्जिंगला लावलेला मोबाईल कोण घेणार? "अशी विसराळू आहे नं ही मुलगी!!कसं होणार हिचं कुणास ठाऊक ?"तेवढ्यात फोनवर2/3 मेसेजसचा आवाज आला पण whatsapp माझीपर्सनल गोष्ट आहे"असे तिने स्पष्ट सांगितल्याने सुनीता त्या फंदात पडली नाही. पूर्वी एकदाच इंग्रजी मेसेज आहेत असे सांगितले तर "आई तू माझ्या फोनच्या फंदात पडत जाऊ नकोस असे जोरात सांगितल्याने ती नाराज झाली. काय करणार!आपलेच दात नि आपलेच ओठ!!फोनची बेल वाजली. ती घ्यायला गेली पण फोनला हात लावायचे धैर्य होईना. एकदा तिने बजावले ना!!मग कशाला ह्या फंदात पडायचे?पुढे दर दहा मिनिटांत तिनदा फोन वाजला. आता मात्र तिला रहावेना. नाव बघितले 'जॉर्ज' हा जॉर्ज कोण? तिला अपार उत्सुकता वाटली. मीनल खूपच बडबाडी. आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से आईला फार रंगवून सांगायची . तीही आईचे नाते विसरुन तिची मैत्रिण होऊन सर्व काही ऐकण्यात रंगून जायच्या . 

  हा जॉर्ज कोण तिच्या मनाला हा गूढ प्रश्न चांगलाच सतावत होता.आता मात्र फोन वाजल्यावर त्यांना रहावेना. त्यांनी हँल्लो म्हणताच " फोन घेता येत नाही का?किती वेळा फोन करायचा मी?"दम भरलेला दमदार आवाज!! तिने कसेबसे "मी तिची आई बोलतीय"सांगितल्यावर "ओह!!आई तुम्ही होय!!very very sorry मला वाटले मीनलच आहेपलीकडचा आवाज एकदम मृदु झाल्याने तिला खूपच छान वाटले .एवढ्यात तिकडून फोन ठेवला गेला. तिला वाटले आपण कोण तुम्ही ? कुठे रहाता? असे विचारले असते तर.........पण..पण...तो दमदार ऐकूनच ती धास्तावली त्यामुळे पुढचे सगळे राहिलेच. काही विचारायचे धाडसच नाही झाले. इतक्या कशा आपण घाबरट?तो बोलला दमदार....पण मीनलसाठी.....आपण का त्याचा एवढा धसका घेतला?बघू आता मीनल आल्यावर!! काहीतरी गनिमी कावा केला पाहिजे ,तिच्या मनातले काढून घ्यायला . तो तिचा मित्रही आसेल. काय आपण वेडे आहोत . मीनल खरंच खूप सुंदर !! नावाप्रमाणेच मासोळीसारखे सुंदर भावपूर्ण डोळे, गोरा वर्ण,सडपातळ बांधा ,अभ्यासात व extra actvities मधे हुशार त्यामुळे तिला मित् मैत्रिणी खूप . सर्वांची माहिती होती तिला पण हा जॉर्ज कसा माहित नाही आपल्याला.....तिला हक्काने दम भरणारा.....

    तेवढ्यात बेल वाजली. शेजारच्या ज्योतीताई पहिली आवराआवर झाल्या"काय म्हणताय?अहो तुमचा फोन किती वेळ वाजत होता" "अहो मी आंघोळीला गेले होते ना म्हणून "असं म्हणून सुनीताने सारवासारवी केली ."अहो माझा भाचा आला आहे ना इथे,सध्या मुली बघतोय. मला मीनलचे स्थळ मिळतेजुळते वाटले म्हणून सुचवते आहे हो" "आहो बरं झालं की,तिची पत्रिका देते आणि जमले की कार्यक्रम करु" "अहो ती नव्या जमान्यातली सुधारक मंडळी !! त्यांना पत्रिका वगैरे काही बघायची नाही आपण direct कार्यक्रमच ठरवून टाकू बघायचा"

   सुनीता खूष झाली. जॉर्जचे भूततिच्या मानगुटीवरुन उतरले. मीनल आल्याआल्याच तिने स्थळाची माहिती सांगितली" direct दाखवायचाच कार्यक्रम करु म्हणतायत"असे म्हटल्यावर मीनल हरखून जाण्याऐवजीजराशी गंभीरच झाली. "अगं तुझा मोबाईल विसरला होता बघ. बरेच फोन येऊन गेलेत जॉर्जचे"

   त्याचे नाव आईच्या तोंडून ऐकल्यावर ती गर्भगळितच झाली. "आई तुला कसे कळले त्याचा फोन?मी तर तुला फोनच्या भानगडीत पडू नको म्हटले होते ना?" "अगं 2/3फोन सोडले पण नंतर वाटले काही अर्जंट असले किंवा तुला काही........."असे म्हणताच मीनलखो खो हसू लागली . अगं मला काय होतंय बाहेर तू फारच भित्रीभागूबाई आहेस"मीनल हसू लागल्याने सुनीताचा मूड बदलला आणि जॉर्जचा विषय तसाच अधांतरी राहिला

      दाखवायचा कार्यक्रम आहे सांगितल्यावर मीनल जरा चिडूनच म्हणाली"आई मला नाही असे आयुष्याचे निर्णय तासाभरात घेता येत. माझा जोडीदार माझ्या मतांशी मिळतेजुळते घेण्याइतका flexible आहे का नाही?एकमेकांच्या आवडीनिवडी मँच होतात का नाही एकत्र रहाणार का वेगळे ? हे सर्व प्रश्न अधांतरीच रहातात. "अगं लग्नानंतर तू जाणार अमेरिकेला. तुला कुठे ह्या सर्व लोकांत रहायचे आहे ? एकमेकांनी एकमेकांशी मिळतेजुळते घेण्यातच संसाराची गोडी आसते . आम्ही नाही का असेच पसंत केले एकमेकांना ?"अगं आई संसारात तूच तर मिळतेजुळते घेतलेस. बाबा कधी करताता Adjust? मला मन मारुन नाही संसार करायचा. माझ्या आवडीचा पसंतीचाच जोडीदार आवडेल मला.

   अशा जुगलबंदीनंतर दाखवायचा कार्यक्रम झाला . सांगूनही मीनलने साडी नेसली नाही की मोठ्या माणसांना वाकून नमस्कार केला नाही. प्रश्न विचारल्यावर जेवढ्यास तेवढीच उत्तरे दिली. त्यांच्या घरातल्यांनी चहाचा ट्रे हातात दिल्यावर तिने तो नाराजीनेच धरला. मी काय वेटर आहे का आशा अविर्भावात!!

    तरीही आश्चर्य म्हणजे तिकडून होकार आला.. आई बाबा तर खूपच खूष झाले. साखरपुड्याचीही बोलणी सुरु झाली. लग्न ठरतंय म्हटल्यावर मुली किती उमलल्यासारख्या दिसतात . पण मीनल गप्पगप्पच होती. 

   "आई मला मुलगा व त्याच्या घरचे पुराणमतवादी वाटतात गं!!त्या मुलाने प्रश्न तरी किती जुजबी विचारले. "अमेरिकेत रहायची तयारी आहे ना? शाकाहारी का मांसाहारी ?स्वयंपाक येतो का?"

"मी काय ह्याच्या घरची स्वयंपपाकाची बाईच होणार आहे जशी!!

  "अगं थांब थांब मीनल,तशी पद्धतच आहे विचारायची नसला येत तरी त्यावेळी मुलगी ठोकून देते येतो म्हणून ""आई मला हे स्थळ पसंत नाही असे स्पष्ट बोलताच सुनीता व सुनील हादरले. हा नवमतवाद नाहीतर त्याच्यामागे दुसरेच काही काळेबेरे असावे असे त्यांना वाटले .

[9/2, 10:33 PM] Manisha Awekar: पुन्हा जॉर्जचे भूत सुनीताच्या डोक्यावर बसले. तिने फोनबाबत सर्व काही सुनीलला सांगितले . "आगं कलाकलानेच घ्यायला हवे तिच्या. ती एकुलती एक मुलगी!! ना बहीण ना भाऊ !!कोणाकडून मनातले विचारणार?जरा सबूरीने घे बरंका!!

    ही सबूरी सुनीता सुनीलला खूपच महागात पडली. एके दिवशी मीनल घरी आलीच नाहीवाट बघून फोन करुन दोघेही कंटाळले. फोन स्विच आॉफ!!मीनलच्या नकळत सुनीलने जॉर्जचा फोन नं घेतला होता . त्याचाही फोन स्विच अॉफ!!दोघांच्याही डोळ्याला डोळा नव्हता रात्र सरता सरत नव्हती. जन्मापासून जिला वाढवले लहानाचे मोठे केले तिने असे करावे?घरात निदान काही बोलायचे . ती भांडलीअसती तरी चालले असते पण असे मूकपणे जाणे त्यांच्या काळजाला लागले .

तेवढ्यात बेल वाजली. आता सकाळीसकाळीच कोण आले?दार उघडताच कृष्णवर्णीय तरुणाबरोबर मीनलला बघून दोघे गर्भगळित झाले. "आई बाबा हा जॉर्ज . आम्ही लग्न करणार आहोत. आम्ही दोघेही समानविचारांचे,एकमेकांना स्वातंत्र्य देणारे घेणारे आहोत . जॉर्ज हुशार आहे. तो cultural survey साठी इथे काही काळ आलाय. त्याच्या सर्व्हेला मी मदत केली. आई बाबांच्या डोळ्यांना धारा लागल्या . ज्या घरातसाखरपुड्याचा माहोल......तिथे आता भयाण शांतता पसरली. 

   खूप विनवण्या करुनही मीनल तिच्या निर्णयावर ठाम राहिली . "अगं लग्न तरी इथे करुनजा. आम्हांला तू एकुलती एक मुलगी " पण दोघेही तिकडेच लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम!!शेवटी आई बाबांनीच तिच्यासाठी केलेले दागिने लग्नाची साडी आसे तिला बळेबळे दिले .

    विमानतळावर मात्र मीनलला भडभडून आले. आई बाबा तुम्ही काहीही काळजी करु नका मी स्थिरस्थावर झाल्यावर सहा महिन्यात तुम्हांला बोलावून घेईन . जॉर्जनेही त्यांना अमेरिकेत यायचे निमंत्रण दिले . चला जावई एवढा तरी चांगला आहे. आपल्याला या म्हणतोय 'अशी मनाची समजूत घालत दोघे साश्रु नयनांनी घरी आले.

    ती गेली अमेरिकेला पण इथल्या लोकांना आई बाबांनाच तोंड द्यावे लागले . आमची मुलगी पळून गेली नाही,सांगूनसवरुन तिचा चॉईस असलेल्या मुलाबरोबर गेली . फक्त तिकडे लग्न करणार आहेत इतकेच!!

    झालेही तसेच !!आठ दिवसांत दोघांच्या लग्नाचे फोटो आले तो कृष्णवर्णीय आणि त्याचे नातेवाईकही तसेच !!त्या सर्वांत मीनलच एकटी गोरी उठून दिसली पण जरा बावरलेलीच दिसलीतिच्या ओळखीचे कोणीच नव्हते . तिचा सगळा हवाला जॉर्जवरच!!

     जॉर्ज सकाळीच आठ वाजता कामावर जाई आणि संध्याकाळी सात वाजता परत येई. आपण ज्याच्याशी लग्न करतोय त्याची नोकरी किती वेळाची असेल हा विचारच तिने केला नव्हता. शिवाय इथे सर्वच असे टाइमिंग घेतातअसे त्याने सांगितल्याने तिला वाटले हा आहे हुशार . काम करायचे वयच आहे त्याचे. आपण इथल्या वातावरणाशी मिळतेजुळते घेतले पाहिजे. त्याच्या कामाच्या वेळात आपण काय करायचेहा विचार तिच्या डोक्यातच आला नाहीसाधे वाचायला काय आणावे असेही तिच्या मनात आले नाही. जॉर्ज तिला घरात सर्व काही आणून देई मदत करत असे. तिला त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवी. वरणभात भाजी पोळी खाणाया-मीनलला पिझ्झा बर्गर मांचुरियन मेक्सिकन चॉपी वगैरे पदार्थ नवे कधी न खाल्लेलेआणि खरे तर न आवडणारे होते पण आता लग्न झाले असल्याने आपलेच दात नि आपलेच ओठ अशी स्थिती!!

[7/2/2018, 10:02 PM] Manisha Awekar: एक दिवस ती खूप कंटाळली. तिला काही खायची इच्छाही होईना!!जरा जॉर्जशी बोलल्यावर बरे वाटेल म्हणून तिने फोन लावला. बराच वेळ कोणी उचलेना!!ती धास्तावली. एका बाईनेच फोन उचलला. "हँल्लो मीनल......असे बोलून गडगडाटी हसायला सुरवात केली. "Your name please "असे विचारल्यावर तरअजूनच जोरात हसायला लागली . तिने जॉर्जला फोन दिला व देतानाच"Tell her who am I"असे म्हणाली पण ते चुकार शब्द इकडे मीनललाही ऐकू आले. नंतर जॉर्ज बोललाच नाही. 

    मीनल आंतर्बाह्य हादरली. "हँल्लो मीनल म्हणणारी कोण असेल बरं!!गडगडाटी हसणारी कोण असेल?तिने आपली ओळख जॉर्जला का करुन द्यायला सांगितली?इथे मैत्रिण बरोबर असली तरमोकळेपणाने ओळख करुन दिली जाते. मग असे का व्हावे?जॉर्जही काहीच का बोलला नाही?प्रश्न पिच्छा सोडत नव्हते एरव्ही जरा अडचण येईस्तोवर आई बाबांची ढाल पुढे असे पण तीच स्वतःहून धाडस करुन इथे आल्याने ती आई बाबांना काय सांगणार!!तिला काय करावे काहीच सुचत नव्हते .

   हा देश वेगळा चालिरिती वेगळ्या पद्धती वेगळ्या,आपणही जरा सबूरीने घ्यावे असे म्हणूनतिने जॉर्जलाही काही विचारायचे टाळले. जॉर्जही गप्पगप्पच होता अॉफिसमधे काम खूप होते म्हणून बोललो नाही अशी साखरपेरणीही केली. "तुला कंटाळा आला असेल तर आपण फिरुन येऊ दोन दिवस वीकएंडला"असे तो म्हटल्यावर ती हरखून गेली .

    दोघे फिरायलि बाहेर पडले. झकास निसर्ग ,झकास मूड मग काय !!दोघेही प्रेमाच्या भरात सर्व दुनिया विसरले. मनातली सर्व किल्मिषे दूर झाली. आल्यावर आई बाबांना भरभरुन फोन केला आई बाबाही खूष झाले. लेकीने हट्टाने लग्न केलं तरी छान चाललंय म्हटल्यावर त्यांनाही समाधान वाटले .

    असेच दिवस गेले. एक दिवस अचानक बँग घेऊन मीनलला एकटीलाच बघून दोघेही आश्चर्यचकित झाले. मीनल हंबरडा फोडून रडायला लागल्यावरत्यांच्या हातापायाला कंप सुटून मस्तक गरगरु लागते .प्रसंगावधान राखून आईने स्वतः पाणी पिऊन त्या दोघांनाही पाणी दिले. "आई बाबा मी काय करु हो!!मी पुरती फसले हो!!त्याची एक प्रेयसी आधीपासूनचीच होती. मी आवडले म्हणून माझ्याशी लग्न केले सांगा एका म्यानात दोन तलवारी कशा रहायच्या?जाब विचारायचीही सोय नाही . Live in relationship असे त्यांचे मोकाट वागणे चालू आहे. "हे खपवून घ्यायचे असेल तर रहा"असे निर्दयीपणे त्याने सांगितले. मला डोळ्यादेखत सगळे सहन करणे अशक्य झाले तेव्हा घटस्फोट देऊन माझ्या तोंडावर तिकीट फेकून मला हाकलून दिले. मला तेव्हा समजले की त्याला लग्न तिकडे का करायचे होते !!मी काय खेळणं आहे?आवडलं खेळलं,कंटाळा आला सोडून दिलं!!मी जितीजागती त्याची लग्नाची बायको समोर असल्याचीही त्या दोघांना चाड नव्हती ""इकडे सगळं असंच असतं"अशी मुर्दाड बतावणीही केली 

   "आई बाबा माझे डोळे पुरते उघडले आहेत. आता मला आधी माझ्या पायावर उभे रहायचे आहे. प्रेमाचा नकली बंगलामनातून जाळून टाकायचा आहे. प्रेमानी मी आंधळी झाले होते . हे मुखवट्यांचं जग फार फसवं असतं हो. आता दुनिया कशी आहे चांगलं समजलंय मला. आई बाबा मी तुमची अनंत अपराधी आहे मी खूप चुकले मला क्षमा करा!!

   आई बाबांनी डोळे पुसले. त्यांना जाणवले की जे ऐकायला इतके भयानक वाटले अशा महाभयंकर दिव्यातूनजाऊनही किती पटकन सावरली आहे मीनल!!

     "एकेक वेळ असते प्रेमात फसायची!!ही वाटच फार निसरडी आहे जाऊ दे मीनल जे झालं ते झालं आता पुढचे आयुष्य सजगपणे आणि सकारात्मकतेने जग. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी"

    आई बाबांच्या आश्वासक शब्दांनी मीनलला उभारी आली. त्या दोघांना ती हलकेच बिलगली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy