Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Akshata alias shubhada Tirodkar

Drama

1.9  

Akshata alias shubhada Tirodkar

Drama

मुखवटा...

मुखवटा...

3 mins
632


आज समर खुप खुश होता. कारण त्याचा जिवलग मित्र अमोघ आज अमेरिकेतून येणार होता. संध्याकाळी भेटण्याचा त्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे आज ऑफिसमध्ये तो लवकर गेला.


तो गेल्यानंतर सांची म्हणजे समरची बायको तिनेही पटापट आवरलं आणी ती ही आपल्या बुटिकमध्ये निघाली... समरला कधी एकदा संध्याकाळ होते असं झालं होतं. तो लवकरच घरी परतला. फ्रेश होऊन तो अमोघला भेटण्यासाठी गेला. जाण्यापूर्वी त्याने सांचीला फोन केला...


सांची घरी परतली. समर जेऊन येणार म्हणून तिने स्वयंपाक केला नाही. येताना दोन सँडविच आणलेली, ती खाऊन ती सोफ़्यावर बसली आणि चॅनेल सर्फींग चालू केलं. तास उलटला, आता तिला कंटाळा येऊ लागला. नेहमी समर समोर भुणभुण करणारी ती आज गप्प होती. तिने टीव्ही बंद केला व मोबाईलच्या स्वाधीन झाली. बोट वर-खाली करत तिचा वेळ कसा गेला, तिला कळलंच नाही.


जाग आली ती दारावरच्या बेलने! तिने दरवाजा उघडला पाहते तर समर उभा होता, त्याने सांचीला मोठी अशी स्माईल दिली. त्याच्या त्या स्माईलने सांचीचा कंटाळा पळाला आणि तिची भुणभुण चालू झाली.


सांची, “काय मग झाली दोस्ताची भेट? कसा आहे तो आणि हे काय अमोघ ने काही दिलं का दाखव तरी.”


“अगं हो, थोडा दम तरी... हे सगळं सांगतो तुला, फक्त फ्रेश होऊन येऊ दे तरी मला. तोपर्यंत एक्साईटेड राहा आणि हो त्या बॉक्सला उघडू नकोस कळलं का,” म्हणत समर फ्रेश होण्यासाठी गेला. सांची त्याची वाट पाहत सोफ्यावर बसली.


समर, "अमोघ बरा आहे, येणार आहे तो आपल्या घरी. तुला काहीतरी सर्प्राईस आणलं म्हणत होता...”


साची, "हो का आणि हे काय तर बॉक्स मध्ये?”


समर, "अगं ते तुझ्यासाठी नाही!"


सांची, "मग तुला दिले तर...”


समर, “नाही गं मलाही नाही, मी कोणासाठी आणायला सांगितले होते...”


साची, “कोणासाठी???”


समर, “नायर सर आहे ना त्यासाठी!"


सांची, “का बर्थडे आहे का त्याचा???“


समर, “नाही गं पुढच्या महिन्यात प्रमोशन देणार आहेत आणि सगळी प्रमोशन नायर सर देणार, मग त्यांना खुश करायाला पाहिजे ना..."


साची, “म्हणजे तू लाच देऊन प्रोमोशन मिळवणार?"


समर, "लाच नाही गं... गिफ्ट! आणि अशी गिफ्ट दिल्याशिवाय काहीही मिळत नाही. मर मर करून काम करून काहीही फायदा नाही आणि कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है...”


सांची, “पण हे बरोबर नाही...”


समर, “तुला मला मोठ्या पदावर पाहायचे आहे ना मग एवढं मनाला लावून घेऊ नकोस...”


महिना उलटला, प्रमोशनचा दिवस उजाडला. आज समर खुप खुश होता. आज प्रमोशन मिळणारच! तो गुणगुणत तयारी करत होता. सांचीला त्याच्या गुणगुणीमागील रहस्य माहित होते, न पटणारे! पण समरच्या प्रेमासाठी ती गप्प होती, पण मनातून तिला कुठेतरी खुपत होते... लगबगीत समर ऑफिसला निघाला. सांची पण आपल्या कामात व्यस्त झाली. दोन तासांनी तिचा फोन वाजला आणि तो समरचा होता...


समर, “आय डिड इट... मला प्रमोशन मिळालं...”


सांची, “ओके काँग्रॅट्स...”


आणि समरला कोणी बोलावले म्हणून त्याने फोन ठेवला.

असा तो दिवस अभिनंदनाच्या वर्षावात गेला.


दुसऱ्या दिवशी समरने पार्टी ठेवली होती. नातेवाईक मित्र मंडळी उपस्थित होते. जो तो समरचे कौतुक करत होते.


"एवढ्या वयात एवढी मोठी मजल मारली माझ्या जावयाने!" हे सांचीचे बाबा मोठ्या आनंदाने सांगत होते. सांची मात्र मुखवटा घातलेल्याप्रमाणे वागत होती. फक्त समरसाठी. पण तिला त्याचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. पार्टी संपली, एक एक करून सगळे निघाले. आता फक्त सांची आणि समर होता. समर तर आनंदाने फुलून गेलेला. सांचीने त्याच्याकडे पहिले तिला कुठे तरी समरमध्ये गर्विष्ठपणाचा मुखवटा दिसला. आपला समर असा नव्हता कसा काय तो बदलला या विचाराने तिचे मन आतून तुटले.


समर, "मस्त झाली ना पार्टी..."


सांची, “हो...”


समर, “काय झालं?"


सांची, "काही नाही."


समर, "मग नेहमी भूणभूण करणारी आज गप्प कशी आहे? काय झालं, नेहमीची साची नाही वाटत मला!"


सांची, "वाईट वाटले मला तुझ्या अशा वागण्याचे, तू एवढा स्वार्थी कधी झालास?"


समर, “स्वार्थी???”


सांची, “तू आज एवढी पार्टी दिली, शाबासकीची थाप ही घेतली पण खरंच तू स्वबळावर कमावलंस? तुला प्रमोशन नाही मिळालं तरी मला चाललं असतं. कारण तुझी जागा माझ्या मनात मोठी आहे. पण आता ती जागा खालावलेली आहे. तुझ्या स्वबळावर हरण्यात मला आनंद असेल. पण हिरावून घेतलेल्या जिंकण्यात नाही...”


समर खजील होऊन तिच्याकडे पाहत राहिला...


Rate this content
Log in