मृत्यूचे शिखर - भाग दोन
मृत्यूचे शिखर - भाग दोन
बाकीचे लोक नको म्हणत असताना त्यांनी जायचे ठरवले. सर्व तयारी करून ते सहाजण हेलिकॉप्टरमध्ये बसले. उत्तरांचलमधील हवामान खराब असल्याने त्यांनी तिबेटच्या सरहद्दीवरून खाली जायचे ठरले. तिकडे हवामान चांगले व कोरडे होते. हेलिकाॅप्टर वर गेल्यावर एका ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला आणि चालक बेहोश झाला. त्यामुळे हेलिकाॅप्टर डगमगले आणि तिबेटच्या डोंगरात कोठेतरी जाऊन पडले. याचा चालक संदेश होता. ही दुर्दैवी घटना पेपरमध्ये छापून आली. यात सर्वजण ठार झाले. सर्वजण हळहळले. त्यांच्या घरी कळाल्यावर खूप दुःख झाले. पण हे खरे नव्हते. हेलिकाॅप्टर अशा ठिकाणी पडले होते की त्या ठिकाणी कोणीही सहजासहजी जाऊ शकत नव्हते. गेले तरी पोहोचायला कमीत कमी तीन महिने लागले असते. त्यामुळे त्या ठिकाणी पडलेल्या लोकांना मृत घोषित केले होते. कोणी वाचणार नाही हे गृहीत धरले होते. पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. संदेश बेशुद्ध होता. बाकींना थोडंबहुत लागले होते. खरचटले होते. तापमान उणे दहाच्या खाली. रहायला काही नाही. सगळीकडे बर्फच बर्फ. हेलिकाॅप्टरचे तुकडे झाले होते. सामान व खायचं थोड सामान होते. राहायला आसरा शोधणे जरुरीचे होते. थंडीने शरीर आखडत होते. संदेशला खांद्यावर घेऊन ते निघाले.
(क्रमशः)
