मृत्युचे शिखर (भाग एक)
मृत्युचे शिखर (भाग एक)
ही कहाणी सुरू होते, केदारनाथच्या जलप्रपातापासून... यात असंख्य लोकांचा बळी गेला. प्राणी, घरे, गाड्या, स्वप्ने, प्रेम, दुरावा, दुष्मनी सगळे काही वाहून गेले. माणूसकीचं दर्शन यात झालं. खूप लोक मदतीला आले. देश विदेशातील लोक रेस्क्यू टिममध्ये दाखल झाले. काहींनी जातीने हजर राहून पैशाबरोबर इतर मदत केली.
रेस्क्यू टिममध्ये काम करण्यासाठी काही अमेरिकेतील लोक आले होते. पाण्यात अडकलेल्या लोकांना ते वाचवत होते, मदत करत होते. यात सोळा लोक होते. वातावरण वरचेवर खराब होत चाललेले होते. यांना मदत करणे अवघड होत होते. पण परिस्थितीला सामोरे जात हे लोक मदत करत होते.
दिवस दुसरा अतिशय थंड व पावसाचा होता. हवा थोडीही वाहत नव्हती. अशा परिस्थीतीत मदत करणे अवघड जात होते. या टिममधील सहा लोक काम करण्यास तयार झाले. हेलीकाॅप्टर चालवणारे संदेश कोरके, डाॅ. अनंत, डाॅ स्मिथ, जेनी, डाॅ. जेनी व अॅलेक्स हे सहा जण तयार झाले.
क्रमश:
