चेरी - भाग 1
चेरी - भाग 1
हे विमान अॅमेझानच्या जंगलात मध्यभागी पडलं होतं. चेरी जिचं वय तेरा ती तेवढी वाचली होती. ती सामानाच्या बॅगासोबत होऊन पडली होती. त्यामुळे वाचली. पण हाताला व पायाला लागले होते. सगळीकडे खरचटलं होते.ती उठून कोणी जिवंत आहे का पाहू लागली.ती शुध्दीवर येण्या अगोदर कोणी निघून गेले असेल तर तिला माहित नव्हतं.तिच्या डोक्याला लागलेल्या खोचीतून रक्त येत होते. ती आईला शोधू लागली.आई कुठे दिसेना.ती घाबरली,रडू लागली.सगळी कडे सामान व मेलेल्या व्यक्ती,त्यांचे अवयव विखुरले गेले होते.काही जळाले होते. तिला कळेना काय करावे.ऐवढ्या वरून पडलेल्या विमानातून कोणी वाचणं शक्यच नव्हते.कोणी वाचल तर जंगलातील प्राणी खावून टाकले असते. नेमक विमान कुठं पडले आहे हे तिला कळत नव्हतं.ती खूप वेळ रडत बसली.सामानात मम्माला व इतरांना शोधू लागली.पहाटे पाचला हा अपघात घडला होता,आता अकरा वाजत आले होते.जंगली प्राण्यांचे आवाज ऐकू येऊ लागले.पोटात कावळे ओरडत होते.सगळीकडे सामान व जळके शव विखूरले होते.तिने खायला काही मिळते का शोधले.तिला चालता येत नव्हते.ती पायाला ओढत खुरडत खुरडत चालू लागली.डावा हातपण दुखत होता.त्याला सांभाळून शोधत होती.
एका खोक्यात तिला खायचे पाकिटे व पाणी सापडले.तिने तिथलीच एक बॅग घेतली .आपली पाठिवरील बॅग पाहिली फाटली होती.ती बदलली, घेतलेल्या बॅग मधून सामान काढल.त्यात खायच सामान भरलं.ज्युसचे पण कॅन मिळाले तीपिली.काही घेतले.सामानातील,औषध,चाकू,बॅटरी,दोरी, मोबाईल,दारु जखमावर लावायला घेतली.ती जंगलात फिरू लागली पण तिला बाहेर पडायचा रस्ता मिळेना मग तिने नदीच्या काठाने जायचे ठरवते. तिला सावध होऊन चालाव लागणार होतं.दुपारच्या गर्मीत एखाद जनावर पाणी पीण्यासाठी येऊ शकते.ती किनाऱ्यावर चालू लागली तर तिचा पाय गाळात रुतला.त्यामुळे तिला नदीतून जावे लागणार होते.तिथेही भिती होती.नदी किती खोल होती हे माहीत नव्हते.त्यात मगर साप असण्याची शक्यता होती.ती पाण्यात उतरली.
(क्रमशः)

