Jyoti gosavi

Inspirational

2.8  

Jyoti gosavi

Inspirational

मराठमोळा कुस्तीवीर खाशाबा जाधव

मराठमोळा कुस्तीवीर खाशाबा जाधव

2 mins
264


हेलसिंकी चा मैदान खचाखच भरलेलं होतं कुस्तीच्या मॅच चालू होते भारताचे आव्हान संपुष्टात आले होते आणि काही दोन-तीन खेळाडूंचे अजून बाकी होते सोबत व्यवस्थापक म्हणून गेलेले दिवान प्रताप चरणी त्यांना युरोप शहर बघण्याची मोठी घाई झाली होती त्यामुळे ते स्वतः पर्यटनाला बाहेर पडले पण सोबत इतर लोकांनाही घेऊन निघाले खाशाबांना ही त्यांनी सांगितले तुझी मॅच उद्या आहे आज तू माझ्याबरोबर फिरायला चल, परंतु असावा मात्र फिरायला गेले नाहीत ते एका विशिष्ट उद्देशाने ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते भारतासाठी पदक जिंकून आणणे हे एकमेव उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते. बाहेर फिरण्यापेक्षा आज इतर पैलवानांचे सामने बघितले तर आपल्याला त्याचा फायदा होईल या विचाराने ते मैदानावर जाऊन बसले आणि किट कुठे ठेवायची म्हणून ती सोबत घेऊन गेले. पहिले 12 सामने बघितले आणि दोन पैलवानांचे लढत चालू असताना पुढील नाव खाशाबांचे पुकारले गेले त्यांना खरेतर धक्काच बसला शिवाय युरोपियन लोकांचे ईंग्लिश समजणे तसे कठीणच होते फक्त जाधव आडनाव त्यांना कळले होते चौकशी केली असता पुढे आपलीच मॅच आहे हे त्यांना समजले व्यवस्थापक तर बरोबर नव्हते सोबत कोणीही भारतीय नव्हते आता मैदानावर उतरण्यास शिवाय पर्याय नव्हता, म्हणून खाशाबा मैदानावर उतरले. ऑलिंपिकच्या नियमानुसार एकूण त्यांना पाच कुस्त्या खेळाच्या होत्या.. पैकी पहिला खेळाडूंना आल्यामुळे त्यांना बाय मिळाला होता नंतर त्या खेळाडू बरोबर खेळताना त्यांचा 03 असा पराभव झाला. पंचांनी त्यांच्याविरोधात निर्णय दिले परंतु त्यावर अपील करण्यासाठी कोणीच नव्हते. व्यवस्थापक आपले युरोप सुरत होते फिरत होते आणि खाशाबांना म्हणावे तसे इंग्लिश येत नव्हते. कोल्हापूर मध्ये राजाराम शाळेत शिकलेले खाशाबा महाराजांच्या मदतीने पहिल्यांदा इंग्लंडला कुस्तीसाठी गेले होते. त्यावेळी ते सहाव्या नंबर वर आले परंतु तिथे त्यांना मॅटवरील कुस्तीचा सराव झाला. नंतर ची कुस्ती ही आपल्या पेक्षा भारी पैलवानांबरोबर होती त्यांना माहित होते. नियमानुसार त्यांना अर्धा तास मधील विश्रांती द्यायला हवी होती पण ते दिले गेले नाही ते थांबलेले असताना त्यांना पुढील कुस्ती खेळावे लागले त्यामुळे रशियाला सुवर्ण मिळाले आणि भारताला कास्य मिळाले, खरेतर त्या सुवर्णपदक आवर्ती खाशाबांच्या आणि पर्यायाने भारताचा अधिकार होता परंतु व्यवस्थापकाच्या निष्क्रियतेमुळे ढसाळ कारभारामुळे आपल्या हातातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक गेले.. तरी भारताला तिसरा नंबर मिळाला हा आनंद साजरा करायला खाशाबांच्या सोबत कोणीही नव्हते परंतु त्यांना याचे महत्त्व कळत होते. त्यांनी धावत जाऊन तिरंगा आणला स्वतःच्या अंगावर लपेटला आणि ते पदक घेतले अशा आपल्या मराठमोळ्या वीराचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. 1984 साली एका मोटार अपघातात त्यांचे निधन झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational