Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sunita madhukar patil

Drama


4.6  

Sunita madhukar patil

Drama


मोकळं आभाळ तिच्या हक्काचं - भाग १

मोकळं आभाळ तिच्या हक्काचं - भाग १

3 mins 361 3 mins 361

मेडिकल कॉलेजच्या दीक्षांत समारंभात (convocation ceremony) एका कोपऱ्यात उभा राहून आपल्या लेकीला ऋग्वेदीला गोल्ड मेडल घेताना पाहून राजीवचे डोळे भरून आले होते. आज त्याची लेक MBBS डॉक्टर बनली होती. आपण आयुष्यात किती मोठी चूक केली हे त्याचं मन त्याला राहून राहून सांगत होतं. तो जो काही ऋग्वेदी आणि तिची आई आरतीसोबत वागला होता त्याचा आज त्याला पश्चाताप होत होता. आपल्या मुलीनं आज एवढी मोठी भरारी घेतली, याचा त्याला अभिमान वाटत होता. पण काय उपयोग काही वर्षांपूर्वी याच मुलीच्या तो जीवावर उठला होता. तिला मारण्यासाठी आकाशपाताळ एक केलं होतं कारण का तर ती एक मुलगी होती.


ऋग्वेदी तर आज त्याला ओळखत देखील नव्हती. 

"मी माझ्या या यशाचं सारं श्रेय माझ्या दोघी आयांना देते. मी खूप भाग्यवान आहे मला दोन दोन आयांच प्रेम भेटलं. कृष्णाला कसं देवकीने जन्म दिला आणि यशोदेने वाढवलं तसंच मला त्या दोघींनी अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं. त्या दोघीजणी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या म्हणूनच मी आज हे यशाचं शिखर गाठू शकले. मला भेटलेलं हे गोल्ड मेडल मी त्या दोघींना समर्पित करते. मी त्या दोघींना विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं." ऋग्वेदी तिचं मनोगत व्यक्त करत होती. ती स्वतः जाऊन दोघींना स्टेजवर घेऊन आली.

  

डॉक्टर स्मिता आणि आरती दोघी स्टेजवर आल्या. दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते. आजवर केलेल्या बिकट परिस्थितीचा सामना आणि घेतलेल्या मेहनतीचं फळ आज त्यांना भेटलं होतं.


डॉक्टर स्मिताला आजही तो दिवस आठवत होता जेव्हा आरती डिलिव्हरीसाठी त्यांच्या क्लिनिकमध्ये ऍडमिट झाली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यात भीती, लाचारी, काळजी, सगळे संमिश्र भाव स्मिताला जाणवले होते. 


आरतीची डिलिव्हरी होते आणि ती एका छान गोंडस मुलीला जन्म देते. बाळाच्या जन्माच्या दोन दिवसानंतरही आरतीला भेटायला कोणीच येत नाही. 


डॉ. स्मिता आरतीला जाऊन भेटतात तेव्हा त्यांना जाणवतं की तिच्या डोळ्यात असंख्य वेदना आहेत. 

"आरती तुझी डिलिव्हरी होऊन दोन दिवस झाले तरी तुला कोणी बघायला किंवा भेटायला आले नाही. काय झालं काही प्रॉब्लेम आहे का?" 

आरती काहीच उत्तर देत नव्हती.

"अगं काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस."


"काही नाही डॉक्टर, मला मुलगी झाली ना म्हणून घरचे नाराज आहेत त्यामुळेच ते मला भेटायला किंवा बाळाला बघायला देखील आले नाहीत." आरतीने सांगितलं आणि ती रडू लागली.


"अगं असं कसं म्हणतेस तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, काहीतरी काम असेल म्हणून येऊ शकले नसतील." 


"नाही डॉक्टर!!! त्यांना मुलगाच हवा होता. राजीव आणि त्याची आई म्हणजे माझा नवरा आणि सासू किती निष्ठुर आहेत याची कल्पना तुम्हाला नाही." स्मिता सांगत होती.


"अगं!!! आजच्या काळात मुलगा आणि मुलगी एक समान आहेत आणि आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने कामं करत आहेत, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मला बघ मी एक डॉक्टर आहे, तू पण तर घर सांभाळतेसच ना? ते तर सगळ्यात कठीण काम आहे. मुली कोणत्याच क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे ती आज सिद्ध करीत आहे. स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच जणू. स्त्री म्हणजे सहनशीलतेचा कळस. संसारात तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. त‌ी नसेल तर कुटुंब कोमेजते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते; पण आपल्या मुला-बाळांना त्याची झळ पोहोचू देत नाही. स्त्री कुठेच पुरुषापेक्षा कमी नाही गं." डॉ. स्मिता तिला समजावत होती.


"हो डॉक्टर मला सगळं पटतंय पण माझ्या नवऱ्याला आणि सासूला कोण सांगणार. त्यांना मुलगी म्हणजे एक बोजा वाटतो. या अगोदरसुद्धा घरच्यांनी दोन वेळा मी गरोदर असताना गर्भलिंग चाचणी करून मुलगी आहे समजल्यानंतर माझा जबरदस्ती गर्भपात करवला होता. म्हणून यावेळी मी त्यांना गरोदर असल्याचं लवकर समजूच दिलं नव्हतं. पोट दिसू लागल्यावर त्यांना कळालं आणि ते परत टेस्टसाठी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. पण जास्त दिवस झाल्यामुळे गर्भपात होणं शक्य नव्हतं आणि जबरदस्ती करवलाच तर आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका होता. म्हणून मी आणि माझी मुलगी यावेळी बचावलो डॉक्टर!!!" आरती बोलत बोलत रडत होती, "तरीही त्यांना मनात कुठेतरी आशा होती की या वेळी मुलगा होईल पण झाली मुलगी म्हणून ते असं वागत आहेत."


डॉ. स्मिताला तिची कशी समजुत काढावी हे समजत नव्हतं. आजच्या स्त्रीने प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. तरीही आज समाजात अशा प्रवृत्तीची लोक आहेत जे अजूनही मुलींना दुय्यम प्रतीचा दर्जा देतात. कधी कोसळणार ही स्त्री-सासू पुरुष असमानतेची भिंत या सगळ्याचा विचार करत डॉ. स्मिता आरतीच्या नवऱ्याला आणि सासुला फोन करून हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलावुन घेतले. 


क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Sunita madhukar patil

Similar marathi story from Drama