Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

आर्मलेस पायलट

आर्मलेस पायलट

1 min
216


निळंशार आकाश, सावळ्या ढगातून भरारी घेत मोठ्या शिताफीने पहिल्यांदा विमान उडवता उडवता आजवरचा सारा प्रवास तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला.


त्यादिवशी तिची एंगेजमेन्ट होती. अंगठी घालण्याचा क्षण आला आणि तिचे डोळे पाणावले. त्याने खाली वाकून सरळ तिच्या पायाच्या बोटातच अंगठी घातली.ती आपली सगळी कामं पायांनीच करायची, खाणं, बुटांच्या लेस बांधणं, लिहणं, कीबोर्डवर टायपिंग किंवा कार चालवणं.


कारण...जन्मताच तिला हात नव्हते.आईवडील हैराण आणि काळजीने त्रस्त...पण तिने हिम्मत हरली नाही.

तिने नकली हातांनी काम करता करता आपल्या पायांनीही काम करायला सुरुवात केली.


आज ती जगातील पाहिली महिला पायलट आहे, जीच्याकडे आर्मलेस पायलटच लायसेन्स आहे.वयाच्या बावीसाव्या वर्षी तिने पहिल्यांदा पायाने विमान उडवलं.


(अमेरिकेच्या जेसिका कॉक्स या आर्मलेस पायलटच्या संघर्षाने प्रेरित १००शब्दांची कथा.)



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy