Rutuja kulkarni

Inspirational Others


4  

Rutuja kulkarni

Inspirational Others


मोकळा श्वास

मोकळा श्वास

3 mins 186 3 mins 186

     "तुला किती वेळा सांगितले हे असले काही घालायचे नाही?? तुला ते शोभत नाही, स्वतःकडे बघतं जा आरशात, नशिब समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले, नाहीतर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते", असे टोमणे मारून रोजसारखा चं अमित(नमिता चा नवरा) कामावर गेला. खरेतरं आजची सकाळ ही नमिता साठी काही वेगळी नव्हती. नमिता खरेतरं शाळा, कॉलेज मध्ये हुशार, नृत्यामध्ये पारंगत, सर्वांना समजून घेणारी, मनाने निर्मळ आखीव रेखीव डोळे असणारे गोजिरे असे रूप. तिचा सावळा रंग वगळता तिच्या मध्ये नावे ठेवायला कोणाला ही जागा सापडायची नाही. नमिता ला खरेतरं खूप शिकायचे होते, नृत्यांगना म्हणून नाव मिळवायचे होते, पण आई _वडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्न विसरून लग्नाला संमती दर्शविली.

सुरुवातीला नमिता च्या स्वभावावर भाळलेला अमित नंतर नंतर मात्र तिला तिच्या रंगावरून रोज घालून पाडून बोलू लागला.

    अमितशी भेटल्यावर नमिता ला वाटले होते की, तो एक शिकलेला, समृद्ध विचारांचा असा एक मुलगा आहे. तिला त्या वेळी वाटलेले की, कदाचित तिचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न अमितचं पूर्ण करेल, पण कसले काय, नव्या नवरीचे नऊ दिवस संपले आणि नमिता चा सासूरवास सुरू झाला. सुरुवातीला सासू सासरे, बोलायचे तिला फक्त, पण नंतर अमित ही रोज चं तिला घालून पाडून बोलायला लागला. नृत्यांगना होणे दूरचं उलटं "हे असले फालतु छंद जोपासायचे नाही. हे घर आहे, तमाशाचा फड नाही", असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई सतत. नमिता चा रोजचा दिवस घरातील कामे करण्यांत, सर्वांची आवड निवड जपण्यात जात असे. तरीही प्रेमाचे चार शब्द ही तिच्या पदरात नव्हते. कधीतरी हे थांबेल या आशेवर नमिता सगळे सोसत होती, पण दिवसेंदिवस हे वाढतचं होते. सतत मनमारून जगायचे, यामुळे नमिता ची घुसमट होत होती. रोजचं हे सततचं घालूनपाडून बोलण तिच्या जिव्हारी लागायचं.

तसा तिने तिच्या आई _वडिलांजवळ हा विषय काढला, अमित पासून वेगळे होण्याचा विचार ही दर्शवला पण तिला समजून घ्यायचे दूरचं उलट तिलाचं समजूती च्या चार गोष्टी सांगून तिच्या आई वडिलांनी तिची खडसावणी केली. त्यानंतर मात्र नमिता खूप खचली. रोज चं असं जगंण तिला असह्य झालं. तरीही ती सारं निमुटपणे सहन करतं होती.

      आज सकाळी आँफिस मध्ये रागामध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. तरी ही सारे विसरून नमिताने त्याच्यांसाठी चहा, नाष्टा केला. खूपवेळ अमित आणि त्याचा मित्र गप्पा मारत होते, नंतर फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत गॅलरी मध्ये गेला, आल्यावर त्याला नमिता त्याच्या मित्रासोबत हसत खेळत बोलताना दिसली. खरेतरं अमितचा मित्र तिने केलेल्या नाष्ट्याचे कौतुक करत होता, पण अमित मात्र डोक्यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहचला. मित्रासमोर तो काही बोलला नाही, परंतु मित्र गेल्यावर मात्र अमित नमिता ला खूप काही बोलला, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून तो निघून गेला. आज मात्र नमिता च्या सहनशक्तीचा अंत झाला होता. रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होतं पण, आज अमितने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता. कुठेतरी म्हणूनचं आता तिला त्या घरात श्वास घ्यायला ही नकोसं वाटायला लागले. तिने पटकन बँग उचलली त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरहून आलेले मोजके दागिने घेऊन ती घराच्या बाहेर पडली. कुठे जायचे, काय करायचे, हे काहीचं ठाऊक नव्हते, ती संबंध रात्र तिने बस स्टैंड वर घालवली. ईथून पुढचा रस्ता तिला ठाऊक नव्हता, पण "लोक काय म्हणतील?? समाज काय म्हणेल?", या सार्‍याची पर्वा न करता तिने वाट धरली होती. पुन्हा मागे वळून पहायचे नाही असा तिचा निर्धार चं होता जणू.

एक अनोखा आत्मविश्वास घेऊन नमिता निघाली होती. आता तिला कोणाचे ही बंधन नव्हते. आज खर्‍या अर्थाने ती मुक्त होती. आज कितीतरी दिवसांनी तो हरवलेला "मोकळा श्वास", ती घेतं होती..!


Rate this content
Log in

More marathi story from Rutuja kulkarni

Similar marathi story from Inspirational