STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Inspirational Children

3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational Children

मोकळा श्वास

मोकळा श्वास

5 mins
268

"मी काय वाईट केले आहे कोणाचे?? माझ्या बाबतीत असे का? किती स्वप्न रंगवली होती आम्ही, बाळ आले की आमचे त्रिकोणी कुटुंब चौकोनी होऊन पूर्ण होणाऱ होत.. पण, आज आम्ही चौघे असे चार दिशेला विखुरले गेलो काय आहे नियतीच्या मनात??? का अंत पाहतो आहेस?? "

स्नेहल विचारात होती एकटीच शांत डोळे मिटून बसली होती.... काही महिन्यांपूर्वी असणारे हे असे हसरे कुटुंब... जणू काही कोणाची नजर लागल्यासारखं झालंय... चला बघूया नक्की काय झालय असे..


स्नेहल - समीर यांचा प्रेम विवाह, दोघेही चांगल्या पदावर होते..सगळे छान असल्यामुळे दोन्हीकडून  मिळाला आणि त्यांच्या संसार सुरु झाला. स्नेहल अगदी मनमिळाऊ होती त्यामुळे पटकन एकरस झाली घरात... सगळे छान सुरू होते, गोड बातमी आली आणि छोटी सई पहिली बेटी धनाची पेटी म्हणून आली... खूप कौतुक झाले, दोघेही खुश होते असे अगदी हसरे कुटुंब होते..


सई अगदी आई-बाबांसारखी हुशार होती. लहान असल्यापासून सगळ्यांची लाडकी होती अगदी गोंडस आणि लाघवी होती. वयाच्या मानाने खूप समजदार होती. हळू हळू ती मोठी झाली आणि मग् सगळेच विचारू लागले दुसरा चान्स घेण्याबाबत, तसा त्यांचा सुद्धा विचार होता पण पहिल्या बाळंतपणानंतर तिला थोडा थायरॉईडचा त्रास सुरू झाला होता म्हणून थोडे थांबले होते..


बघता बघता सई ५ वर्षाची झाली होती, त्यामुळे ते दोघे तसा प्लॅन करत होते.. अन् सगळे वाट बघत होते अशी गोड बातमी आली परत... खूप खुश होते, एवढूशी सई तर खूप खुश होती.. बाळ आले की मी असे करेन,मी त्याला झोपवणार असे सर्व ठरवत होती... खूप शहाणी झाली होती... आईला त्रास देत नव्हती... आणि स्नेहलला त्रास झाला की तीच रडायची आणि म्हणायची, "ए बाळा नको ना त्रास देऊ आईला" स्नेहल अगदी ऐकत बसायची, बाळाला कविता, श्लोक सर्व ऐकवायची..सगळे खूप आवडीने करत होती सई...


७ वा महिना लागला आणि कोरोनाचे सावट आले.. तशी सई अजून काळजी करायची... दिवसामागून दिवस जात होते.. अखेर ती वेळ आली... डॉक्टर म्हणाले, सी-सेक्शन करावे लागेल... सईला स्नेहल ने छान समजावले होते.. हट्ट करायचा नाही.. अगदी गुणी बाळ होती सई म्हणजे...


डिलिव्हरी झाली मुलगा झाला आणि सगळं वातावरण बदलून गेले, मुलगा नाजूक त्याला NICU मध्ये ठेवायची गरज होती, गावी तेवढी सोय नव्हती, मुंबईला न्यायला सांगितलं डॉक्टरांनी, तिकडे ह्या कोरोनाचे सावट,त्यात एक दिवसाचे बाळ, स्नेहल अजून शुद्धीवर आली नव्हती पूर्णपणे, सई तिच्या काकीकडे, समीर बाळासोबत मुंबईला...जणू काळ्या ढगासारख संकट सगळ्या बाजूने आले होते...


स्नेहल शुद्धीवर आल्यावर तिला सर्व समजले, बाळाला हृदयाला थोडा त्रास होता त्यामुळे श्वास घेताना तो अडकत होता... त्याला मुंबईला हलवले हे कळलं आणि तिला एकदम धक्का बसला... तिकडे तर कोरोना खूप वाढतोय, समीर एकटा काय करेल??बाळ नक्की बरे होईल ना असे खूप प्रश्न वार्यासारखे मनातले वादळ वाढवत होते... हॉस्पिटल म्हणजे कोरोनाचे वारे,त्यामुळे ईच्छा असून देखील सईला जवळ ठेवले नव्हते.... जीव अगदी घाबरा व्हायचा स्नेहलचा...


डिलिव्हरी झाल्यापासून त्यांच्या चौघांची झालेली ताटातूट... लगेच काही झाले तरी कोरोना झालाय अश्या खोट्या बातम्या पसरवणारे लोकं, आणि त्यांच्या त्या बोचणार्या नजरा... यातून कधी सुटका होते म्हणून अगदी रडकुंडीला आली होती... हे दिवस खडतर होते, त्यात कोणाची सोबत नव्हती...


जिथे डिलिव्हरी झाली त्या डॉक्टरांचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आला, त्यामुळे स्नेहल आणि बाळ दोघांची टेस्ट करण्यात आली ती सुद्धा पॉसिटीव्ह... आता मात्र तिचा धीर सुटत आला होता, सारखं समीर, सई यांचा चेहरा डोळ्यासमोर येतं होता... बाळाला तर तिने बघितलं पण नव्हतं...


रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यापासून घर सील केले, तिला दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यात आले, राहून राहून तिला सईची आठवण येतं होती, बिचारी सई तिला तर काही कळतच नव्हते... मोठे ऑपरेशन करावे लागणार होते बाळाचे... तें ऐकल्यावर स्नेहल रडू लागली. पण समीरने सांगितलं स्नेहलला, सगळे व्यवस्थित होईल धीर सोडायचा नाही, खूप कठीण प्रसंग आहे, पण आपण खचून जायचे नाही... मोठे सर्जन, हार्ट स्पेशालिस्ट वरळीला होते, तिकडे बाळाला घेऊन जावे लागणार होते... आणि तो तर रेड झोन एरिया... स्नेहल सारखी प्रार्थना करत होती... माझ्या समीरला काही झाले तर?? या विचारात तिला झोप लागत नव्हती... पण तिला बरे व्हायचं असेल तर खाणे, झोप हे सगळं व्यवस्थित व्हायला हवंय त्यात डिलिव्हरी मुळे आलेला थकवा.... समीर ने समजूत काढली आणि स्वतःची काळजी घेऊ लागली ती...


हा सगळा विचार करत असतानाच फोन वाजला आणि डोळे उघडून बघितले तीने, समीर बोलत होता.... बाळाचे रिपोर्ट नॉर्मल होते, आणि ऑपरेशन पण यशस्वी झाले होते... आनंदाने ती म्हणाली..म्हणजे मला आता बाळाला बघता येईल ना?? तिचा आनंद त्याला हवा होता पण तो खोटे बोलू शकला नाही, तो म्हणाला अजून एक ऑपरेशन करावे लागणार आहे... पण होईल सगळं व्यवस्थित तू तुझी काळजी घे... एवढे बोलतांना त्याला भरून आले आणि त्याने फोन कट केला... या सगळ्यात १५ दिवस उलटून गेले होते... पण तरीही ते चौघे एकमेकांना भेटू शकले नव्हते...


कधी हे काळ सावट दुर होईल?? असे म्हणत तीने हात जोडले.... डिलिव्हरी झाल्यापासून ना तिला मानसिक स्वास्थ मिळाले होते, ना शारीरिक.... तरीही ती खंबीर राहायचा प्रयत्न करत होती... पण व्हाट्स अॅप वर फिरणार्या अफवा बघितल्या कि खचून जाई...

तेवढ्यात सिस्टरने येऊन सांगितले कि तुमचा दुसरा रिपोर्ट नेगेटिव्ह आलाय, आज तुम्हाला डिस्चार्ज मिळेल..तिने आईला कळवले... आई वडील सासू सासरे सगळे जण अगदी हतबल झाले होते पण तिच्याकडे बघून ते खंबीर असल्याचे दाखवत होते...


पुढच्या आठवड्यात दुसरे ऑपरेशन देखील यशस्वी झाले आणि ८ दिवसात बाळ घरी येईल असे समीर ने सांगितले... पण अजून देखील माय लेकींची भेट झाली नव्हती... सई तशी समंजस आणि एवढ्या लहान वयात देखील खूप समजूतदार होऊन वागत होती, फोन वर बोलताना स्नेहल ची आई होऊन समजावून सांगत होती... पण स्नेहल मात्र हा दुरावा आता सहन करू शकतं नव्हती... पण तिचे हात बांधले गेले होते, तिसरा रिपोर्ट येईपर्यंत....


आणि आज महिन्याने सगळे व्यवस्थित झाले, सईला भेटली, समीर सुद्धा बाळाला घेऊन घरी आला... बाळ आता छान होते... आणि खऱ्या अर्थाने काळ्या ढगांचे सावट दुर झाले.. त्यांच्या आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनु आले...


अखेर सुटका झाली आणि हे दुसरे आयुष्य मिळाले, या सगळ्यात एक मात्र शिकलो की वेळ ही कोणावर सांगून येत नसते, म्हणूनच मला माहीती आहे,असे दाखवण्यासाठी अफवा पसरवून दुसऱ्याच्या दूःखाचे दिंडोरे पिटू नये....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational