STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

मोह

मोह

1 min
330

क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि दंभ असेही आपले षडरिपू आहेत आणि प्रत्येक व्यक्ती या षड्रिपूंचा आहारी जाते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोहाचे क्षण येत असतात परंतु त्या क्षणांवर ती मात करता आली पाहिजे भलेभले साधूसंत ऋषीमुनी या मोहाच्या क्षणाला बळी पडले प्रतिसृष्टी निर्माण करु शकणारे विश्वामित्र मेनकेच्या सौंदर्याच्या मोहाला एका क्षणात बळी पडले आणि वर्षानुवर्षाची तपश्चर्या भंग झाली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यामध्ये माणूस सत्तेच्या संपत्तीच्या लोभाला मोहाला बळी पडतो. 


आपण केबीसीमध्येदेखील उदाहरण पाहतो एखादी व्यक्ती 50 लाखापर्यंत जिंकलेली असते, परंतु एक कोटीच्या मोहापायी पुढच्या प्रश्नाचे उत्तर माहित नसतानादेखील अंदाजपंचे देते आणि डायरेक्ट 03:20 वर येते. हे म्हणजे सापशिडीतल्या खेळासारखे होतं. वर जाताजाता मोहाच्या एखाद्या क्षणी तो एखादा साप तुम्हाला गिळंकृत करतो आणि तुम्ही पार रसातळाला पोहोचता. यामध्ये मात्र काही महात्मे साधू मंडळी मोहापासून दूर असतात. जसा संसारी माणूस हापूस आंब्याच्या कोयीप्रमाणे असतो, कितीही चोखून खाल्ला तरी त्यातला रस आणि गोडी कमी होत नाही. तशी संसारी माणसाची संसारातील गोडी कमी होत नाही. त्याउलट साधूसंत चिकूमधल्या बीप्रमाणे असतात, वरवर जरी ते संसारात राहिले तरी अंगाला कुठली उपाधी चिटकवून घेत नाहीत. 


इतिहासामध्ये एक उदाहरण म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या पायाशी पेश करूनदेखील महाराजांची मती चळली नाही. त्यांना तिचा मोह पडला नाही. त्या क्षणी जिजाऊंनी केलेले संस्कार कामाला आले आणि महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले "अशीच अमुची आई असती सुंदर रुपमती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational