मोगरा आणि दोघांमधला अबोला
मोगरा आणि दोघांमधला अबोला
त्याचे आणि तिचे भांडण.... दोघांमध्ये अबोला.... कॊणी पुढाकार घेऊन बोलायला तयार नाही.... ती गेली रुसून आपल्या मुलाकडे... हो बरोबर वाचलत मुलाकडे... कारण हि गोष्ट आहे साठे आजी- आजोबा यांची... चला बघूया...
हा असा अबोला त्यांच्या मध्ये नेहमीच व्हायचा... लग्नाआधी असा अबोला झाला की तो मोगर्याचा गजरा आणायचा.. ती खुश व्हायची... आणि मग् ठरलेले गाणे म्हणायचा... "हा रुसवा सोड सखे,पुरे हा बहाणा सोड ना अबोला..." ती लाजुन हसायची आणि त्याच्या मिठीत शिरत असे...
लग्न झाले... गोड गुलाबी दिवस झाले... आणि बारीक सारीक कुरबुरी सुरू झाल्या... सुरवातीला ती पुढाकार घ्यायची... कारण तेव्हा बाईच्या जातीने नमते घ्यावे.. असच शिकवलं जायचं....
एकदा जोरात भांडंण झाले... लग्नाला दहा वर्ष झाली, तरी प्रत्येक वेळी तीच बोलायला जाई.... यावेळेस मात्र तिने ठरवलं की नाहीच बोलायचं.... दोन दिवस होत आले पण अबोला मात्र कायम.... बर असा अबोला होता की घरात कोणाच्या लक्षात पण आले नाही.... त्याला मात्र तो अबोला सहन होत नव्हता....
दोघेही अगदी रोजप्रमाणे रुटीन वागत होते.... वाट बघून त्यांनी वेगवेगळी गाणी लावुन तिच्याकडे हळूच कटाक्ष टाकला पण तीनेही पक्क ठरवले होते यावेळेस.... शेवटी त्यानेच तिच्या आवडीची मोगरा, चाफा ,बकुळी या सर्वच फुलांचे एक एक गजरा आणून केसात माळला आणि म्हणाला....
"हा रुसवा सोड सखे,पुरे हा बहाणा सोड ना अबोला... ती लाजुन हसली...." आणि त्याच्या मिठीत हरवली..... लगेच त्याने दुसरे गाणे म्हंटलं, लाजुन हसणे...अन हसुन तें पाहणे... मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे... आता मात्र प्रेम उतू जात होते दोघांचे.... अशी कुरबुर करत करत संसार बहरत गेला... दोन मुले मोठी झाली... त्यांची लग्न झाली... तरी ह्यांची प्रेमाची भांडण सुरूच.... आता झाले होते भांडण तें कोण विसरते ?? दोघेही हट्टाला पेटून होते की मी विसरत नाही... शेवटी हट्ट करून आजी आपल्या मोठ्या मुलाकडे गेली... धाकट्या मुलाला आणि सूनेला त्यांच्या या खोट्या भांडणाची सवय चांगलीच माहीती होती... त्यामुळे ते हसुन दूर्लक्ष करायचे...
पण ह्या वेळेस काहीतरी गंभीर दिसतय बाबा... सून बाई त्याला म्हणजे आपल्या कथेच्या नायकाला म्हणाली... पण कोणी माघार घेईं ना... गुडीपाडवा येईल आता म्हणून तिने सर्व तयारी केली... त्याचा काही फोन नाही... शेवटी आज बऱ्याच वर्षाने तिनेच माघार घेतली... फोन केला... तसा तो लगेच निघायची तयारी करतो.... आणि तेवढ्यात हा लॉक डाउन आला... सुरवातीचे दिवस अगदी कडक नियम... दोघांची ताटातूट... दोघेही तळमळत होते.... एकमेकांना भेटायला...
एक दिवस फोन आला... मुलाचा... बाबा... त्याच्या आवाजात... एक प्रकारचे दूःख... आवाज खोलवर गेलेला... आणि ती त्याच्या वर रुसून त्याला सोडून गेली कायमची.... ७० वर्षाचा संसार झाला त्यांचा...कारण तेव्हा लवकरच लग्न व्हायची... पण रुसून गेली ती शेवटची भेट सुद्धा झाली नाही त्यांची.... याची हुरहूर मात्र कायम त्याच्या मनात राहिली....
आज तिचा वाढदिवस... म्हणून तिच्या फोटो समोर मोगऱ्याचा गजरा... आणि तिच्या आवडीची मोरपंखी रंगाची पैठणी घेऊन आपला तो म्हणजेच मोहन त्याच्या मीरेसाठी गाणे बोलत होता.... "हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना अबोला........" जणू काही मीरा फोटोतून लाजत होती...

