Dr.sanjay Kulkarni

Abstract Others Inspirational

0.8  

Dr.sanjay Kulkarni

Abstract Others Inspirational

मनमुराद

मनमुराद

2 mins
8.6K


 आपण शुचिर्भूत  होतो, देवादिकाच्या पूजेला बसतो, सगळ कसं पवीत्र आणि मंगलमय वातावरण...लिखाण करणं हे मला अगदी तसंच वाटत.भाषेची, अक्षरांची,शब्दांची आपआल्या भावना अपूर्ण मनोभावे केलेली पूजाच! आणि त्यातून जे काही प्रकट होते ते दैवीच! आणि म्हणूनच मी स्वतःला आस्तीक समजतो.                                                       

             भाषा अस्तित्वात आपल्यापासून जो तो लिहीतोय आणि तरीही भाषेचं सौदर्य आणि अमर्यादपण अजूनही तसंच टवटवीत आहे.किती हा अवाका? तुम्हा आम्हाला लिहीतं,बोलत आणि मोकळं करणारी ही भाषा,मग ती कोणतीही असो,हीच आपल्या जिवंतपणाची खरी खून असते .आणिखरी गंमत ही की, ती आपल्याला कोणीच पूर्ण शिकवत नाही....मुद्यामूहून.जो तो ती आपोआप शिकत जातो,विकसीत करत जातो.कोणी लिहून तर कोणी न लिहीता,कोणी बोलून तर न लिहीता,कोणी बोलून तर कोणी अवाक्षरही न काढता,आपल्या देहबोलीतून व्यक्त करत.गंमत असते सगळी.....अनुभवायचं ठरवलं तर.

               सहज एखाद्या फुलपाखराला पकडावं तसे मी एकदा भाषेला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून नकळतपणे लिहायला लागतो.जसे मला त्या फुलपाखराला काही क्षण चिमटीत पकडणे सुखावह वाटते तसेच लिखाणाचेही झाले आणि चिमटीत साचलेल्या ओजळभर रंगांनी मनाला भूरळ घातली.जगण्याचा सोहळा झाला.

 लिखाण कसं असावं?...लिहीता वाचता न येणाऱ्या एखाद्या लेकरानं,हातात जे काही येईल ते धरून कागदावर मारलेल्या फरकांडयांसारखा बोलकं असाव.....दवाखान्यात ऑपरेशनपूर्वी संमतीपत्रावर सही करायला म्हणून कित्येक वर्षानंतर पेन धरून केलेल्या मोडक्या तोडक्या सहीतून दिसणाऱ्या काळजीसारखं असावं....आयुष्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या कागदापत्रावर करणाऱ्या स्वाक्षरीतल्या उत्सुकतेसारखं असावं....प्रेमपत्रातल्या सारखं उत्कट असावं...ऱ्हस्वदिघाना न जुमानता, तरीही लिहीलेलं शुध्द(?)लेखन असावं...ते तू असावं....ते मी असावं...आरशासमोर धरुनही सुलटं असावं ....मनासारखं चंचल असावंते क्षितीजावर बेमालूमपणे मिसळलेल्या रंगांसारखं,तरीही वेगळं असावं....सहज असावं....सच्चं असावं...त्या त्या वेळी ,काळाच्या साक्षीनं कोरलेलं शिलालेख असावां....मला वाटतं,लिखाणं मनमुराद असावं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract