Dr.sanjay Kulkarni

Action

3  

Dr.sanjay Kulkarni

Action

जमेल आपल्या हे?

जमेल आपल्या हे?

3 mins
8.5K


 “गुड मॅार्नीग काका,” “हाय”, “टाटा”, “काका, कुठे चाललात?” अशी शाब्दिक देवाणघेवाण किंवा मग मला दिलेल्या स्मितहास्याची परतफेड मिळेल या हेतूने माझ्यावर रोखलेले दोन-चार बोलके डोळे हा अनुभव मला दररोजचा.मी दवखान्यात जायला निघालो की कॉलनीत खेळणारी लहान लहान मुले त्यांच्या पोतडीत असलेल्या या शुभेच्छा किंवा वाक्य किवा उत्सुकता किंवा स्मितहास्य घेऊ तयारच असतात आणि मी मात्र अगदीच मख्खपणे या सगळ्याकडे पाहत, कपाळावरच्या आठ्यांनी यांना टाळत तिथून निसटण्याच्या मुडमधे असतो .कारण मला लहान मुलं आवडत नाहीत. ती बिचारी खेळण्यात रमाण असूनही प्रत्येकशीच असा संवाद साधत असतात आणि माझ्या मते कॉलनीतला मी एकटा सोडला तर बाकीचे सगळेच त्यांच्याशी प्रेमाने वागत असतात. मी ही अधूनमधून पुटपुटल्यासरसारखे करतो, उसने हसतो किंवा फारच मूडमधे असलो तर हात हलवून टाटा करतो ,पण हे सगळं मनापासून असतंच असं नाही .ती लहान मुलं मात्र येणाऱ्या प्रतिसादांना फारसे मनावर न घेता प्रत्येकशी अगदी दिलखुलासपणे संवाद साधत राहतात. अहंकार,अपेक्षा ,मानपान ,राग ,व्देष,कपट वगैरे पासून ही मंडळी अनेक योजनं दूर असते .मला जरी लहान मुलं आवडत नसली तरी मला त्यांच्यातल्या या निसर्गदत्त श्रीमंतीचा हेवा वाटतो.त्यांच्या वाटेला आलेला प्रत्यक क्षण ते अगदी स्वच्छपणे जगत असतात आणि आपण मोठी माणसं मात्र आपल्यात साचलेल्या गढूळपणाला उगाच कशाने तरी लेबल लावुन सतत वेष्ट्णात वावरत असतो.उगाच मोठ्या माणसांसारख आव आणून वागणारी किंवा बोलणारी लहान मुलं तर मला अजिबातच आवडत नाही . मी कधीच या लहान मुलांवर ओरडत नाही ,खेकसत नाही,त्यांना मारण्याचा तर प्रश्नच येत नाही .फक्त मी त्यांच्याशी इतरांशी होतो तसा म्हणा किंवा मी जसा आहे तसा ‘कनेक्ट’ होऊ शकत नाही .का होत असे मला ठाऊक नाही .पण तरीही मी या समस्त बच्चेमंडळींकडून सदैव काहींना काही शिकवण्याचा प्रयत्न करत असतो .त्यांचा नकळत ,शक्यतो संवाद टाळण्याचा प्रयत्न करत मी त्यांचे निरीक्षण करत असतो.फार गोड अनुभव असतो हा माझ्यासाठी .खर सागतो , आपण जरी त्यांच्यासारखा फक्त दहा –वीस टक्के वागण्याचा प्रत्यक केला तर अख्या जगातील संमस्या सपून जातील.पण लहान बनणं मोठ्ठा होण्याइतक सोप नसतं आणि लहान मुलांएवढं मोठ मन कोणाकडेच नसत.परवा माझ्या दहा-आकरा वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याने कॉलनीतल्या त्यांच्या सगळ्या मित्रांना त्यादिवशी संध्याकाळी घरी बोलावले होते .त्यांच्या खेळाखेळातील लुटूपुटूच्या भांडणांमुळे त्याने फक्त एका दोघांना वाढदिवसाचे निमंत्रण दिले नव्हते. वाढदिवस म्हणजे बच्चेमंडलींसाठी फार मोठा सोहळा! वाढदिवसाच्या एकदोन दिवस आधीपासून तो कॉलनीतल्या त्याच्या मित्रांना निमंत्रणफ देत फिरत होतो . वाढदिवसाच्या दिवशी सकाळी, निमंत्रण नसलेल्या त्या दोन मित्रांनी माझ्या मुलाला आईसोबत बाहेर जाताने गाठले आणि म्हटले की काकू,आम्हीपण पण येणार आहोत बर का वाढदिवसाला.माझ्या मुलाने ‘तू यायचे नाहीस’ वगैरे म्हटल्यावर

‘नाही आम्हाला पण यायचय. आम्ही येणारच’ म्हणत पांगापांग झाली आणि संध्याकाळी ते दोघे इतरांसोबत तितक्याच उत्साहाने हजर पण झाले. सकाळपर्यत त्यांना बोलवायचं नाही म्हणत विरोध करणारा माझा मुलगा देखील जणू त्याच्यात काही झालेलेच नाही एवढ्या निर्मळतेने त्यांच्यात समरसून गेलेला.आम्ही हत पाहत होतो .जमेल आपल्याला हे? आजकाल मला माझाच राग यायला लागलाय .लहान बनता येत नाही ,लहानांसारखं वागता येत नाही ,पण लहानाशी प्रेमाने तरी वागता येऊ शकतं ना .............म्हणून.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action