Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Jyoti gosavi

Inspirational Others


2  

Jyoti gosavi

Inspirational Others


मला काही सांगायचय

मला काही सांगायचय

3 mins 76 3 mins 76

खरं तर अशा खूप गोष्टी मनामध्ये असतात, त्या त्या क्षणी माणसाचं मन पेटून उठत आणि नंतर आपण ते सोडून देतो किंवा हळूहळू कालांतराने आपलं मन तेवढं बोथट होत जात. 


मला अजूनही चीड येते जेव्हा आपण जीव तोडून लोकांना पाणी वाचवा सांगत असतो. आणि काही ठिकाणी खरोखर एक हंडा पाण्यासाठी पाच -पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. परंतु शहरांमध्ये काय ,ग्रामीण भागामध्ये काय, ज्या लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो तीच लोक पाणी वाया घालवत असतात. 

चाळीमध्ये वाहणारे सोडून दिलेले नळ, त्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याला पाईप लावून बाथरूम मध्ये टबात सोडून दिलेले असतात. 

गावाकडे तर त्याच्या वरचा प्रकार असतो, तिथे बिना तोटीचे नळ वाहत असतात. आणि जर आपण काही सांगायला जावं तर आमच्याकडे मोप पाणी आहे. 24 तास पाणी आहे आता उत्तर असतं. 


तीच गत जेव्हा दुपारी बारा वाजता देखील रस्त्यावरचे लाईट चालू असतात. आपला जीव चुळचुळत असतो. परंतु आपण काय करू शकत नाही. सदर लाईट घालवण्यासाठी कोण जबाबदार आहे. 

साध एक बटन बंद करण्यासाठी का दिरंगाई होते? यासाठी कुठे कॉन्टॅक्ट करायचा हे आपल्याला माहित नसतं. काही ठिकाणी लग्न, समारंभ सार्वजनिक गणपती, या ठिकाणी मोठे मोठे फोकस लाईट दुपारी अकरा बारा पर्यंत चालूच असतात. आणि शासन सांगत असते विज वाचवा. अशा कित्येक साध्या-साध्या गोष्टी आहेत आता करोना मध्ये उदाहरण घ्या ना. लोकांना फक्त मास्क लावायला सांगितले आहेत. लोक ऐकत नाहीत. बाहेर फिरू नका सांगितले आहे लोक ऐकत नाहीत.  मास्कच्या आत सुद्धा गुटख्याचा तंबाखूचा पानाचा तोबरा भरलेला असतो, आणि सरळ सरळ मास्क खाली करून रस्त्यावर पचकन थुंकतात तेव्हा फार राग येतो. 

मुद्दाम ट्रॅफिकच्या भरलेल्या रस्त्यावरती आपली गाडी कुठेतरी मध्येच लावून ठेवणे. एखाद्या मुलीबरोबर नाहीतर दोन चार मित्रांबरोबर भर रस्त्यामध्ये गप्पा छाटत उभे राहणे मग रफिक किती झाले आहे आपली गाडी बाजूला काढली पाहिजे याचे काही भानच नसते. सोसायटीमध्ये पार्किंगची जागा असतानासुद्धा स्वतःच्या टुविलर आडव्या लावून ठेवणे. मग दुसऱ्यांचा विचार करायचाच नाही. माझं काम भागलं ना बस झालं मुळात रस्ते अरुंद इतकी ट्राफिक त्यात लोकं आपल्या गाड्या रोडवरती लावून ठेवतात अशा वेळी ते कोणाचा विचार तरी करतात का? बस मध्ये ट्रेनमध्ये जशी काय आपल्या पिता श्रींची मालमत्ता आहे अशा पद्धतीने नासधूस करूणे. मोठ्या मोठ्याने मोबाईल वर गाणी लावणे. दोन लोक झोपले असताना देखील घरात बसल्यासारखे बडबड करणे. 

आत्ताच्या अकरा तारखेचा किस्सा आहे. रात्रीचे दोन वाजता डब्या मध्ये सर्व मंडळी झोपली असताना, पुण्याच्या रेल्वे स्टेशनला एक स्त्री आणि दोन पुरुष चढले आणि आपल्या सीटवर बसून इतक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते जसे काय स्पीकरवर बोलत आहेत. शिवाय त्यांची ओळख वगैरे नव्हती. एकमेकांचे नातेवाईक देखील नव्हते, तिथेच एकमेकांचा मोबाईल नंबर मागून घेत होते. शेवटी असह्य झाल्यावर मीच उठून ओरडले तेव्हा कुठे शांत बसले. 

भ्रष्टाचार हा तर आपल्या सारख्या पामराने न बोलण्याचा विषय, कारण अक्षरशा झाडाच्या मुळापर्यंत पोहोचलेली ही कीड आपण ओरडून काहीच उपयोग नाही.

अजून एक गोष्ट आहे मुक्या प्राणीमात्रांचा छळ करणाऱ्या लोकांची मला खुप चिड येते .सहज रस्त्याने जाता जाता रस्त्याच्या साईडला बसलेल्या कुत्र्याला दगड मारणे, त्याच्या पेकाटात लाथ घालने शिकारीसाठी ट्रॅप लावणे आणि मुक्या प्राणिमात्रांची थोड्याशा पैशासाठी शिकार करणे त्यांना देखील जीव आहे त्यांना देखील भावना असतात त्यांची देखील पिल्ले बाळ असतात असा कोणी विचार करत नाही .अगदी जमिनीवर सरपटणाऱ्या सापापासून आकाशात उडणार्या पक्षां पर्यंत कोणालाही तुम्ही सोडत नाही ही इतकी अशी दुष्ट मानवाची ही जमात त्यांचे मला फार चिड येते कुत्र्याला जर कोणी काठी मारली तर तीच काठी घेऊन त्या व्यक्तीला रट्टा ओढावा असं मला मनापासून वाटतं

 कधी कधी मला डोंबिवली फास्ट मधल्या संदीप कुलकर्णीच पटतं, पण आता प्रवाहाविरुद्ध एक आवाज जरी उठला तरी त्याचं शेवटी काय होतं ते आपण बघितल आहे .अशा मनात साठलेल्या कित्येक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फक्त मनातच ठेवाव्या लागतात.


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Inspirational