STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

मकर संक्रांती

मकर संक्रांती

4 mins
395

       नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,आज आपण जाणून घेणार आहोत एका मोठ्या आणि पवित्र अशा सनाबद्दल. तुम्ही ओळखले असेलच आता कोणता सण येणार आहे तो.हो बरोबर तुम्ही जो विचार करत आहे तोच म्हणजे मकरसंक्रांत बद्दल सांगत आहे. भारत कृषीप्रधान देश आहे त्यामुळे भारतात कृषी व्यवस्था आणि त्याच्याशी संलग्नित असणारे असं समारंभ साजरे केले जातात. मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष दहाव्या मराठी महिन्यात येणारा सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे, ऊस, बोरे,गव्हाच्या ओंब्या अशा गोष्टी भरून त्या देवाला अर्पण करतात,आणि एकमेकांची ओठी भरून उखाणे घेतात. या दिवशी मुख्यत्वे तीळसंक्रांतच्या दिवाशी बायका उखाणे घेतात एकमेकांच्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांत ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकार सोनक्रांती म्हणून ओळखले जाते. आणि नेपाळमध्ये संक्रांति म्हणजे हस्तांतरण हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. संक्रांति म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण त्यामुळे वर्षभरात एकूण बारा संक्रांत येतात. आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, पंजाब आणि गुजरात मध्ये संक्रांतीच्या दिवशी महिना सुरू होतो तर बंगाल आणि आसाम मध्ये संक्रांतीच्या दिवशी महिन्याचा शेवट मानला जातो.मकर संक्रांति हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. मकर संक्रांति भारत आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो, पौष महिन्यात येणारा हा सण आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी हा सन साजरा केला जातो. सध्याच्या काळात हा सन जानेवारी महिन्याच्या केवळ चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तामिळनाडू मध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. तर कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशात याला फक्त संक्रांति असे म्हणतात. बिहारमधील काही जिल्ह्यांमध्येही हा सन साजरा केला जातो. या सणाला बिहारमध्ये तिला संक्रांती या नावाने साजरे केले जाते. काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाला उत्तरायण असेही म्हणतात 14 जानेवारीपासून सूर्य उत्तरे कडे जाऊ लागतो या कारणास्तव या सणाला उत्तरायात असेही म्हणतात. त्याला एक वैज्ञानिक दृष्ट्या कारण आहे ते म्हणजे पृथ्वीही हे उत्तरेकडून दक्षिणेकडे सतत सहा महिन्यानंतरच्या कळवधीनंतर वाकते आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.  मकर संक्रांतीचे महत्त्व :       मकर संक्रांतीच्या दिवशी जप, तप, दान, गंगास्नान,श्राद्ध आधी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने दिलेले दान शतपटिने परत मिळते अशी एक श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो.       मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि गंगा नदीच्या तीरावर दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. या उत्सवात तीर्थराज प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महास्थान मानले जाते. साधारणपणे सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो परंतु सूर्याचा मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी असल्याचे मानले जाते ही प्रवेश किंवा सक्रमक प्रक्रिया सहा महिन्याच्या अंतराने होत असते भारतीय दिनदर्शिकाच्या सर्व तारखा ह्या चंद्राच्या हालचालीवर आधारित असतात. परंतु मकर संक्रांति ही सूर्याच्या हालचालीवर आधारित असते. आपले पवित्र वेद भगवत गीता आहे आणि परमात्मा चे संविधान सांगतात की जर आपण एका पूर्ण संताकडून दीक्षा घेतली आणि पूर्ण ईश्वराची उपासना केली तर तो या पृथ्वीला स्वर्ग बनवेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करेल असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतः शनीच्या घरी जाऊन त्याला भेटतात मकर राशीच्या स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांति म्हणून ओळखला जातो मकर संक्रातीच्या दिवशी गंगाची भगीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले.

मकर संक्रांतीचे आहार दृष्ट्या ही महत्त्व आहे :

    मकर संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात, तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, गाजर अशा इतर शक्तीवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करतात. ते वापरण्यातला सर्वात दुसरा अर्थ स्निग्नता हा होय .सिंग्नता म्हणजेच स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात आणि स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू असतो. त्यामुळे या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वाढवायची आणि स्नेह संबंध जोडायची पद्धत आहे. जुने नाते समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायची आहे हा कार्यक्रम या दिवशी असतो म्हणून महाराष्ट्रात तिळगुळाचे लाडू करून वाटण्यात येतात.

तिळवण व बोर न्हाण :

   या दिवशी नवीन लग्न झालेल्या विवाहितेस हळदी कुंकवाचा समारंभ साजरा केला जातो. यामध्ये नवविवाहित त्याला नवीन साडी आणि नवीन दागिने घालून सजवण्यात येते व बाह्य स्त्रियांना बोलावून हा सण साजरा केला जातो. यामध्ये स्त्रिया बोरी, हरभरे, उसाचे तुकडे अशा प्रकारे मिश्रण तयार करून एकमेकांना हळदी कुंकू लावून ओटी भरल्या जाते आणि उखाणे घेण्याचा कार्यक्रम असतो. तसेच लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त नवे कपडे घालून त्यांच्या डोक्यावर चुरमुरे,बोरे,बिस्किट, गोळ्या, हरभरे, उसाचे तुकडे अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ जमा करून मुलांच्या डोक्यावर टाकले जातात. मीश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटही घालतात याला बोर न्हाण अथवा लूट असेही म्हणतात.बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हे बोर न्हाण केले जाते.      2024 मध्ये मकर संक्रांत ही दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी साजरी करण्यात येईल.           तर वाचक मित्रांनो अशा प्रकारे मकर संक्रांत आणि तिचे अनन्य साधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे. वाचून कसे वाटले आणि तुम्ही मकर संक्रात कशी साजरी करता आणि यादिवशी कोण कोण पतंग उडवण्याची मजा घेते हे नक्की सांगा. धन्यवाद🙏                             


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational