Sangieta Devkar

Tragedy

4.0  

Sangieta Devkar

Tragedy

मिताली

मिताली

4 mins
570


  सुमित रोजच्या ठीकाणी मिताली ची वाट पहात बसला होता,नेहमी प्रमाणे हातात सिगरेट होतीच. तो असाच ती येन्या आधी 10/15 मिनिट लवकरच यायचा,तिची वाट पाहायला त्याला छान वाटायचे. मिताली त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली,त्याने पटकन सिगरेट विझवली,हे ही त्याचे ठरलेलेच. सुमित हुशार,देखणा,तितकाच मनमिळावू, होता. पण ही सिगरेट ची सवय मात्र तो सोडू शकत नव्हता. पण एका मर्यादे पर्यन्त तो सिगरेट ओढायचा. मिताली त्याला पाहताच खटटू झाली,आणि म्हणाली,काय रे,सुमित कधीच ऎकणार नाहीस का माझे? निदान माझ्या साठी तरी सोड ना ही सिगरेट? 

मीतू जान,एक वेळ हे जग मी सोडेन,पण सिगरेटच मला सोडत नाही ना,,तरी मी ट्राय करतो आहे,तू प्लीज़ अशी रुसु नकोस. 

तू हे कायमच बोलतोस पण काही नाही फरक पड़त तुला,ठीक आहे मीच जर हे जग सोडून गेले,तेव्हा तर सोडशील ना ही सवय ? 

सुमितने पटकन तिला जवळ घेतले, म्हणाला वेडे तुझ्या शिवाय मी जगू शकेन् काय,याचा तरी विचार कर,अस काही मूर्खा सारख बोलु नकोस, आय रियली नीड यू जान,,आणि जगच सोडून जायचे तर व्हाय नॉट मि ? त्याचे डोळे भरून आलेले,,तशी मिताली ने घट्ट मीठी मारली,म्हणाली,वेड्या इतके प्रेम नको करु की माझ्या शिवाय जगण मुश्किल होईल,

नो नेव्हर जान,असच आणि इतकेच प्रेम मी आयुष्यभर करीन्. 


ते दोघे तिथल्या बाकावर बसले,तिने तिच्या बैग मधून पान्याची बाटली काढली आणि बाजूला असलेल्या गुलाबाच्या रोपाला थोड़े पाणी टाकले,हे ती रोजच करायची. ती म्हणाली,सुमित हे बघ,मी रोज या रोपाला पाणी देते,हे रोप आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. जेव्हा आपल्याला एकमेकां ची आठवण येईल तेव्हा इथे येउन बसायचं.  


असे हे दोघे प्रेम वेडे,जगाची पर्वा न् करता एकमेकांच्या प्रेमात अखण्ड बुडाले होते. रोज याच ठिकाणी भेटत असत,उद्याची सुंदर स्वप्न रंगवायची,थोड़े भांडायचे,रुसायचे मग मनवायचे,सुमित ची सिगरेट,,हे सगळ इथे चालायच. 

 आज हे नेहमी प्रमाणे सुमित मिताली च्या अगोदर इथे येवून तिची वाट पहात होता,15/ 20 मिनिट झाली,,हळू हळू तास झाला,तरी मिताली चा पत्ता नव्हता ती असे कधी करत नसे,,येणार नसेल तर त्याला आधी सांगत असे. पण आज इतका वेळ झाला तरी तिचा फोन नाही,की मेसेज नाही,मग त्याने तीला फोन लावला,तर फोन स्विच ऑफ होता,त्याने मेसेज केला पण नॉट डेलीवर्ड येत होतं. मग मात्र सुमित काळजीत् पड़ला, काय झाले असेल या विचारात तो घरी आला, नन्तर ही त्याने खुप वेळ मिताली चा फोन ट्राय केला पण फोन बंद च होता. सुमित तिच्या काळजी ने बैचेन झाला. दूसरे दिवशी तो तिच्या कॉलेज कड़े गेला,मिताली ची कोणी मैत्रिण भेटते का याचा विचार करत होता,त्याला अनघा मिताली ची मैत्रीण दिसली. तिने ही त्याला पाहिले,त्याच्या जवळ ती आली,तिचे डोळे पाण्याने भरले होते. त्याने विचारले, अनघा मिताली कुठे आहे? तिचा फोन का लागत नाही?प्लीज सांग ना काय प्रोब्लेम आहे? 


सुमित काल सकाळी मिताली ला हॉस्पिटल मध्ये अँडमिट केले आहे,तिला रक्ताची उलटी झाली. हे ऐकून सुमित बधिरच झाला जणु! आणि लगेचच मितालीकड़े निघाला. बेडवर मिताली शांतपणे पडून होती,सलाईन सुरु होते,तिचा चेहरा निस्तेज दिसत होता,सुमित ला पाहताच,तिच्या डोळ्या तुन अश्रु व्हावु लागले. सुमित तिच्या जवळ गेला,तिचा हात् हातात घेतला म्हणाला,मीतू तुला काहि ही होणार नाही,मी आहे ना तुझ्या सोबत,तुला काही होवू देणार नाही अग काल पर्यन्त ठीक होतीस ना तू मग हे अचानक काय झालं? मिताली चे गालावर पडलेले अश्रु त्याने पुसले,, मिताली बळे च हसली,,तिला माहित होते, की तीला कैन्सर झाला आहे,आणि ही शेवटची स्टेज होती. कोणत्या ही क्षणी ती सुमितला कायमचं सोडून जाणार होती. तिला इतकेच वाईट वाटत् होते की तिच्या शिवाय सुमित कसा राहणार? कसा जगणार? 


खुप वेड्या सारख तो तिच्या वर प्रेम करायचा,त्याला कोण सांभाळनार? आपल्या जाण्याने तो पूर्णपणे कोसळून् जाईल,हा विचार मनात येताच ती अजुनच रडु लागली,आणि अचानक तिच्या हृदया चे ठोके वाढू लागले,सुमितची अवस्था केवीलवाणी झाली होती,त्याला समजेना काय करावे तो घाबरून गेला होता,,त्याने डॉ ना आवाज दिला,मिताली चा हात् त्याने घट्ट पकडला होता,जणू त्याच्या पकड़ण्याने ती त्याला सोडून जाणार नव्हती. ती जोर जोरात श्वास घेत राहिली,,आणि क्षणभरच,,एकदम शांत झाली, सुमित ने तिला जोरात हलवले,,पण तिचा हात् थंडगार झाला होता, मीतू म्हणत त्याने जोरात टाहो फोडला,, मीतू तू मला नाही सोडून जावू शकत,उठ ना बघ तुझी शपथ मी सिगरेट ला हात् पण नाही लावणार,मला तू हवी आहेस ग,आपल प्रेम अस अर्ध्या वर सोडून कशी चाललीस तू ? उठ ना मीतू,,स्टुपिड आय काण्ट लिव्ह विदाउट यू,,, त्याचा आक्रोश पाहानार्याच्या अंत करणा ला हादरवून टाकत होता. 


सुन्न मनाने सुमित रोज त्या बागेत यायचा जिथे ते दोघ भेटत् असत,बधिर,गोठलेला,डोळे पाण्याने भरलेले,शून्य नजरेत हरवलेला,,,त्याचे लक्ष त्या बाजुच्या गुलाबा च्या रोपा कड़े गेले,ज्याला मीतू रोज पाणी घालायची,ते पूर्ण सुकून गेले होते,त्याच्या सारखेच निस्तेज,,,त्याला स्पर्श करत सुमित म्हणाला, मीतू कुठे आहेस ग,,बघ तुझा सुमित एकटाच राहिला ,ये ना ग,बघ मी सिगरेट ओढ़तो आहे,मला रागवायला तरी ये ,आता कोणा साठी सिगरेट सोडू मी,? अग मला कैंसर व्हायचा ,तो तुला कसा काय झाला? मीतू जान ये ना माझ्या साठी परत,,प्लीज,,असे म्हणत तो रडु लागला,त्याचे अश्रु थाम्बत नव्हते,आणि हातात सिगरेट,,,एक संपली की दूसरी,,,,,आता मीतू कुठे होती,,त्याच्यावर रुसायला,त्याला ओरडायला,,  सिगरेट च्या धुरात् डोळया तल्या पाण्यात मिताली चा चेहरा ,,बस्स,,!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy