Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Ujwala Rahane

Inspirational Others

4.0  

Ujwala Rahane

Inspirational Others

मिसळणीचा डबा

मिसळणीचा डबा

2 mins
218


अगदी सकाळी सकाळी आपल्या भेटीला येतो तो आपला सखा, मसाल्याचा डबा, कोणी मिसळणीचा डबा म्हणतात तर कोणी तिखट-मीठाचा डबा. नावे अनेक रुप मात्र एक. सगळ्या सख्यांचा प्राणप्रिय. जी सखी ज्या वेळेला बोलवेल तेव्हा हजर अगदी नीटनेटका, प्रत्येकीच्या आवडीप्रमाणे साजशृंगार केलेला.


जिरे, मोहरी, हिंग, तिखट, मीठ, मसाला अगदी या डब्यात आपल्या स्थानावर अगदी व्यवस्थित विसावलेले असतात. आवडीप्रमाणे पदार्थांत अगदी विनातक्रार मिसळून जातात.


मसाल्याचा हा डबा तुम्ही म्हणाल काय ही बाई कशावर पण लिहते. हो सहज मनात आले. ते मी कागदावर उतरवते मला विषयाचे बंधन नसते.


आता हाच मसाल्याचा डबा पण आपल्या दैनंदिनीमध्ये पहिल्या क्रमांकावर हं!

 

सगळ्या पदार्थांत मोजून मापून कसं आपलं अस्तित्व जपायचे हे या मिसळणीच्या डब्यातील छोटासा चमचा आपल्याला शिकवतो.


मसाल्याच्या डब्याबरोबर हा छोटा चमचा पण दिमाखाने मिरवतो. मूर्ती लहान पण किर्ती महान... अगदी ही उपमा याला बरोबर लागू पडते. सात पाळ्याचा हा डबा... अगदी सगळ्या जिन्नसांना खातेवाटपही बरोबर हं.! खरंच या डब्याकडून पण जीवनाचे सार गवसले.


जातपात विसरून एकत्र एकोप्याने राहतात. अगदी पदार्थाला चव द्यायचे काम एकजुटीने करतात. ही गोष्ट त्यांना कळते मग आपणच का अपवाद या वस्तुस्थितीला?


सहज यावरून एक रेसिपी सुचली, विनोदबुद्धी जागृत झाली.


या विषयाला अनुसरून एक छोटीशी माझी रेसिपी मी पोस्ट करते.


"लसणाची कुरकुरीत चटणी"


माझ्या लाडक्या भाचीच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये मामीचे तिखट म्हणून प्रसिद्ध आहे हं! हा झाला विनोदाचा भाग!.


आता पुढे सकाळी उठल्यावर कालनिर्णयवर बघायचे एकादशी-चतुर्थी नाही ना? याची खात्री करून घ्यायची, पिशवी उचलायची बाजारात जाऊन पावकिलो लसूण आणायचा. तो सोलायचा. वाटीभर लसणाचे बारीक तुकडे करायचे, मग कढई गॅसवर चढवायची, त्यात पळीभर तेल ओतायचे, मग चिमूटभर मोहरी टाकायची... मोहरीने तेलात नाच सुरु केला की, लसणालाही सोडा तेलात, मोहरीला कंपनी द्यायला, लसूण नाचून बेभान झाला की, गॅसचे म्यूझिक मात्र बारीकच ठेवायचे हं!


मग लावा दोघांना हळद चिमूटभर, मग चमचाभर तीळ, चमचाभर जिरे असू देत साथीला! मग चांगले 2-4 चमचे तिखट ओता त्याच्या अंगावर, हळूच गॅसचे म्यूझिक बंदच करून टाका. दाण्याचे कुट २ चमचे घालून, चवीनुसार मिठ घालून, कोथींबीरने सजवा छान मिक्स करा


आता पुढे चटणीसारखे तोंडी लावा, आता हे पण सांगायला हवे का?


Rate this content
Log in

More marathi story from Ujwala Rahane

Similar marathi story from Inspirational