akshata alias shubhada Tirodkar

Drama

3  

akshata alias shubhada Tirodkar

Drama

मीच माझ्या रूपाची राणी

मीच माझ्या रूपाची राणी

2 mins
370


सकाळी सकाळी आरशा समोर बसून नेहा आपल्या सौंदर्याला न्याहाळत मी माझ्याच रूपाची राणी हे गाणं गुणगुणत होती तशी दिसायला ती देखणी होती तेव्हड्यात नीरज तिथे आला तिच्या ह्याच सौंदर्यावर तर तो तिच्या प्रेमात पडला होता तो हि एकटक तिथेच उभा'राहून तिला पाहत होता दोघेही आपल्या आपल्या दुनियेत मग्न होते एवढ्यात मोबाईल ची रिंग वाचली तशी नेहा भानावर आली तिने पहिले तर तिच्या मैत्रिणीचा फोन होता नीरज हि तिथून सटकला बोलण्यात बोलण्यात तिला तिच्या मैत्रिणी कडून साखरपुड्याच आमंत्रण आल आणी तिने फोन ठेवला व लगेच तिने मोबाईल पाहुन अशी काही किंचाळी की नीरज ही तिथे पोहचला व म्हणाला "काय झालं "?

"अरे पाहात तरी माझी मैत्रीण मंजिरी ना तिचा होणारा नवरा हिनी कसला नवरा शोधला "

"म्हणजे"? 

"बघ ना तो कसा दिसतो तिला काही शोभत नाही आणी तिने कसा म्हणून त्याला पसंद केला दैव जाणे "

"अगं पण तो चांगला असेल "

"काय फायदा दिसायला चांगला नसेल तर जोडा शोभायला तरी हवे ना की आपल्या पाहा ना किती शोभतो आपण एकमेकांना हे काय ब्लँक अँड व्हाईट "

"जाऊ दे ना तिला आवडला तु कशाला चिंता करतेस"

"का करू नकोस अरे चॅइस म्हणून काही असतं ना "

निरज तिथुन गेला नेहा ने मंजिरीला फोन लावाला व प्रश्नांचा भडीमार केला

मंजिरी ने सगळं ऐकुन घेतले आणी म्हणाली " मान्य आहे माझा होणारा नवरा एवढा दिसायला सुंदर नाही पण नेहा त्याचे सौंदर्य चेहऱ्यात नाही त्यांच्या मनात आहे तो मनातुन देखणा आहे आणी तु म्हणतेस ना जोडा शोभला पाहीजे माझा नवरा खुप समजुदार आणी प्रेम करणारा आहे त्यामुळे आमच्या प्रेमाने आमचा जोडा नक्कीच शोभेल मी त्याच्या मनाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले ते ही जन्मभरासाठी त्यामुळे तु चिंता करू नकोस साखरपुड्याला मात्र नक्की ये "

नेहा मात्र निःशब्द झाली 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama