Meenakshi Kilawat

Tragedy Others

4.8  

Meenakshi Kilawat

Tragedy Others

मी स्वतला कीती ओळखलं

मी स्वतला कीती ओळखलं

3 mins
1.0K



   मी स्वत:ला किती ओळखलं हे बघण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत असते.परंतू मला कधी निपक्षपणे उत्तर मिळालेले नाही. मी प्रांजळपणे ही गोष्ट कबूल करते निरपेक्ष भावना जागतात पण तेवढ्याच जलद गतीने त्या विरतात ही, कधी माझ मन मला आरश्या सारख स्वच्छ नितळ, पारदर्शक दिसतं कधी माझ मन वैतागलेले उद्दीग्न उदास भासतं मी स्वत:शीच संवाद साधते आणि प्रश्नांची उत्तर पण मीच देते.


  काही घटना आपल्यासमोर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घडत असतात पण आपण काही करु शकत नसल्यामुळे मनाची सतत घालमेल होत असते. माझ्या मनाची व्यथा मी कुणाला न सांगता स्वत:लाच सांगत असते.आपल्या आयुष्यात कधी सु:ख तर कधी दु:खाच्या वनव्यात होरपळत जगत असतो या सर्व आंतरीक आणि बाह्य घटनेमुळे मन स्वास्थ आनंदी असतं तर कधी मन कुरतडतं असतं.

  नुकतीच घडलेली गोष्ट माझ्या जिव्हारी लागली होती.त्या दिवशी मी बाहेर गेले होते. परत आले तेंव्हा काहीतरी अघटित घडले असावे असे मला जाणवले.परंतू मी तिकडे दुर्लक्ष करुन आपल्या कार्यात दंग झाले. समोरच्या मैदानातं एक मोकाट गाय हंबरताना दिसली. म्हणुन मी बाहेर विचारपुस केली असता काही महिलांनी मला सांगितले. ही गाय दिवसभर हंबरत होती, खुपदा हंबरताना सर्वांनी ऐकले होते पन कुणी तिच्याकडे लक्ष दिले नाही.

            गाय सारखी येरझारा करीत होती.तिला काहीतरी वेदना होत असेल का? गाईला काय झाले ती रडवलेली कासाविस दिसत होती. गाईच्या डोळ्यातून सारखे अश्रृ वाहतांना दिसत होते.गाय अशी का वागत आहे जाणुन घ्यायला मी आतुर झाले माझी तळमळ शिगेला पोहोचली मी मनातल्या मनात कासाविस झाले. शंका कुशंका स्वस्थ बसु देईना अस करता संध्याकाळ झाली. आजुबाजूच्या काही महिला बाहेर आल्या होत्या मी त्यांना लगेच विचारपुस केली. त्या महिलांनी मला सांगितले की गाय गाभण होती ती आज व्याली होती.


 आमचे गाव तालुका प्लेस असल्यामुळे तिथे सर्व स्थरातील महिला होत्या. काही शिकलेल्या तर काही अशिक्षित होत्या. त्या महिला मला गाई बद्दल माहिती सांगु लागल्या. आज ही गाय व्याली होती अन् ती जनत असतांना तिचे वासरू डुकरांनी ओढून नेले होते. मी क्षणभर आवाक होउन स्तब्ध राहिले होते.त्या महिला सांगत होत्या.आणि मी सारखे प्रश्न त्यांना विचारत होते.


 मग गायीने विरोध कसा केला नाही आणि कोणीच कसा प्रतिकार केला नाही ? मला आताशी चीड यायला लागली होती.मी मनातून हेलावले उद्दीग्न झाले होते गाय जनत असता तिला असह्य वेदना होत असेल म्हणुन तीने प्रतिकार केला नसेल कदाचीत मी प्रश्नांकित नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले होते. तिच्या गर्भातून वासरु बाहेर पडण्याच्या आत डुकरांनी वासरु ओढून घेवून पळुन गेले आणि म्हणुन ती गाय आज सारखी रडत वेड्यासारखी धावत होती.गडबडा लोळत होती. तिची माया तिला स्वस्थ बसू देत नव्हती.जिकडे तिचे बाळ घेवून डूकरे गेले होते तिकडे ती जात होती ,पुन्हा परत येत होती.भिंतीवर डोक आपटत होती.जनावर असूनसुद्धा ममतेचा कळस गाठणारी दग्ध स्थिती पाहून कुणाच्याही डोळ्यात अश्रृ येतील इतकी ती आपल्या बाळासाठी तळमळतांना दिसत होती.


      आपण त्यांना मुक जनावर म्हणत असतोय.पण तिचा आपल्या बाळासाठी होत असलेला आकांत तिच्या संवेदना मानवांच्या परे दिसत होत्या. वासरु जेंव्हा डुकरांनी ओढून नेले तेंव्हा त्या वासराचे नाळ सुटले नव्हते ,गाईला आधिच्या प्रसव वेदना नंतर जखमेच्या वेदना किती असह्य असेल तो कालावधी त्या व्यालेल्या गाईचे दु:ख ऐकून मी तर काही क्षण अबोलच झाले होते.त्या गाईच्या हंबरण्याने पुर्ण परीसर गुंजविला होता.


परंतू कुणीच कशी तीची मदत केली नाही.आजचे जग प्रगतिच्या मार्गावर अग्रेसर होतो आहे .घरोघरी टिव्ही मोबाईल चा सराव वाढल्यामुळे बाजूच्याच घरात काय होते आहे हे आपणास माहित होत नाही.मग लोंकांच्या कानात त्या गायीचे रडणे विव्हळणे,हंबरने गेल असेल काय? माझ्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरूच होता. विचारातच कुंठत प्रतीप्रश्न भेडसावत होते.

 "मी ह्रदयातून दग्ध झाले होते काय करत होते सर्व लोक मी गलबलुन स्वत:शीच प्रश्न केला.सारखी माझ्या मनाची कालवाकालव गुरफटून मलाच डिवचत होती. त्या गाईच्या ऐवजी जर कोणत्या महिलेसोबत झाले असते तर काय?


    "मी निरूत्तर" माझा प्रतीप्रश्न माझ्याच तोंडावर सनसनित तमाचा पडल्याचा भास झाला. विकृत भयकंर रक्तरंजित झालेले दोन्ही हात दिसत होते. ओठावरचे ते विक्षिप्त हास्य मला दात विचकून जाळत होते. मोठमोठे बॅनरवरचे काळे अक्षरे विभस्य दिसत होते. डोळ्यात असंख्य कुत्सित हावभाव करून बाहूल्या नाचत होत्या. मी दगड उचलला व क्षणात भिरकविला तक्षण खणखण आवाज झाला सगळीकडे विराण स्तब्धता पसरली . 


माझे मन पुन्हा मला प्रश्न करितो की तु त्या ठीकानी असती तर तू काय केल असत" ? मी निरूत्तर होवून स्वत:ला पारखण्याचा प्रयत्न करित होते. परंतू उत्तर नदारत ,मी काहिच न करणारी बेमालून व्यक्ती काहीतरी करू शकत होते.परंतू स्वत:ला मी ओळखलंच नव्हते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy