Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

म्हातारपणाची काठी

म्हातारपणाची काठी

3 mins
826


नेहाची नुकतीच परीक्षा आटोपली. आणि सगळ्या मैत्रिणीने सिनेमाचा प्लॅन आखला. आई उद्या मला लवकर उठव. आम्ही सगळेजण मूवी बघायला जाणार आहोत. नेहा मला उद्या दवाखान्यात जायचं आहे उद्या माझी अपॉइंटमेंट आहे माझ्यासोबत चालशील मग जा तुला कुठे जायचं ते. ठीक आहे. एवढे बोलून नेहा झोपली.


सकाळी नेहा लवकर उठली. लवकर लवकर काम आटोपले आणि ठीक दहा वाजता त्या दवाखान्यात पोचल्या. नंबर यायला बराच वेळ होता म्हणून मी निवांत त्या बेंचवर बसले. सहज माझे लक्ष समोर असलेल्या म्हातारा म्हातारीकडे गेले दोघे एकदम जख्खड म्हातारे होते. ते दोघेही एकमेकांना साथ देत होते. त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर करुण भाव दिसत होता. थरथरणाऱ्या हातांनी ते एकमेकांना सावरत होते. दोघांच्याही हातात काठी होती. सुरकुतलेल्या कातड्यावरून त्यांच्या शरीरावरच्या नसा स्पष्टपणे दिसत होत्या. मी इकडे तिकडे बघितले सोबत कोणी आहे का. पण मला कोणीही दिसले नाही. तिकडे बघून वाटलं की तरुणपणी यांच्यात खूप प्रेम असेल. जेवढ या वयात असेल. आता हे त्यांच्याकडे बघून वाटतं ते एकमेकांना इतके जीवापाड जपत होते.


या वयात त्यांची मुलं नातवंडं, सोबत नाही बघून खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्याकडे बघून आपसूकच मनात आलं की, प्रत्येक मुलाने आपल्या माय बापाला समजून घ्यायला हव, आज त्यांच्यावर आपण ही वेळ आणली उद्या आपली मुलं कदाचित ही वेळ आपल्यावर आणेल तर. आई-वडिलांची जबाबदारी ही शेवटपर्यंत संपत नाही. जी मुलं म्हातारपणी आपल्या आई-वडिलांना त्रास देतात. त्या वेदनांना कोणाच्याही सात्वनांचा भार सहन होत नाही वा त्या पेलवत नाही. खरंच या म्हाताऱ्या लोकांना या वयात त्यांच्या दुःखी व वेदनादायक आणि कठीण काळात त्यांना जिव्हाळ्याची प्रेमाची व आनंदाची गरज असते या म्हातार वयात झालेल्या वेदना या हृदयात लपवल्या जातात. 


समजा या म्हातार वयात दोघांपैकी एकजण त्याला सोडून गेला तर तेव्हा त्या व्यक्तीचे जगणे कठीण होऊन जाते. त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात एक विचार आला, त्या लेकरांसाठी आई-वडील संपूर्ण आपलं आयुष्य त्यांच्यासाठी घालवतात, हीच मुलं मोठी झाल्यावर त्यांना अधांतरी सोडून जातात. त्या थकलेल्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर दुःखाच्या सुरकुत्या दिसतात आणि आयुष्याच्या रस्ता ओलांडताना शेवटच्या वळणावर त्यांची मुलं त्यांना दुःखाचा दिवस दाखवतात. हे विचार मनात पटकन सरकुन गेले.


एवढ्यात त्यांचा नंबर आला कसातरी धडपडत ते आत मध्ये गेले आणि दहा मिनिटांनी ते बाहेर आले तेवढ्यात त्या आजीबाईचा तोल गेला ती धपकन खाली पडली. तशी मी लगेच उठून तिला सावरण्याचा प्रयत्न केला. व तिला उभे केले आणि तिच्या हाताचा स्पर्श माझ्या मनात काहूर माजून गेला. दोघांनी एकमेकांना सावरलं आणि धडपडत बाहेर पडले खरंच देव विषाची परीक्षा बघतो. मुलं असून काय फायदा. जाऊ दे तेवढ्यात आईचा नंबर आला आम्ही चेक करुन बाहेर पडलो. नंतर मला अश्विनीचा फोन आला कुठे ग आम्ही पोहोचलो लवकर ये. मी आईला रिक्षा करून दिली व मी माझी गाडी घेऊन सिनेमागृहात पोचली.पण त्या सिनेमापेक्षा मला डोळ्यादेखत आज जिवंत सिनेमा बघायला मिळाला. एक सत्य मला सांगून गेला, आई-वडिलांना थकलेल्या हातांना आधार देण्याची गरज असते. त्यांच्या म्हातारपणाची काठी बनून त्यांना सावरण्याची गरज असते. त्यांच्या अंधुक दिसणाऱ्या नजरेला स्वतःच्या नजरेने प्रकाश दाखवण्याची त्यांना खरी गरज असते. म्हणून आयुष्यात आपल्या आई-वडिलांना निर्मळ अंतकरणानी त्यांना प्रेम द्या त्यांना जपा. फक्त उद्या तुमच्यावर ही वेळ येईल असं काही होऊ देऊ नका.


सिनेमा बघतांना मला तीच वृद्ध मंडळी दिसत होती. घरी आल्यावर मी आईला खूप घट्ट मिठी मारली आणि आईच्या मिठीत मनसोक्त रडली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy