Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

म्हातारी बाग

म्हातारी बाग

4 mins
154


तसं या बागेच खरं नाव ' राजा गार्डन ' पण अंनहुतपणे तिचं नाव झालं होतं ' म्हातारी बाग '...इथे सतत फक्त लहान मुले आणि आजी आजोबा यांचच राज्य असतं ...आधी तशी टवटवीत असणारी ही बाग आजकाल जरा मरगळलेली आणि त्यामुळेच ' म्हातारी ' वाटायला लागली होती.

' यंग ओल्ड ' असा एक आजी आजोबांचा एक छान ग्रुप होता .त्या ग्रुपचे अधिपत्यच या बागेवर होतं.त्यातही अधून मधून आजी आणि आजोबा यांचा हळूच वेगळा वेगळा ग्रुप तयार होई आणि त्यांचं मोठ्या आवाजात खुसुर पुसुर चालायचं ...हळू बोललेलं ऐकू यायचं नाही ना कोणालाच ...

बागेचा वेळ तसा रात्री आठपर्यंत होता पण खास लेले आजोबांसाठी ती वेळ रात्री दहापर्यंत वाढवली होती .


लेले काकूंना दोन वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली आणि लेले काकांना मुलाकडे येऊन राहावे लागले.त्यांच्या सुनेला सासरे डोळ्यासमोर नको असायचे पण पर्याय नव्हता ... लेले काकांना एक हार्ट अटॅक येऊन गेला होता , मुळात स्वभाव गोड त्यामुळे सतत साखर वाढलेली ...अश्या अवस्थेत एकटं राहणं रिस्की होतं त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना घरी आणलं .पण सुनबाईला हे सहन होणार नव्हतं त्यामुळे ती सकाळी ती ऑफिस ला जाईपर्यंत आणि ती संध्याकाळी परत आली की लेले काका बागेत मुक्काम ठोकून असत.संध्याकाळी जेवणाचा डब्बा सोबत घेऊन बागेतच जेवण करून रात्री दहाला घराची वाट धरायची असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असे .


तसे सगळे आजी आजोबा बागेत बसून संध्याकाळी धमाल करायचे पण रात्री सगळे आपापल्या घरी जायचे. बिचारे लेले काका मात्र एकटेच अंधाराच्या साथीने तिथे बसून राहायचे....घरचे दरवाजे त्यांच्याकडच्या किल्लिनेही उघडण्याची त्यांची हिम्मत नव्हती!. घरी आपल्यामुळे होणारी किरकिर आणि त्यात मुलाची होणारी कुचंबणा त्यांचं मन हेलावून टाकायची...रोज देवाचा धावा करायचे ते पण देव काही त्यांचं एकत नव्हता आणि त्यांना काही वर बोलवत नव्हता....


आजही त्यांना तो दिवस लख्ख आठवतो...नुकतेच ते मुलाकडे राहायला आले होते आणि सुनेचा रोजचा कांगावा आणि मुलाला होणारा त्रास यावर उपाय म्हणून संध्याकाळी सून घरी येण्याच्या वेळी ते बागेत येऊन बसले होते...तशी बाजूला राहणाऱ्या शिंदे कुटुंबाची आणि त्यांच्या काही मित्रांची ओळख झाली होती.सगळेच घरी परत जायला निघाले ...पण लेले काका मात्र तिथेच बसून होते.शेवटी वॉचमन त्यांना घरी जा म्हणाला , त्याला गेट बंद करून जायचं होतं.लेले काकांच्या डोळ्यातलं पाणी शिंदे काकांच्या नजरेतून सुटले नव्हतं.ते लेले काकांना घरी घेऊन गेले.लेले काकांचा बांध फुटला...सगळी हकीगत एकूण शिंदे काका काकू हेलावले... आग्रहाने त्यांना जेवायला लावले.थोडावेळ गप्पा मारून लेले काका घरी गेले.


शिंदे काका काकू दोघेही अगदी मनमिळाऊ आणि परोपकारी वृत्तीचे होते.एकुलता एक मुलगा अचानक अपघातात दगावल्यामुळे सैरभैर झालेले दोघे मित्रांच्या साथीने हळूहळू सावरले होते.अनेक ठिकाणी होईल तसे समाजकार्य करून समाधानात जगत होते. लेले काकांच्या प्रॉब्लेम वर सगळ्यांच्या मदतीने एक सोल्युशन निघाले... बागेचा वेळ वाढवण्यात आला आणि सगळे मित्र आळी पाळीने लेले काकांसोबत थांबून त्याचं दुःख कमी करायला मदत करत होता. सगळ्यांच्याच जीवनात दुःख होतंच ...फक्त त्याची कारणे वेगवेगळी होती पण सगळ्यांनी ठरवून आनंदी राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता.एकमेकांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे मागे बघत नव्हते.एखादा भावनाशील झाला की सगळे हजर...' यंग ओल्ड ' ग्रुप मधले सगळे खूपच जीवाला जीव देणारे होते.


लेले काका आता खूप आनंदात राहत होते . सगळ्यांचा बरोबर खुप छान वेळ जात होता. सगळे मिळून कधी अनाथ आश्रमात जायचे , तर कधी वृद्धाश्रमात .बागेतल्या गप्पा तर नेहमीच्याच .सगळ्या काकू रोज एक एक मस्त पदार्थ करून घेऊन येत असत , लेले काकांसाठी सगळेजण थोडा जास्तच खाऊ आणत असत.त्यांना असं पाहून त्यांच्या सुनेला अधिकच द्वेष वाटायला लागला होता त्यांचा ! तिचा आक्रस्ताळेपणा वाढतच चालला

 होता .आणि एक दिवस ...


सकाळी सकाळी लवकर बागेत गेलेले लेले काका सून ऑफिसला गेली असेल म्हणून घरी आले ...पण ही डोक्याला हात लावून रडत बसलेली ...काकांनी सगळं बाजूला ठेवून तिची प्रेमळपणे विचारपूस केली पण तिने अजूनच आरडा ओरडा सुरू केला आणि रडतच धाडकन झाली पडली...काका घाबरले ...बाल्कनीत जाऊन त्यांनी आपल्या मित्रांना आवाज दिला ...काही मिनिटातच कोणीतरी एम्बु बोलावली आणि तिला ताबडतोब ऍडमिट केलं...रीमाला बरेच प्रॉब्लेम होते...ऑफिसचा ताण आणि घरातही सतत चिडचिड आणि त्रागा त्यामुळे रीमच्या हार्ट वरही इतक्या कमी वयात ताण पडला होता...त्यातच ब्रेन ट्युमर च निदान...काका खूप घाबरले ...त्यातच आदल्याच दिवशी त्यांचा मुलगा कामासाठी परदेशी गेल्यामुळे तो लगेच परत येणं शक्य नव्हतं...


लेले काकांनी मन घट्ट केलं .त्यांच्या जिवाभावाच्या मित्रांच्या मदतीने सगळं व्यवस्थित पार पाडलं . रीमाचं ऑपरेशन व्यवस्थित झालं . या वयातही प्रसंगावधान राखून रिमाला योग्य वेळी हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याबद्दल डॉक्टरांनी काकांचं विशेष कौतुक केलं...काकांनी त्यांची सगळी जमापुंजी कुठलाही पुढचा मागचा विचार न करताच रीमासाठी खर्च केली... तितक्यात त्यांचा मुलगाही परत आला आणि सुनेला डिस्चार्ज मिळून ती ही घरी आली.


लेले काकांनी मुलाजवळ वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय जाहीर केला आणि ते तयारीला लागले....रीमा धाय मोकलून रडू लागली ..." बाबा..." अशी हाक तिने पहिल्यांदाच मारली होती..." बाबा मी माफीच्या योग्य नाही पण शक्य असल्यास मला माफ करा .मी चुकले त्याची शिक्षा मला मिळाली पण मी तुमच्या पाया पडते आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही असं वचन मला द्या .आणि आता तुम्ही दिवसभर घरीच राहायचं ...आम्हाला आणि आमच्या होणाऱ्या बाळाला तुमची गरज आहे ..." नातवंडांच्या आगमनाची गोष्ट कळताच लेले काका आनंदाने न्हाऊन निघाले ! पण दुसऱ्याच क्षणी पूर्वीच्या गोष्टी आठवून त्यांचे डोळे पाणावले.


रिमाने त्यांचे पाय घरले ...त्यांनी तिला जवळ घेऊन सगळं विसरून आता नवी सुरुवात करण्याचं ठरवलं... यथावकाश रीमाने गोंडस मुलीला जन्म दिला..." तुझी सासू परत आलीय ग ...आता आम्ही दोघं मिळून तुला सासुरवास करणार ..." लेले काकांच्या आणि त्यांच्या नातीच्या सहवासाने आता ' म्हातारी बाग ' पुन्हा टवटवीत झालिये आणि ' यंग ओल्ड ' ग्रुपही जास्तच यंग होत छोट्या स्वीटीबरोबर आनंदात रामबाण आहे ...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational