Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others


3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others


मेहंदी पुन्हा रंगली..!

मेहंदी पुन्हा रंगली..!

2 mins 218 2 mins 218

' फुलले रे क्षण माझे फुलले रे ,

मेहंदी ने हो हो शकूनाच्या... मेहंदीने...' 

प्रिया तिचं आवडतं गाणं गात तिच्या जिवलग मैत्रिणीला मेहंदी काढत होती..परवा तिच्या जिवलग सखीच लग्न होतं !

मेहंदी म्हणजे प्रियाचा की प्राण...अगदी कुठलाही सण आला की प्रिया मेहेंदी नक्की काढायची..

थोड्याच दिवसात प्रियाचं उमेशशी लग्न ठरलं... उमेश भारतीय सैन्य दलात कॅप्टन होता...दोघांचा जोडा अगदी छान शोभत होता...

प्रियाने लग्नात अगदी हातभर आणि पायभर मेहंदी काढली ... उमेशला सुध्दा मेहंदी काढायला तिने मनवल..त्यानेही तिची आवड म्हणून स्वतःच्या हातावर मेहंदी काढली...दोघांच्या हातावरच्या गडद रंगाने एकमेकांवरील प्रेमाची पावती दिली होती...

" तुझ्या हातावर मेहंदी खूपच सुरेख दिसते...नेहेमी मेहंदी काढत जा..त्यामुळे तुझं खुळलेल रूप मला खूप आवडतं " उमेष ने तिला अगदी तिच्या मनातलं बोलून दाखवलं...मग काय अगदी नेहेमी प्रिया मेहंदी काढत बसायची...तिच्या घरचे तिला खूप चिडवायचे...

नवलाईचे दिवस संपले आणि उमेष ला रुजू व्हावं लागलं...भरलेल्या डोळ्यांनी आणि मेहंदी भरलेल्या हातांनी प्रियाने त्याला निरोप दिला...

आणि एक दिवस ती बातमी आली... कॅप्टन उमेष विरगतीला प्राप्त झाले...सगळ्या घरावर दुःखाचं सावट पसरले...रडून रडून प्रियाचे अश्रू सुकून गेले...शेवटी हळूहळू सगळेच सावरू लागले...प्रियावर सासू सासऱ्यांची आणि ननंदेची जवाबदारी आली..ती तिने सर्वतोपरी पेलली...


काळ पुढे सरकत होता ...आज वटपौर्णिमा होती...प्रिया खूप उदास होती...रात्रभर ती रडत होती...सकाळी मात्र सासूबाईंनी तिला जवळ घेतलं आणि मेहेंदी चा कोन तिच्या हातात दिला...

" प्रिया चल पटकन मला मेहेंदी काढून दे बरं आणि मग तुझ्याही हातावर छानशी मेहंदी काढ ...मग पूजेला जाऊ आपण "

" आई अहो काय बोलताय तुम्ही ? विधवेने मेहंदी आणि पूजा कशी करायची ? " प्रियाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते...

" अगं मला माहिती आहे तुला मेहंदी किती आवडते ते...नवरा गेल्यामुळे बाईचं आयुष्य रंगहीन होतं पण आपला उमेष मात्र देशासाठी शहीद झालाय , आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा...' तुझ्या आयुष्यातील मेहंदीचा रंग नेहेमीच भरलेला राहील ' असं वचन मी उमेषला दिलंय...आणि ते मी पाळणारच ! "

आईंच्या बोलण्याने प्रिया खूप सुखावली...आईंच्या कुशीत मनसोक्त रडली आणि मग मेहंदी च्या रंगात रंगली...

घरी मेहंदीचे क्लासेस तिने सुरू केले आणि लग्नाच्या ऑर्डर सुद्धा तिला मिळू लागल्या...दुसऱ्या मुलींच्या हातावर रंगलेली मेहंदी तिला आनंद देऊ लागली होती !

मेहंदीमुळे आता तिचं नीरस, बेरंगी आयुष्य रंगीत होऊ लागलं होतं ...!!


Rate this content
Log in

More marathi story from Smita Bhoskar Chidrawar

Similar marathi story from Inspirational