Madhuri Sharma

Drama

3.6  

Madhuri Sharma

Drama

मेघादित्य

मेघादित्य

5 mins
249


 हॅलो, आदी किती वाजेपर्यंत घरी येशील?

हं, मेघा, आज उशीर होईल.....

अरे यार काय आदी, तू पण ना रोजच उशीर करतोस.......

आज तरी लवकर ये ना.......

आपला लग्नाचा वाढदिवस आहे ना आज....‌

ऐक ना, मला खरंच शक्य नाहीये....‌

कामाचा ताण आहे फार.....

चल मी ठेवतो आता, तू जेवण करून झोप.

बरं ठीक आहे.

फोन ठेवताच, मेघाच्या डोळ्यात पाणी आलं.....


कोरोना काळात म्हणजे दोन वर्षांपूर्वी तिचं लग्न आदित्य सोबत झालं. दोघांचं अरेंज मॅरेज आहे. ‌

कोरोना होता म्हणून ते दोघे लग्नानंतर कुठेही फिरायला गेलेले नव्हते.

सुरुवातीला मेघा सासू-सासऱ्यासोबत राहु लागली. कारण तिच्या नवऱ्याचा जाॅब पुण्यात होता आणि पुण्यात तिची राहण्याची सोय अजून झालेली नव्हती. 

एकंदरीत असं सुरुवातीला सर्व चांगलं चालूं होतं. 

पण बायकोविना आदित्यला करमत नव्हते. म्हणून लग्नाच्या एका वर्षानंतर त्याने मेघाला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आदित्यच्या आईला ते काही पटलं नाही. आणि तिथून त्या दोघांच्या नात्यात बिनसायला सुरुवात झाली.

आदित्यची आई रोज काही ना काही कारण काढून, मेघाविषयी आदित्यच्या मनात भरवत असे.

ज्यामुळे आदित्य मेघा बरोबर लहानसहान गोष्टींवरून भांडण करू लागला.

मेघा समजुतदार होती. तिला वाटायचं आदित्यला कामाचा ताण जास्त आहे म्हणून त्याची चिडचिड होते. 

काही काळानंतर पुण्यात सेट झाल्यावर, मेघानेही जाॅब करायला सुरुवात केली.

त्यामुळे आदित्यच्या आईला अजून एक कारण मिळालं. ती आदित्य ला सांगायची आजकालच्या जगात तुम्हां मुलांचं काही खरं नाही, म्हणून तू मेघा कडे लक्ष दे नाहीतर कळालं, तिने कुठेतरी तोंड काळं केलं तर...‌

आदित्यला आईचा स्वभाव ठाउक होता म्हणून त्याने या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. खरं कारण म्हणजे मेघाच्या जाॅबमुळे त्याचे चांगले पैसे वाचत होते. ज्याने त्याने मजा मारायला सुरुवात केली होती.

मेघा बिचारी आपली सकाळी लवकर उठून दोघांचे डब्बे बनवायची, सर्व कामं ती स्वतःच करायची.कारण तिला जमेल तेवढे पैसे वाचवून स्वतः चं छोटंसं घर घ्यायचं होतं.

ती ऑफिस आणि घर अशी तारेवरची कसरत आजही करत होती. त्यात आदित्यचा बदलता स्वभाव तिला त्रासदायक ठरत होता.

आणि आज तर चक्क लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मेघाला सरप्राइज द्यायचं सोडून आदित्यने नीट तिला विश ही नव्हतं केलं.आदित्यच्या डोक्यात होती ती फक्त आज ठरलेली मित्रांसोबतची बिअर पार्टी..‌‌

मेघा जेवण न करताच झोपायला गेली पण झोप कुठे येत होती तिला...

अनेकानेक विचार तिच्या मनात येत होते...‌

आणि मग शेवटी तिने ठरवलं की तिचा नवरा असाच आहे आणि त्याच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही.....

आणि ती झोपून गेली..‌.

सकाळी लवकर उठली तर बघितलं आदित्य गाढ झोपेत होता..

ती ऑफिस साठी निघणारच होती पण तिला अचानक चक्कर आली ती तिथेच थांबली, कशी बशी बसली.....

तेवढ्यात आदित्य तिथे आला......

काय, आज गेली नाहीस ऑफिस ला अजून?

आदित्य अरे जातच होते पण मला आज बरं वाटतं नाहिये रे...

चक्कर आली म्हणून बसुन घेतलं...‌

अरे, काय झालं अचानक तुला?

ते थांब मी आलो फ्रेश होऊन आपण डॉ नरेंद्रला दाखवून येऊ....‌

ते दोघेही हाॅस्पिटलला गेले.

तिथे मेघाच्या काही टेस्ट झाल्या ज्यातून ती गर्भवती आहे असे कळाले.

डॉ नरेंद्रनी तिला आता अधिक काळजीपूर्वक वागण्याचा सल्ला दिला. ती काल जेवली नव्हती आता तसं करुन चालणार नव्हतं.....

आदित्य ला मात्र हे ऐकून काही फार आनंद झाला नाही...‌

हाॅस्पिटल मध्ये असतांनाच त्याने मेघाला सांगितलं की त्याला आता बाळ नकोय...

मेघाला हे अनपेक्षित नव्हतं कारण ज्या पद्धतीने तो वागत होता ना त्यात तो जबाबदारी घ्यायला सक्षम नाही हे स्पष्ट होतं.

मेघा ने जास्त विचार न करता ते मुल पाडायचं असं निर्णय घेतला. त्यानंतर मात्र मेघा फक्त कामा इतकंच आदित्य सोबत बोलत होती ते ही नाइलाजाने.......

या एका चुकीच्या निर्णयामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा वाढत गेला. 

ते दोघं आता फक्त म्हणायला सोबत होते. नातं त्याचं संपत चाललं होतं.....

मेघाच्या गर्भपाताची बातमी ऐकून तिच्या सासूने आणि आईने तिला चांगलंच ऐकवलं.......

ते ऐकून मेघाला वाटलं की तिने फार मोठी चूक केली ‌आहे. पण आता वेळ निघून गेली होती.

मेघा फार एकटी पडली होती. ती आता पुर्वी सारखी हसत खेळत नसायची. तिचा चेहरा मावळला होता.

आज ती ऑफिस साठी निघाली पण मनात एक वेगळीच चलबिचल सुरू होती. तिला ऑफिसला जाण्याची इच्छा नव्हती. बाहेर पाऊस पडत होता पण जावं लागलं. ऑफिस मध्ये असताना तिला अचानक एक फोन आला...

हॅलो, मेघा......

हा कोण बोलतंय??

मेघा, मी आदित्यचा मित्र बोलतोय...

हं बोला, मेघा तू लवकर सिटी हाॅस्पिटलला ये......

काय झालंय..‌‌

अगं ते आदित्यला ऑफिसमध्ये काम करता करता अचानक माहीत नाही काय झालं तोट् बेशुद्ध पडला आम्ही त्याला लगेच हाॅस्पिटलला घेऊन आलोय तू पण ते लवकर......

हो आले, लगेच निघते..

संबंध रस्त्यात मेघा हाच विचार करत राहीली

देवा, आदित्य ला काही ही होता कामा नये...

ती हाॅस्पिटलला आली.

आदित्यला भेटली तो आता बरा होता...

म्हणजे ठिक होता....

दोन मिनिटं बाहेर ये ना मेघा जरा महत्त्वाचे बोलायचे होते....

अरे हो आले हं समीर.....

काय रे काय झालं....

अगं मेघा आदित्य ओके नाहीये...

म्हणजे बरा आहे ना तो आता....

अगं त्याच्या टेस्ट झाल्या आहेत त्यात त्याला लीवर कॅन्सर डिक्टेट झालं आहे. डॉ बाबासाहेब म्हणाले की ही पहिलीच स्टेज आहे म्हणून पुढच्या उपचारासाठी मुंबई ला जावं लागेल. तुला भेटवलं असतं डॉ बाबासाहेबांना पण त्याचं एक दुसरं ऑपरेशन होतं म्हणून ते नाही आहे आता इथे.......

मेघाला ते ऐकल्यावर दहा सेकंद काही सुचलं नाही....

पण मनात काहीतरी विचार करून...

मेघा हिम्मतीने उभी राहिली..‌.

तिने समीरचे आभार मानले सर्व डिटेल्स घेऊन ती आदित्यला घेऊन घरी निघत होती आज पाऊस फार पडत होता म्हणून समीरने त्याच्या गाडीतून दोघांना घरी सोडले.

मेघा ला आता आदित्य सोबत भांडायचे नव्हते कारण आता तिला त्याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचे वाटत होते.

आदित्यला नीट झोपवून मेघा बाहेर आली. बाहेर येऊन तिने तिच्या सासू- सासऱ्यांना सर्व कळवले. त्यांना मुंबई ला येण्याची विनंती केली. कारण मेघा ला आदित्यच्या कॅन्सर उपचारासाठी पैश्याची जुळवाजुळव करायची होती. तिच्या बॅक खात्यात फक्त चार लाख रुपये होते आणि खर्च फार होणार होता. तिने ऑफिस मधून दोन मिळवलं आणि लगेचच मुंबई ला जाण्याची तयारी सुरू केली. मुंबईत तिच्या आईच्या ओळखी होत्या त्यांची मदत घेऊन तिने आदित्यच्या उपचाराची योग्य सोय करून घेतली. आता सर्वात मोठं काम म्हणजे आदित्यला सर्व सांगायचं.

आदित्य झोपून उठल्यावर मेघा ने फार प्रेमात त्याला सगळं सांगितलं......

मोठा सुस्कारा सोडत आदित्य म्हणाला

ते सर्व ठिक आहे पण तुला माझा राग नाही येत आहे कां?

आणि हे जे तीन महिने आहे ते मी तुझ्याशिवाय कसा राहणार,???

आदित्य फक्त तीन महिने ते ही पैसे हवे आहेत आपल्याला म्हणून त्यानंतर मी सुट्टी घेईन ‌‌.‌.....

आदित्यने पट्कन मेघा ला मिठीत घेतले. 

ते दोघेही मुंबई ला गेले तिथे आदित्यची सर्व सोय करून मेघा परत पुण्याला निघून आली. तिने घरासाठी केलेलं बुकिंग कॅन्सल केलं. दोन दिवसांत तिने सर्व पैसे जमवले.

 ती दर शनिवारी मुंबईला जायची आणि सोमवारी ती सरळ मुंबई हुन ऑफिस ला जायची....

यामुळे तिचं आदित्य कडे ही लक्ष होतं आणि जाॅबला ही सुट्टी पडत नव्हती.

प्रत्येक वेळी मेघा आदित्य ला भेटायला जायची तेव्हा पाऊस तिची सोबत करायचा....

सुरुवातीला त्या पाऊसाचा मेघाला त्रास व्हायचा पण आता पाऊस तिला फार आपलासा वाटतो.....

पाऊस पडत असला की तिला मनातुन आनंद व्हायचा, तिला कधीच एकटं वाटायचं नाही.

पाऊस आणि मेघाचं नातं जसं घट्ट होत चाललं होतं तसं मेघा आणि आदित्यचं ही नातं घट्ट होत होतं. पाऊस पडून गेल्यावर सर्वत्र कशी हिरवळ पसरलेली असते तशी त्या दोघांच्या नात्यात हिरवळ पसरून मेघादित्य चं नातं दिवसेंदिवस फुलत होतं. मेघाला आपल्या मुलाची इतकी काळजी करतांना बघुन मेघाच्या सासूबाईंनी तिला मुली सारखं वागवायला सुरूवात केली. 

मेघाच्या सर्व सेवेमुळे आदित्य आता पुर्णपणे बरा झाला होता. आज त्याला डिस्चार्ज मिळाला होता. त्याला घेऊन मेघा पुण्याला घेउन आली आदित्य चे आई-बाबा तिथुनच त्यांच्या गावी परत गेले. तीन महिने झाले होते ना त्यामुळे त्यांचं जाणं गरजेचं होतं.

घरी परत आल्यावर त्या दोघांनी एकमेकांना गच्च भरून मिठीत घेतले.

आदित्य आय एम सो हॅप्पी टुडे.....

मेघा....

आय लव यू यार........




"मेघाच्या सरींनी आज आदित्य न्हाऊन निघाला होता."

बाहेर गाणं वाजत होतं

हृदयी वसंत फुलताना.....

प्रेमास रंग यावे प्रेमात........


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama