Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Vrushali Thakur

Horror Romance


4.3  

Vrushali Thakur

Horror Romance


मधुचंद्राची रात्र

मधुचंद्राची रात्र

4 mins 2.4K 4 mins 2.4K

ती आज खूप आनंदात होती आणि एक हुरहूर पण होती मनात. कसं आहे दोन दिवसापूर्वी तिचं लग्न झालेलं आणि नंतरचे दिवस पूजा, देवदर्शन व पाहुण्यांचं करण्यात गेले. सगळे निघून गेल्यावर आता हेच लव्हबर्डस घरी होते. त्याचे आई-बाबा पण गावी निघून गेले. सोबत तो त्यांना सोडायला गेलेला स्टेशनवर. 


आज त्याची मधुचंद्राची पहिली रात्र त्यामुळे तिचं लाजणं-घाबरणं साहजिकच होतं. त्यात तो भलताच रोमँटिक. ती सोफ्यावर जरा ऐसपैस बसून सगळं आठवत होती. अगदी घाईघाईतच लग्न ठरलं आणि उरकलं होतं त्यामुळे फार रोमॅंटिक धकधकीचा काळ काही फार अनुभवायला मिळाला नाही. पण तेवढ्या दिवसातपण तो रोज gm, gn चे मेसेज करायचा, लेट जेवली तर रागवायचा, तिची काळजी घ्यायचा, खूप सारे गिफ्ट्स द्यायचा आणि सर्वांसमोर तिला 'आय लव्ह यु' म्हणायचा आणि हीच लाजून गोरीमोरी व्हायची.


त्याला सरप्राईज म्हणून हिने हनिमून स्पेशल शॉपिंग केलेली होती. आता त्याला सरप्राईज द्यायची वेळ होती. तो तसं सांभाळून घेणारा होता. तरीपण......


रात्रीचे 10 वाजून गेले होते. एव्हाना तो यायला हवा होता. तिने वॉश घेतला आणि तयारी करत आरशासमोर गुणगुणत उभी राहिली. ती... 24-25 वर्षांची ललना, थोडीशी सावळी, उभट आणि तजेलदार चेहरा, हनुवटीच्या कडेला छोटासा तीळ, खांद्यावर रुळणारे मऊ रेशमी केस, उंचीला साजेस भरलेलं अंग, त्यावर तिने घातलेली मरून जाळीदार नाईटी, त्यावरची मऊशार फर हळूच तिला गुदगुल्या करत होती. मेंदीच्या पायावर एक अंकलेट उठून दिसत होत. हातात नाजुकसं ब्रेसलेट नाजुकशी किणकिण करत होत. मरून नेलपॉलिश, ब्लॅक आयलायनर, हलका मस्कारा, स्मोकी आयशॅडो, ग्लॉसी मरून लिपस्टिक तिच्या सौन्दर्यात अजून भर टाकत होती. आपल्या ओल्या केसांना तिने तसंच मोकळं सोडलं होतं आणि त्याला साईडने एक छोटासा क्लिप लावलेला. अशी सजून धजून ती त्याची वाट बघत हॉलमध्ये घुटमळत होती.


त्याची वाट बघून तिचे डोळे दुखायला लागले. इकडे तिकडे बघताना सहज तिचं लक्ष कॅलेंडरवर गेलं. 'अरे देवा, आज पौर्णिमा आहे' ती अजून घाबरली. गावच्या काही गोष्टी तिला आठवायला लागल्या. तिचा जीव खाली-वर होत होता.


थोड्याच वेळात तो आला. हिचा जीव भांड्यात पडला. जवळ जवळ ती ओरडलीच त्याला. "तुला समजत कसं नाही? वाजले बघ किती त्यात आज पौर्णिमा... किती घाबरली मी." तो मात्र हसतच तिच्याकडे पाहत होता. तिच्या सौन्दर्यात तो क्षणभर हरवलाच होता की तिच्या मुसमुसण्याने तो भानावर आला. त्याने तसंच तिला जवळ ओढलं. आपले हात तिच्या कंबरेवर गुंडाळले. त्याच्या भारदस्त मिठीत ती सहज सामावून गेली. तिच्या मऊशार गालावर प्रेमाने हात फिरवत त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकले. आता तिच्या रागाचा पारा उतरला होता. "अगं वेडू, पौर्णिमेला नाही काही अमावास्येला भूत फिरतात. तुझ्यासारखी बायको असताना कोणत्या भुताची बिशाद. भुताने बघितलं ना तर तोच वश होईल तुला."

"तुला ना काहीतरीच सुचतं." त्याला ढकलून ती बेडरूममध्ये पळाली.


त्याचा पण मूड आता रोमँटिक झालेला. तिच्यामागे पळत त्यानेपण बेडरूम गाठला. ती लाजून खिडकीच्या बाजूला उभी होती. त्याने मागून तिला मिठी मारली. ती लाजली. शहारली. स्वतःला सोडवायचा लटका प्रयत्न करत होती पण आज काही तो तिला जाऊ देणार नव्हता. त्याने अजूनच मिठी घट्ट केली. आपले ओठ तिच्या मानेजवळ आणले. त्याच्या गरम श्वासाच्या जाणिवेने ती पण कासावीस झाली. तिने आपले डोळे बंद केले. तोच त्याने हळूच तिच्या कानात सांगितले, "आय लव्ह यु बाळा, तुझ्या मर्जीशिवाय मी काहीही करणार नाही.घाबरू नको." तिने स्वतःला अजूनच त्याच्या मिठीत घट्ट केलं आणि दोघेपण बाहेर बघत होते.


त्याने एका हाताने तिचा चेहरा झाकत नुकत्याच वर येणाऱ्या चंद्राला उद्देशून बोलला, “तो पण बघ तुला बघायला कसा उतावीळ झालाय.” तिला यावर चांगलंच हसू आलं. हे बघून ती पटकन वळली आणि तिने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले. त्याच्या भरदार छातीवर आपले ओठ टेकवले. आता तो पण शहारला. त्याने एका हातात तिला सावरत दुसऱ्या हाताने खिडकीचा पडदा ओढला. तिला आपल्या कवेत उचलून बेडवर घेऊन आला.


किती तरी वेळ तो तीच सौन्दर्य फक्त डोळ्याने पित होता. शेवटी तिने लाजून ओंजळीत आपला चेहरा लपवला तसा तोपण लाजला. बेडवर झोपत त्याने तिला आपल्याजवळ ओढले. या गडबडीत हिसका बसून तिच्या नाईटीची नॉट सुटली. ती तशाच अवस्थेत त्याच्यावर कोसळली. आता त्याला संयम बाळगणं कठीण झालं. तो सावकाश तिच्या पाठीवरून हळुवार हात फिरवत राहिला. आता तीपण सावरलेली. आजची रात्र खूप महत्वाची होती तिच्यासाठी. 

त्याच्या स्पर्शाने तिचे श्वास जड होऊ लागले. ती अजूनच त्याच्या जवळ होत होती. त्या स्पर्शसुखाने तिने आपले डोळे मिटले, आपले नाजूक मरून ओठ त्याच्या ओठावर टेकवले. आणि जणू तिने त्याला ग्रीन सिग्नल दिला. आता त्यांचे श्वासात श्वास मिसळले होते. रात्र हळूहळू चढत होती. चंद्र वर येत होता. त्याच्या प्रकाशाने सर्व धरती न्हाऊन निघत होती. आणि इकडे ती त्याच्या प्रेमाच्या वर्षावात भिजत होती.


तिने आपले ओठ त्याच्या ओठापासून विलग केले आणि त्याच्या गालावर टेकवले. तो स्वतःला विसरून तिच्या गंधात हरवलेला. तिने पण त्याला साथ देत आपले ओठ त्याच्या मानेवर टेकवणारच होती की, घड्याळाने बाराचा टोला दिला. तो धुंदीतून बाहेर येईल की, इतक्यात तिने त्याच्या मानेवर आपल्या ओठांनी रसपान करायला सुरुवात केली, तो पुरता मदहोश झाला होता. तिच्या मानेवरचा नाजूक चाव्याने त्याच्या जाणिवाच हरवल्या.


तो तिच्यामध्ये चाचपडत असतानाच त्याला मानेपाशी थोड्या वेदना वाटल्या. तो काही समजण्याआधीच तिचा हात त्याच्या तोंडावर होता. वेदनेची किंकाळी पण बाहेर पडत नव्हती. डोळे बंद होण्यापूर्वी त्याला चंद्रप्रकाशात एवढेच दिसले कि 'ती' भयानक लांब सुळे असलेल्या तोंडाने कोणता तरी लाल चिकट द्रव पीत क्रूर हसत होती.


समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from Vrushali Thakur

Similar marathi story from Horror