मैत्रीच्या पलीकडले
मैत्रीच्या पलीकडले


शाळेतील मैत्री. तो तिच्या पेक्षा दोन वर्षे मोठा. दिनू नाव त्याचे... अन् ही सायली. गावातील शाळेत शिकत होते. दिनू दोन वेळा नापास झाला होता. त्यामुळे आता सायलीच्या वर्गात होता. दिनूच्या आईबाबाना तीन मुले. मुलगी नव्हती. खूप हौस होती मुलगी ची.दिनूचे बाबा मुंबई ला कामाला होते. दिनू अभ्यास मध्ये फारसा हुशार नव्हता पण कोणत्याही गोष्टी चा पाठांतर करून अभ्यास करणे यापेक्षा कृतीतून अभ्यास करायला आवडायचं त्याला. तो सहसा कुणाच्या मधे मिसळायचा नाही. सायलीची आजी आणि दिनूची आजी अगदी जवळच्या खास मैत्रीणी.त्यामुळे तिचे दिनूच्या घरी जाणेयेणे असायचेच. आठवीत असताना शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सायलीने दिनूला राखी बांधली. आणि सलग तीन वर्षे बांधत होती.
दहावीनंतर तो शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडला. नंतर काही संपर्क झाला नाही. तो इलेक्ट्रॉनिक साईड घेऊन डिप्लोमा उत्तीर्ण झाला. चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळाली. मामाच्या मुली बरोबर प्रेम विवाह झाला. बऱ्याच वर्षानंतर सायलीची भेट झाली. मोबाईल नंबर ची देवाणघेवाण झाली. आठवड्यात एकदोनदा फोन असायचा. मैत्री तर घट्ट झाली होती. पण बहिणी भावाचे एकमेकांच्या बद्दल माया पण वाढत होती. सायलीने दिनूकडून त्याच्या बायकोचा पण मोबाईल नंबर घेतला.. तिच्या बरोबर पण बोलायची. पण मधेच कुठे माशी शिंकली.
तिने सायलीला फोन केला... तुम्ही दिनूला फोन किंवा मेसेजेस किंवा करू नका आणि कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नका. पण दिनूच्या बायकोने मनात काय सलवत ठेवले होते काय माहिती. बहिणी भावासारखा पवित्र नात्याबद्दल तिने शंका घेतली होती. आतापर्यंत दिनू आणि सायलीची मैत्री होतीच. मैत्रीपेक्षा जास्त... त्यांच्यामध्ये बहिण भावाचे नातं घट्ट होऊ पाहत होतं. पण दिनूच्या बायकोनं या नात्याचा रूजण्याआधीच चुराडा केला. त्यामुळे दिनू आणि सायलीच्या उमलू पाहणाऱ्या बहिणभावाच्या नात्याला तिथेच पूर्णविराम मिळाला.