मैत्री
मैत्री
मैत्री.....दोन अक्षरांचा हा शब्द पण किती तरी भावना लपलेल्या आहेत यात, नाही का ? किती सारी मस्ती, प्रेम, खोटे रुसवे फुगवे या सर्वांनी बनलेल नात. हे नात जरी रक्ताचं नसलं ना तरी दृढ विश्वास आणि प्रेम या नात्यात असतो , आणि या दोन च गोष्टी प्रत्येक नात्याला अजून मजबुत बनवण्याच काम करत असतात. आपल्या आयुष्यात खूप लोक येतात आणि जातात पण मित्रांची जागा कोणी ही घेऊ शकत नाही.
खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण प्रत्येक व्यक्तीला नाही सांगू शकत , आपल्या मनातील विचारांना सर्वांजवळ नाही व्यक्त करू शकत , ते विचार मांडायच ठिकाण म्हणजेच मित्र. मित्रांनो प्रत्येक गोष्टी च्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट ,त्याच प्रमाणे मित्र ही असतात.चांगले आणि वाईट . आपल्याला चांगला मित्र कोण आणि वाईट कोण यात देखील फरक समजायला हवा कारण चांगला मित्र हा आपल जीवन घळवण्यात मदत करतो तर वाईट मित्र जीवन उद्धवस्त करतो.
डॉ. अब्दुल कलाम म्हणतात, " Good friends care for each other, close friends understands each other. But true friends stay beyond words , beyond distance and beyond time.
आपल्या भारतीय संस्कृतीत श्री कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीच उत्तम उदाहरण आहे. रक्ताच्या नात्याला ही लाजवणार अस हे अनमोल , प्रेमळ, निर्मळ नातं आहे.
