जीवन
जीवन
बऱ्याच वेळा मनामधे विचारांचं वादळ येत असत, कळतच नाही या प्रश्नाचं उत्तर तरी काय आहे? जर जीवन जगून एके दिवशी सर्व सोडून जायचं आहे तर हा एवढा बाजार आहे तरी का?
आयुष्याच एक ध्येय ठरवून व्यक्ती ते मिळवण्यासाठी कितीतरी वेदना सहन करतो, कितीतरी गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवतो, पण त्याला माहिती ही नसत की आपल आयुष्य आपल्याला ते साध्य होईपर्यंत साथ देईल किंवा नाही, जो वेळ तो त्याला मिळवण्यासाठी देतोय त्याच सार्थक होईल तरी का?
खूप अवघड आहे ना खरंच हे जीवन? पण तेवढंच सुंदर सुद्धा आहे . ते नाही का "आयुष्य छान आहे थोड लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे ह ते दुनिया दुकान आहे. सुखासाठी कधी कधी हसावं लागत तर कधी रडाव लागत कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला ही उंचावरून पडावं लागत. "असच आहे हे जीवन. सुख - दुःख यांनी बनलेल. कष्ट आणि प्रयत्नांनी बनलेलं.
