Lata Rathi

Inspirational

2  

Lata Rathi

Inspirational

मास्क

मास्क

1 min
3.4K


अलक


"कीर्ती लहान पण मूर्ती महान..."


सर्व जग दहशतीखाली जरी असले तरी सर्व आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतायेत. मुलं-सुना आपल्या "वर्क फ्रॉम होम"मध्ये व्यस्त. आता उरलीत ती बच्चे कंपनी आणि आजी-आजोबा. आजच बातम्यांमध्ये ऐकलं... शहरात मास्कचा तुटवडा...


मग काय? आजी, आजोबा, बच्चे कंपनी यांनी मिटिंग घेतली... निर्णय ठरला... आता प्रश्न होता तो शिवणकाम कोण करणार? पण तोही प्रश्न सुटला... रमा अख्ख्या कॉलनीची कामवाली बाई... तिची आई शिवणकाम करायची, तिला मदतीला घेतलं, आपल्या साठवलेल्या पैशातून, काही आजी-आजोबांकडून मदत घेतली. कापड आणले... आणि लागले सगळे जोमाने कामाला... कुणी कटिंग करून दिलं, कुणी पट्ट्या कापून दिल्या... आणि काय आश्चर्य अवघ्या दहा दिवसात एक हजार मास्क तयार झाले. आता ते व्यवस्थित पॅक करून गरजूंना वाटण्यात आले...


"मनात जर आणलं तर अशक्य असं काहीच नाही..." हो ना चला तर मग आपणही थोडासा खारीचा वाटा उचलूया... कराल ना मदत...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational