Suresh Kulkarni

Drama Horror

1.0  

Suresh Kulkarni

Drama Horror

मारेकरी !

मारेकरी !

14 mins
2.1K


हॉटेल 'लव्ह बर्ड्स'च्या मागच्या लॉनवर, ती तिघे बसली होती. 

"श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि 'वास्को' लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!" सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या 'स्वीटी'ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला. 

श्लोकांची अवस्था शोचनीय झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटत होते. 

"म्हणजे? तू हिच्याशी लग्न करणार? अन माझं --माझं काय? आपलं प्रेम? त्याच काय?" स्वीटीकडे दुर्लक्ष करत श्लोकाने काकुळतेने विचारले. 

"आपलं प्रेम ना? ते तसेच राहील, ग! मी स्वीटीला सगळं सांगितलंय! तिची मुळीच हरकत नाहियय!" तो निर्लज्जपणे म्हणाला. 

श्लोकाच्या मनाचा तोल गेला. संतापाचा पार उकळू लागला. तिने फाडकन सुमितच्या मुस्काटात मारली! समोरचा ज्युसने भरलेला पेला, त्याचा टाळक्यात फेकून मारला! समोरचे ते छोटेसे टेबल त्याच्या अंगावर उलथून टाकले! आणि माघारी वळून, ताडताडपावले टाकत निघून गेली. मागे तो खिक खिक करून, हिडीसपणे हसत होता. 

डोळे पुसत श्लोका कशीबशी घरी पोहंचली. घरात पाऊल टाकताच, तिच्या हाता पायातले त्राण गेलं. ति तेथेच बेडवर कोसळली. बराचवेळ रडत राहिली. डोळे कोरडे पडले तरी, हुंदके कायम होते. हे अश्या पद्धतीचे ब्रेकप तिला अपेक्षितच नव्हता. हा शॉक तिला असह्य होता. अपमान, असाह्ययता, दुबळेपण, त्याचा राग, स्वःताचा राग, असुरक्षिततेची भावना, सगळंच कस एकदम दाटून आलं होत. आयुष्य निर्थक अन पोकळ वाटू लागलं. आणि शेवटी नको तो निर्णय तिने घेतला. असं निर्लज्ज जगण्यापेक्षा मेलेलं बर! कारण -- कारण तिची मागच्या चार दिवसा खाली अपेक्षित असलेली 'पाळी' पण चुकली होती! 

तिने शोधा - शोध करून दोरी हुडकून काढली. पण फास कसा करायचा? माहित नाही! मग सुरी पोटात खुपसून घेणे जमेल? नको! ते रक्त अन नाही मरण आल तर? तर हस होईलच, वर पोलीस 'आत्महत्येचा' गुन्हा दाखल करून पिडतील ते वेगळंच! हे आत्महत्येचं झेंगट,आपल्या 'बस कि बात नाही!' या निर्णयाप्रत ती पोहंचली. मग काय करावे? निर्लज्ज, लोचटा सारखं जगायचं? नो वे!! मग? काय करावे? एक मार्ग आहे! कोणी तरी आपला खून करायला पाहिजे! म्हणजे या सगळ्यातून सुटका होईल! प्रत्येक गोष्टी करता 'गुगल' वर विसंबण्याच्या सवयीने, तिने लॅपटॉप उघडला. आणि 'अस्यासिन' सर्च मारला. आश्चर्य, 'ती' सेवा पुरवणारी साईट, तिला सापडली! तिने लॉग इन केले. खालील फिल्ड स्क्रीन वर दिसू लागली. 

"NAME OF TARGET---- श्लोका. तिने भरायला सुरवात केली. 

"LATEST PHOTO OF TARGET-----तिने गॅलरीतील तिचा फोटो कॉपी पेस्ट केला. 

"AREA WHERE TARGET CAN BE TRACED--- स्वताः रहात असलेला परिसर त्यात लिहला. 

Terms & Conditions ला accept केले. 

Not robot आयकॉनला क्लिक केले. 

आणि शेवटी SUBMIT पण करून टाकले!

लगेच 'Thanks! We are in action! Now!! ची क्लिप झळकली!!

तिने लॅपटॉप बंद केला.! रात्र बरीच झाली होती. केव्हातरी तिचा डोळा लागला. 

                                                                      ooo  

सकाळी श्लोका उठली तेव्हा बरीच सावरली होती. तिने ब्रश करून, तोंडावरून गार पाण्याचा हात फिरवला. डोळे अजून चुरचुरत होते. तिने आरश्यात स्वतःकडे निरखून पहिले. गोरी नसली तरी उजळ रंग, नितळ कांती, नाकडोळी रेखीव, लांबसडक दाट भुवया, गर्द काळे केस, किंचित निळसर छटा असणारे, साडेपाच फुटाच्या आसपास उंची, सडपातळ बांधा, आणि वय सव्वीसच्या आसपास. या वयात जे असायला हवे असते, ते तिच्यात होते. सुमितने असे का केले?, हे त्यालाच माहित! आता आपण काय करायचे ते ठरवले पाहिजे. त्याच्या देखण्या चेहऱ्यावर आपण भाळलो. तो पक्का सेल्फ सेंटर्ड आहे, हे कळत असूनहि, आपणच बरेचदा दुर्लक्ष केले. बहुतेक वेळा त्याच्या बियर सिगारेटचे पैसे आपणच भरलेत. त्याचा पप्पाच्या पैशावर डोळा होता. त्याच्यासाठी आपण पप्पाना भांडून घर सोडलं, हे कळल्यावर त्याने, दुसरी पैशेवाली पकडली! हलकट साला! बरेच झाले या, निच्या पासून वेळीच सुटका झाली ते.!


कालचा दिवसच वाईट होता. सकाळीच घरमालकाने फ्लॅट रिकामा करण्याची 'विनंती' केली होती. त्या मालकाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, तो कन्व्हिस झालाच नाही,वेळ मात्र गेला. ऑफिसात बॉस उकळतच होता. तिचा पीएफचा चेक आणि डिच्चू लेटर हाती दिले, तेव्हा तो त्रस्त समंध शांत झाला! इतकं सगळं रामायण वर, 'ती 'चुकलेली पाळी!, खरे ते हे सगळं तिला, सुमितच्या कानावर घालायचे होते. त्याच्या आधाराची तिला, त्या क्षणी खूप गरज होती. पण झालं भलतंच! त्यानं,आधार देणं तर सोडूनच द्या, होत तेही विस्कटून, तोडून टाकलं! तीला सहाजिकच डिप्रेशन आले होते. 


तिने मस्त शॉवर घेतला. हलकासा मेकअप केला. कडक कॉफीचा मग हाती घेऊन खिडकीशी आली. खरे तर मूड मस्त असायला हरकत नव्हती. मघाशी तो 'पाळी' प्रॉब्लेम निसर्गानेच सोडवला होता. नवीन फ्लॅट साठी तिने चार-दोन एस एम एस केले होते. खडूस बॉस अडचणीत आणणार, याची तिला कल्पना होती. त्यासाठी तिने काही रेझूम पण पाठवलेले होते. प्रश्न होता तो, फक्त वेळेचा. सगळे ठीक ठाक होते, तरी तिला बेचैन का वाटावे हेच कळेना. 

तिने कॉफी संपवली. आणि एकएक तिचे काळीज लक्कन हलले!

आपण रात्री निराशेच्या झटक्यात, गुगलवर 'मारेकरी' बुक केलाय! त्याचे काय?

तिचे हृदय रेसच्या घोड्यासारखे दौडू लागले. त्या धडधडत्या अंतकरणाने तिने लॅपटॉप ऑन केला. कंट्रोल एच मारून हिस्ट्री लिस्ट मधून, ती साईट हुडकून काढली. त्या साईटवर क्लिक केलं. जमले तर रात्रीची 'ऑर्डर ' डिलीट करावी हा तिचा विचार होता. पण ----Error -- This Site is Temporarily Suspended ---ची सूचना स्क्रीनवर झळकली!!

म्हणजे आता ती, त्या 'मारेकऱ्या'शी सम्पर्क करू शकणार नव्हती! तो तिच्या शोधात सुटला असणार!! छे, असं काही नाही! अशी सेवा, कशी काय असू शकते? कोणीतरी गमतीने ती साईट केली असणार! तिने मनाची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. तिला यश आले नाही. तो कोण असेल? त्याला आपल्या पर्यंत पोहचायला किती वेळ लागेल? 'तो' तोच असेल का एखादी 'ती' असेल? सुरा, पिस्तूल, कि गळा दाबून मारेल? कोण सांगावे, कदाचित तो या क्षणी सुद्धा जवळपास दबाधरुन बसलेला असेल! जो जो त्याचा विचार करायचा नाही, हे, ती ठरवत होती तो तो, त्या संदर्भातले प्रश्न मनाच्या डोहातून उसळून वर येत होते!  

शेवटी तिने मोबाईल उचलला आणि सरळ १००डायल केले!!

"इन्स्पे. इरावती हियर?"

"मॅडम, मी श्लोका बोलतीयय. मी खूप घाबरलीयय! मला सगळं फोनवर नाही सांगता येत! मला घराबाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटतीयय! माझ्या जीव धोक्यात आहे! प्लिज, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का?"

"तुमचा पत्ता आणि मोबाईल नम्बर द्या! घर सापडायला अडचण आली तर उपयोगी पडेल. "

तिने आपल्या घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिला. 

मोजून बाराव्या मिनिटाला इरा श्लोकाच्या फ्लॅट मध्ये होती!

"काय झालाय?" तिने श्लोकाला विचारले. 

"मला खूप भीती वाटतीयय!------" त्यांनतर श्लोका बराच वेळ बोलत होती. तिने कसलाही आडपडदा न ठेवता फ्लॅट सोडण्याची धमकी, नौकरी जाणे, सुमितशीच ब्रेकअप, आपली मनःस्थिती आणि त्यात घेतलेला 'मरणाचा' निर्णय, आत्महत्येची हिम्मत न झाल्याने, गुगलवरच्या साईट वरून आपलाच खून करण्यासाठी नेमलेला मारेकरी, सगळं इराला सांगून टाकले. ती बोलत असताना इरा फक्त तिच्या डोळ्यात पाहत होती. श्लोकाच्या कथनातील प्रामाणिकता तेथे इराला दिसत होती. 

"मी थोड्या वेळाने सावरले. पण त्या दुबळ्या क्षणी गुगल करण्याचा गाढवपणा माझ्या हातून झाल्याची टोचणी मनाला लागली. माझं ब्रेकअप विसरून, या मारेकऱ्याच्याच विचारात गुरफटले. ती रिक्वेस्ट डिलीट करावी म्हणून, मी पुन्हा त्या साईटवर गेले, पण गुगलने ती साईट सस्पेंड केलीयय! दिसतच नाहियय! आता तो 'मारेकरी' माझ्या मागावर असणार!, आता मला मरायचं नाहियय, अन तो मला मारून टाकणार! माझ्याच आदेशाने! मी काय करू?"

"मला नाही वाटत अशी काही सेवा गुगलवर असेल. तुला काही काळ पोलीस प्रोटेक्शन देता येईल. तरी तू सावध रहा. काही वेगळं जाणवलं तर फोन कर. त्यात ५०५या क्रमांकाचा उल्लेख कर म्हणजे, मी नसेल फोनवर तरी, मला निरोप मिळेल. तू कितीही वेंधळेपणा केला असलातरी, मी एका गोष्टी साठी धन्यवाद म्हणेन, आणि ती म्हणजे, पोलिसांना विश्वासात घेतल्या बद्दल!"

इराने एक नंबर डायल करून, फोन कानाला लावला. 

"राकेश? गुगलवर 'अस्यासिन' साईटवर, एका मुलीने आपल्याच खुनाची रिक्वेस्ट टाकली आहे! अशी 'सेवा' खरेच आहे का पहा. आणि अशी काही हिस्ट्री केस ट्रेस होते का हे हि पहा! हे गुगल फॅड हल्ली फार वाढलंय. बाकी नंतर सांगते!"

राकेश हा इराचा डिपार्टमेंट मधला 'सायबर' जीन होता. 

इन्स्पे. इरावती निघून गेली. श्लोकाला तिच्याशी बोलून खूप बरे वाटत होते. ती रिलॅक्स फील करू लागली. 

                                                                           ooo  

या प्रसंगाला सहा महिने उलटून गेले होते. श्लोकाला नवीन जॉब मिळाला होता. संजयच्या, तिचा नव्या कंपनीतला कलीग, ओळखीने आत्ताच्या घराजवळच नवा फ्लॅट मिळाला होता. तो स्टुपिड सुमित , ते ब्रेकअप, तो गुगलवाला बेवकूफपणा, ती इन्स्पे. इरावती सगळंच ती विसरत चालली होती. काळाने तिच्या सगळ्या समस्या सोडवून दिल्या होत्या.  नवा जॉब, नवे सहकारी, नव्या मित्र-मैत्रिणी, एक धमाल ग्रुप झाला होता. पिकनिक, पार्ट्याना ऊत आला होता.


आजही रक्षिताच्या एंगेजमेंटच कारण काढून, तिच्या कडून, ग्रुपने पार्टी उकळली होती. 'जॉय' नावाच्या रिसॉर्टचे एक छोटस लॉन त्या साठी बुक झालं होत. तरुण पोरांच्या ग्रुपची पार्टी, डीजे, सॉफ्ट ड्रिंक्स - म्हणजे बियरचे क्रेट्स, सिगारेटी, व्हेज, नॉन- व्हेज सगळी ,साग्रसंगीत तय्यारी होती. पार्टीत रंग भरायला सुरवात झाली होती. 


श्लोकाने पहिली खुजराहो संपवून, दुसरी बियर तोंडाला लावली. 

" अरे यार,श्लोका, हि तुझी दुसरी बियरची बाटली आहे! जमेल ना तुला?" जवळच उभा असलेल्या संजयने विचारले. 

" संज्या, सोड रे! अजून दोन पिऊन दाखवू? या पाचटक्के पांचट अल्कोहोलच्या पाण्याने, मला काय होणाऱय? माझा स्टॅमिना तुला ठाऊक नाही! ओ सी (ऑफिसर्स चॉईस )ची 'नीट ' निब मारून, बाईकने घरी गेले होते!"

" ये, इथं काय तुझ्या स्टॅमिन्याचे प्रदर्शन नाही मांडलंय! स्वतःची काळजी घेण्या इतपतच पी, एव्हढच सांगायचं होत मला. "

संजयला ती आवडत होती, पण तिचे हे 'पिणे' आजिबात आवडत नव्हते! बियर सोबत तिने अर्धे पाकीट सिगारेटचं पण संपवलं होत! ती सांगून ऐकणारी नव्हती, तरी तो प्रयत्न सोडणार नव्हता!


गॉसिप सोबत डिनर संपायला, नेहमी प्रमाणे साडेबारा वाजून गेले होते. 'वन फॉर रोड!' नावाखाली, श्लोकाने पुन्हा अर्धी बियर घश्याखाली ओतलीच. 'गुड नाईट', 'बाय -बाय ' करत सगळी मंडळी आपापल्या घरी निघाली. 

"श्लोका, आर यु ओके? का, सोडू तुला घरी? तुझी कार आपण सकाळी पिकअप करू." संजयच्या आवाजातली काळजी तिला जाणवली. हि इस डिफरंट!, तिच्या मनात येऊन गेले. 

"संज्या, यार नको काळजी करुस! मी मस्त आहे. आणि ड्रायव्हिंग साठी परफेक्ट कंट्रोल मध्ये सुद्धा. यार, आणि माझं घर आहेच किती लांब? हार्डली पंधरा वीस मिनिटाचा ड्राइव्ह! तेव्हा डोन्ट वरी!"

"श्लोका, हे पिणं -- जाऊ दे, तुला हे सांगण्याची हि वेळ नाहीच म्हणा! सेफ ड्राइव्ह कर, आणि घरी गेले कि मला रिंग दे, तू सुखरूप पोहंचलीस हे मी समजेन! बाय! टेक केयर! गुड नाईट!" तो निघून गेला. 

"किती काळजी करशील माझी? मला माहित आहे, हे असच दाखवायचं असत! जवळ बोलावल्या सारखं करायचं अन मग झिडकारायच! हीच तुम्हा पुरुषांची मोड्स अपरांडी आहे! साल्या त्या सुमितने----मरू दे सार! आजची बियर अन चिकन मात्र झकास होत!" संजयच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत ती स्वतःशीच बडबडत राहिली. तो त्याच्या गाडीत बसून निघून जाई पर्यंत, तिची नजर त्याचा पाठलाग करत होती. 


मग तिने तिची कार काढली. इंजन स्टार्ट केले. पार्टीच्या नादात, गाडीत पेट्रोल भरायचं विसरल्याची, फ्लुअल काट्याने आठवण करून दिली. वाटेत, चार किलोमीटरवरच्या पेट्रोल पम्पावर पेट्रोल भरून घेऊ, हा विचार करून तिने एक्सलेटर दाबला. डोक्यात सुमित आणि संजय येत - जात होते. दोघे दोन टोकाचे. संजय आपल्या जवळ सरकतोय, याची तिला जाणीव होत होती, पण ती आता सावध रहाणार होती. तिची नजर साईडमिररवर गेली. त्यात पेट्रोल पंपाचे दिवे दिसत होते ! बापरे! या विचारात पंप मागे जातोय! तिने यु टर्न मारला. रस्ता डेझर्टेड म्हणावा असाच होता. ती पंपावर परत आली. 

पेट्रोल पंपावर नेहमीच पोरग होत. 

"गण्या, टाकी फुल कर!" ती गाडी बाहेर येत म्हणाली. तिने आळस दिला. बाहेर मस्त गार वार सुटलं होत. गण्याने पेट्रोल भरून झाल्यावर, दिलेल्या मशीन मध्ये क्रेडिट कार्ड पंच करून तिने पेमेंट केले. ती गाडीत बसणार, इतक्यात एक लाल रंगाची कार वेगात आली, आणि तिच्या गाडीमागे दोन इंचावर थांबली! कर्कश्य ब्रेक मारून! त्यातून एक बलदंड माणूस घाईतच बाहेर आला. श्लोकाच्या गाडीकडे पाहून त्याने तोंडातल्या तोंडात विचकट शिवी दिली असावी. त्यातून त्याचे काळे पडलेले दात क्षणभर तिला दिसले. त्या माणसाचा चेहरा भयानक होता, जाळल्या सारखा! चेहऱ्यावर हिंस्त्र भाव आणि अस्थिर नजर! वेडसरपणाची झाक असलेली! जीन,लेदर जॅकेट आणि हातात ग्लोज लेंडरचेच! इतका अभद्र माणूस तिच्या पाहण्यात नव्हता! सरसरून तिच्या अंगावर काटा आला. क्षणाचाही विलंब नलावता ती आपल्या गाडीत घुसली, कसाबसा सीट बेल्ट अडकवला आणि गाडी वेगात पंपा बाहेर काढली. मिरर मध्ये तो माणूस, गण्याला काही तरी विचारत असल्याचे, आणि गण्या तिच्या कारकडे बोट दाखवत असल्याचे दिसत होते. त्याचा गाडीचे हेडलाईट लागले आणि ती चित्यांसारखी तिच्या कारच्या दिशेने झेपावली! 

' का घाबरायचं त्याला? त्याचा आपला काय संबंध? खुंखार वाटला म्हणून?' ती मनाची समजूत घालत होती. आधी तिने सगळ्या विंडो लॉक करून टाकल्या. स्पीड वाढवला. एरवी मोकळा रस्त्यावर कार रेस करायला तिला आवडायचं. पण आजचा निर्मनुष्य परिसर अंगावर येत होता. तिचा स्पीडोमीटर शंभराच्या आसपास घुटमळत होता. 

'कोण असेल?' 

'गुगलवरला मारेकरी!!!?' तिच्या मनात बॉम्ब पडल्या सारखी शंका डोकावली!

एस! तोच असणार!!

त्या रस्त्यावर दोन कार्स भयानक वेगाने पळत होत्या! पण हि रेस पाहायला एक हि प्रेक्षक नव्हता. श्लोका त्या गाडीवर मिरर मधून लक्ष ठेवून होती. तिच्या आणि त्याच्या गाडीतील अंतर झपाट्याने कमी होत होते! म्हणजे तो एकशे वीसच्या स्पीडने पाठलाग करत होता! एव्हाना तो तिच्या टेल लाईट पर्यंत पोहंचला होता! आणि त्याने डिप्पर बीमर वापरायला सुरवात केली. त्याचे हेडलाईट उघड झाप करू लागले!

'हत्तीच्या!, याला साईड हवी आहे तर? आपण उगाच घाबरलो. मन चिन्ती ते वैरी न चिंती. मारेकरी वगैरे झूट होते. मनाचा खेळ दुसरे काय? तिने स्पीड थोडा कमी करून गाडी डावीकडे घेतली. ओव्हरटेक करायला पुरेसा रोड सोडला. त्याने गाडी तिच्या गाडीला समांतर आणली. तो खिडकीतून काही तरी हातवारे करत होता! गाडी पुढे काढत नव्हता! मग मात्र तिची खात्रीच पटली. तो तिच्याच मागे होता! निर्मनुष्य रस्ता, तो कार थांबवायला भाग पडणार! अन मग आपला मुडदा पडणार!! आपल्याच आज्ञेचे पालन म्हणून! तिने क्षणात वेग वाढवला. बंदुकीच्या गोळी सारखी तिची कार पुढे झेपावली. तिने भीत भीतच मिरर वर नजर टाकली. ----- तो मागे होताच, पिसाट वेगात!


समोर रस्त्याला दोन फाटे फुटत होते. डावीकडून तिचे घर फक्त एक किलोमीटरवर होते. उजवी कडून तीन किलोमीटरचा घेर घ्यावा लागणार होता. त्याला हुलकावणी देण्याचा हा चान्स तिने घेण्याचे ठरवले. ती तिच्या वेगात सरळ गेली आणि शेवटच्या क्षणी तिने राईट टर्न घेतला. तो थोडा गोंधळून गेल्या सारखा झाला. पण तो हि कसलेला ड्रॉयव्हर असावा. स्वतःला सावरून तो तिच्या मागे आलाच! समोर फ्लॅटची इमारत दिसू लागली. तिला थोडासा दिलासा मिळाला. 


तिने कचकवून ब्रेक दाबले. तिच्या कारने चारीचाकावर एक छोटी जम्प मारून, गप्पकन जागीच थांबली. मागच्या गाडीचा ब्रेक दाबायचा आवाज तिला ऐकू आला. ती कार मधून, धाडकन उडी मारूनच उतरली. उतरताना सवयीने तिने गाडीची चावी उपसून घेतली होती. इतका वेळ टेन्स होऊन गाडी चालविल्याने, तिच्या पायाला शेकडो मैल पळाल्याचा ताण आला होता. ती कारच्या दाराजवळच कोलमडली! तोवर तो धटिंगण जवळ आला होता. त्याने त्वेषाने लातमारून तिच्या गाडीचा उघडा दरवाजा लावून टाकला! तिच्या दोन्ही बाजूला आपल्या तंगड्या फाकवुन तो उभा होता! तो खाली वाकत असल्याचे तिला जाणवले. संपलं सगळं! आपली झुंज वायाच गेली म्हणायची! तिची शुद्ध हरवली!


त्याने झटकन खाली वाकून श्लोकाच्या हातात असलेली गाडीच्या कि चे,कीचॆन ओढून घेतले. आणि गाडी लॉक करून टाकली! त्याचा कुरूप चेहरा घामाने डबडबला होता. या नाजूक वाटणाऱ्या पोरीने पार त्याची दमछाक करून टाकली होती! त्याने खिशातून मोबाईल काढला. 

" कामं फत्ते!" इतकेच बोलला!

( एक लेखकम्हणून, कथा येथेच संपावी असे मला वाटते. पण अनेकदा 'नकारात्मक ' मानसिकतेचा दोषारोप माझ्यावर होत असतो. --- म्हणून खालील पुस्ती पण ददेतोय. )

                                                                          ००० 

श्लोकाने डोळे उघडले तेव्हा, ती दवाखान्याच्या बेड वर होती. शेजारच्या चेयर मध्ये इन्स्पे. इरावती बसलेली होती. श्लोका एकदम किंचाळलीच, कारण शेजारी 'तो' हाताची घडी घालून ताठ उभा होता!

"कुल डाऊन श्लोका! तो सॅम्यूल आहे! माझा इंनफॉर्मर! पोलिसा ऐवजी याला वर्षा साठी तुझ्या रक्षणासाठी नेमलाय! याने तू पेट्रोल भरत असताना, एक काळीआकृती, तुझ्या कारच्या मागच्या सीटवर घुसताना पहिली होती. तू वेगात होतीस, हा तुझ्या पाठीमागच्या गाडीत. तुमच्या रेसमुळे तुझ्या मागच्या सीटवर असलेल्या माणसाला, तुझ्या पर्यंत पोहंचण्याची सवडच मिळाली नाही. याने तुझी शुद्ध हरपताना तुझ्या हातून कारची कि घेऊन तुझी कार लॉक करून टाकली होती. मग, त्याने मला 'काम फते!' म्हणून फोन केला. 'मारेकरी' सेवा, गुगलवर एका विकृत मानसिकता, असल्याने ठेवली होती. आमच्या सायबर सेलला दोन केसेस पण सापडल्या! म्हणून सॅम्यूलची मदत घेतली. तो चांगला माणूस आहे. बहिणीला ऍसिड हल्ल्यातून वाचवताना तोच भाजलाय! तुला अजून एक माहिती सांगते. तुझ्या कारच्या मागच्या सीट वरून एका बुरखेधारी व्यक्तीस अटक करण्यात आली आहे, त्याच्या जवळ खटकाची सूरी होती!"

इराने सर्व खुलासा केला. 

इतक्यात श्लोकाचा फोन वाजला. तो संजयचा होता! आठ मिस कॉल आणि पाच 'तू सुखरूप पोह्चलीस का?'चे मेसेजेस! तिने फोन कट केला. हि इस डिफरंट!! येऊ देत त्यालाच! श्लोका स्वतःशीच हसली. 

(आता तुम्हीच सांगा कोणता कथा शेवट तुम्हाला भावला.)Rate this content
Log in

Similar marathi story from Drama